ही असहकाराची भावना काढून टाकल्याशिवाय सर्वसमावेशक विकासाची कल्पना प्रत्यक्षात येऊ शकणार नाही. अशा लोकांमधे राहून, याच लोकांना सोबत घेऊन, याच लोकांच्या प्रगतीसाठी सहकारातून कामाचे डोंगर उभे करणाऱ्या नेत्यांचं अशा वेळी कौतुक वाटतं.
ऐसी अक्षरे
Saturday, May 11, 2013
विना सहकार नहीं उद्धार
ही असहकाराची भावना काढून टाकल्याशिवाय सर्वसमावेशक विकासाची कल्पना प्रत्यक्षात येऊ शकणार नाही. अशा लोकांमधे राहून, याच लोकांना सोबत घेऊन, याच लोकांच्या प्रगतीसाठी सहकारातून कामाचे डोंगर उभे करणाऱ्या नेत्यांचं अशा वेळी कौतुक वाटतं.
Saturday, April 20, 2013
एका पोळ्याची गोष्ट
फार वर्षांपूर्वी, एका मोठ्ठ्या जुन्या झाडावर एक प्रचंड मोठं मधमाश्यांचं पोळं होतं. आजूबाजूला रंगीबेरंगी टवटवीत फुलांनी बहरलेले बाग-बगिचेही होते.
त्या पोळ्याचा कारभार चालवण्यासाठी काही ज्येष्ठ मधमाश्यांसोबत एका राणी माशीची नेमणूक करण्यात आली होती. त्या सगळ्यांना 'सरकारी माश्या' असं म्हटलं जाई. 'कष्टकरी माश्या' त्यांचं मध सुरक्षितपणे साठवून ठेवण्याचं काम या 'सरकारी माश्यां'वर सोपवून निर्धास्त होत्या. याबाबतीत कष्टकरी माश्यांचा सरकारी माश्यांवर पूर्ण विश्वास होता. शिवाय, नवीन बगिच्यांचा शोध घेणं, पुढच्या पिढीतील तरुण माश्यांसाठी मधाचे नवनविन स्रोत शोधून काढणं, अशी कामंदेखील सरकारी माश्यांकडून अपेक्षित होती.
पोळ्याचा कारभार कुठलाही गडबड-घोटाळा न होता सुरळीतपणे चालावा, यासाठी सरकारी माश्यांनी काही नियम बनवले होते आणि कायदेही संमत करून घेतले होते. कष्टकरी माश्यांना त्यांचं पालन करावंच लागे, अन्यथा त्या शिक्षेस पात्र ठरत. पोळ्यात राहणार्या विविध जातीच्या मधमाश्या आपापसात भांडून पोळ्यासाठी समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी अशा नियम व कायद्यांची गरज होती. उदाहरणार्थ, काळ्या माश्या आणि लाल माश्या असे दोन मुख्य प्रकार होते. त्यांचं काम एकाच प्रकारचं होतं. फक्त, त्या दिसायला थोड्या वेगळ्या होत्या आणि त्यांच्या प्रार्थनेच्या आपापल्या वेगळ्या पद्धती होत्या.
अशा या परिपूर्ण पोळ्यामधे सर्व काही आलबेल होतं. पण काळानुसार काही बदल घडत गेले. सरकारी माश्यांची स्वतःची मुलं, नातेवाईक, आणि मित्रमंडळी होती. त्यापैकी बहुतेकांना 'सरकारी माश्या' बनता आलं नाही. त्यांना इतरांसारखं 'कष्टकरी माश्या' बनूनच जगावं लागलं. पण एके दिवशी, एका ज्येष्ठ सरकारी माशीच्या मुलानं आपल्या जन्मदात्याकडं तक्रार केली की, कष्टकरी माशी म्हणून जगणं फारच कष्टाचं काम आहे. "आपल्या सरकारी मधाच्या साठ्यांमधून मी थोडंसं मध घ्यायला काय हरकत आहे?" त्यानं विचारलं. "नाही, हे अयोग्य आणि अनैतिक आहे," सरकारी माशीनं म्हटलं.
"कुणाला काऽही कळणार नाही. सरकारी गोष्ट आहे, सरकारपुरतीच राहील," सरकारी माशीच्या मुलानं उपाय काढला. बरोबरच होतं त्याचं. कष्टकरी माश्यांचा स्वतःपेक्षा जास्त सरकारी माश्यांवर विश्वास होता. थोडंसं मध गायब झालं तर कुणाच्या लक्षातही येणार नव्हतं.
