Friday, October 28, 2011

आग

खुशाल लावू दे आग दुनिया स्वप्नांना माझ्या
हसतो मी ही वितळून जातील बेड्या हातातल्या

कभी फुरसत में...

कभी फुरसत में हम मिले तो सही,
ग़म बाँटे या खुशी और बात है।

Friday, October 21, 2011

खुश

औरों की मुस्कुराहट देख हम खुश रहते हैं,
आईना देख खुद पे हँसने से यहीं अच्छा।

जिंदगी

तू कर ले चाहे जितने सितम ऐ जिंदगी,
हमने कब परवाह की थी जो आज करेंगे।

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!

कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून,
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे?

दीप सारे जाती येथे विरुन विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून झडून,
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे...

अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी,
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे...

- आरती प्रभू

Wednesday, October 5, 2011

माणूस

माणूस माणसाला माणसासारखं
मानतच नाही,
ज्याच्यासाठी, ज्यानं केले नियम,
त्यातलं कुणीच नियम पाळत नाही.
माणसानंच संपवायची
माणसाची जात,
याला नियतीचा सूड म्हणावं की
माणसाची औकात?