आणि मग झाली की सुरुवात. हळूहळू, सगळ्या सरकारी माश्यांच्या मुलांनी, भावंडांनी, नातलगांनी, मित्रांनी, आणि हितचिंतकांनी रोज सरकारी साठ्यातलं थोडं-थोडं मध चोरायला सुरुवात केली. आता त्यांना दिवसभर बाग-बगिच्यात मजुरी करायची गरज नव्हती. अपेक्षेनुसार मधाची पातळी वाढत नाहीये, हे कष्टकरी माश्यांच्या लक्षात येऊ लागलं. काही कष्टकरी माश्यांनी हा मुद्दा उचलताच सरकारी माश्यांनी फर्मान सोडलं, "आळस झटका आणि कामाला लागा".
मधाचा साठा वाढवण्यासाठी कष्टकरी माश्या अजून कष्ट करू लागल्या. तरीसुद्धा, मधाची पातळी काही वाढेचना. उलट, दिवसेंदिवस मध कमीच होऊ लागला.
लवकरच, सरकारी माश्यांनी आणखी एक धोरण आखलं. एखाद्या नव्या बागेचा शोध लागला की सर्वप्रथम त्यांच्या मुलांना, नातेवाईकांना, आणि मित्रांना तिचा लाभ दिला जाऊ लागला. "जे कष्टकरी माश्यांना ठाऊकच नाही, ते त्यांच्याकडून हिरावून कसं घेणार," अशी कुजबूज सरकारी वर्तुळात सुरू झाली.
पुढेपुढे, मधाची पातळी तर घटत गेलीच, शिवाय कष्टकरी माश्यांच्या मुलांसाठी नव्या बागाही सापडेनाशा झाल्या. आता ते रिकामटेकडे आणि उपाशी राहू लागले. कधीकधी, राणी माशी या कष्टकरी माश्यांपुढं थोडं मध शिंपडे, आणि मग सगळीकडं राणीची वाहवा होई. तरीसुद्धा, हे शिंपडलेलं मध पुरेसं नव्हतंच.
"कोण चोरतंय आपलं मध?" शेवटी एके दिवशी, एका प्रभावशाली कष्टकरी माशीनं प्रश्न विचारलाच. ही प्रभावशाली बंडखोर माशी काळ्या माश्यांच्या गटातली असल्याचं सरकारी माश्यांच्या लक्षात आलं. म्हणून, सरकारी माश्या म्हणाल्या, "लाल माश्या चोरताहेत तुमचं मध." त्यानंतर, सरकारी माश्यांनी लाल माश्यांना बोलावून घेतलं, आणि त्यांना सांगितलं, "काळ्या माश्या तुमच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारतायत असं आम्हाला वाटतंय."
उपासमार आणि कष्टानं वैतागलेल्या काळ्या आणि लाल माश्यांना संताप अनावर झाला. त्यांची एकमेकांशी तुफान भांडणं झाली. आपल्यावरची पीडा टळल्यानं या भांडणांची मजा लुटत सरकारी माश्यांनी मधचोरी सुरूच ठेवली. जसजशा लाल आणि काळ्या माश्या मरू लागल्या आणि जखमी होऊ लागल्या, तसतशा सरकारी माश्या अजून थोडं-थोडं मध शिंपडत राहिल्या. कष्टकरी माश्यांनी पुन्हा राणी माशीचा जयजयकार केला.
थोड्याच दिवसांत, त्या भागात दुष्काळ पडला. फुलांची संख्या कमीकमी होत गेली, आणि इतकी वर्षं साठवलेल्या मधाचा उपयोग करण्याची वेळ आली. पण, सर्वांसाठी धक्कादायक गोष्ट म्हणजे, सरकारी साठ्यांमध्ये मधाचा थेंबही शिल्लक नव्हता. पूर्णपणे सरकारी माश्यांवर विश्वास ठेवून राहिलेल्या कष्टकरी माश्या सरकारी माश्या आणि त्यांच्या संबंधितांच्या घराकडं वळल्या. ते सर्वजण गलेलठ्ठ होऊन आपापल्या 'खाजगी' मधाच्या साठ्यांवर आरामात बसलेले दिसले. हे कमी म्हणून की काय, त्यांना शेकडो नव्या बाग-बगिच्यांचे नकाशेदेखील सापडले, ज्यांचा कष्टकरी माश्यांना थांगपत्ता लागू दिला नव्हता.
या सर्व प्रकारानं अचंबित झालेल्या कष्टकरी माश्या हा धक्का पचवत आपापल्या घरी परतल्या. लाल आणि काळ्या माश्यांची नजरानजर झाली. आपल्याला मूर्ख बनवण्यात आलं, हे दोघांच्याही लक्षात आलं. त्यांनी एकमेकांच्या गळ्यात पडून, एकमेकांना इजा पोहोचवल्याबद्दल माफी मागितली.
"आपण त्यांना चांगला धडा शिकवू," काळ्या आणि लाल माश्या एकमुखानं म्हणाल्या. कष्टकरी माश्यांना कळून चुकलं की, आपल्या नांग्या एकमेकांविरुद्ध नव्हे तर आपल्याला फसवणार्यांविरुद्ध वापरण्याची वेळ आलेली आहे.
दरम्यान, राणी माशीला तणावपूर्ण परिस्थितीचा अंदाज आला. तिनं आपल्या सुंदर तरुण मुलाला समोर आणलं, "हाच आता तुम्हाला वाचवेल. जसं इतकी वर्षं मी वाचवलं."
पण, लाल आणि काळ्या माश्या यावेळी सावध होत्या. त्या सगळ्या एकत्र आल्या आणि सरकारी माश्या व त्यांच्या बगलबच्च्यांवर त्यांनी आपल्या नांग्या उगारल्या. सरकारी माश्यांना आपली संपत्ती गोळा करायलासुद्धा वेळ मिळाला नाही. सगळं जागेवर टाकून त्यांना पोळं सोडून पळून जावं लागलं. लवकरच, त्यांच्यापैकी कुणीही त्या पोळ्यात उरलं नाही.
लाल आणि काळ्या माश्यांनी आपल्यापैकी सर्वोत्तम लोकांच्या हाती सत्ता द्यायचं ठरवलं. तसंच, यापुढं कोणावरही आंधळा विश्वास टाकायचा नाही, सर्वांवर लक्ष ठेवायचं, असंही ठरवलं. हळूहळू पोळ्याची स्थिती सुधारत गेली, आणि मधाचा साठा पूर्ववत भरण्यासाठी नवी पिढी अजून कष्ट उपसू लागली. नव्या बाग-बगिच्यांनी नवी संपन्नता आणली, आणि ते पोळं जगातलं सर्वात यशस्वी पोळं समजलं जाऊ लागलं.
काही वर्षांनंतर, एका रात्री एक वृद्ध माशी आपल्या नातवाशी बोलताना म्हणाली, "तुला माहित्येय का, एके काळी आमच्यावर एका राणी माशीचं राज्य होतं?" "हो. पण आमच्यावर नाही. कारण आम्हाला माहित्येय की, एक छोऽटासा राजा आमच्यापैकी प्रत्येकाच्या आत लपलेला आहे," छोट्या माशीनं उत्तर दिलं.
- मंदार शिंदे
shindemandar@yahoo.com
(मूळ लेखः http://blogs.timesofindia.indiatimes.com/The-underage-optimist/entry/once-upon-a-beehive)
एका पोळ्याची गोष्ट
Tuesday, April 9, 2013
Let's Try Khawakee (Short Story)
Let's Try Khawakee (Short Story)
Friday, March 1, 2013
A Modest Hero
Answer by Sir Edmund Hillary: The press and the public have created an image of Ed Hillary, hero and explorer which simply doesn't exist. They've painted a picture of me as a heroic type, full of enormous courage, tremendous strength, undying enthusiasm and all the rest of it. But it's all really just a story, that's been written up in the newspapers. I'm a person, as I've said, of modest abilities, with a good deal of determination, and I do quite a lot of planning ahead. With careful planning and good motivation, I think you can often achieve things that other much more talented people would probably do much more easily. But then, a lot of these very talented people are not strongly motivated to carry out the things that I've been involved in.
A Modest Hero
Wednesday, February 20, 2013
Positivism
- Dr. Raghunath Mashelkar
Positivism
Thursday, January 31, 2013
मागे
नाती-गोती भाव-भावना, अवघा व्याप सोडला मागे
माझे-माझे मला-मला, ही हावच संपत नव्हती
माझ्यासाठी काय हवे, मग हा विचार सोडला मागे
हरवू नये नि सुटू नये, याचीच कायम भीती
पंगू मनाला करणारा हरेक आधार सोडला मागे
भावनावश निर्णय घेऊन, पाळल्या जगाच्या रीती
फसविणार्या भावनांचा आता व्यवहार सोडला मागे
परमेश्वरावर श्रद्धा आणि भक्ती अपार होती
आकाराचा पण हट्ट धरणारा निराकार सोडला मागे
मागे
Saturday, January 5, 2013
Crimes against Women and Reforms
It may appear that crimes against women are on rise recently. Also, a crime against woman may be considered as just another crime, to be justified by a strong punishment. Both of these are misconceptions, rather ignorant and immediate statements. There are certain hidden aspects of the issue.
The reason behind comparatively higher number of crimes against women recently could be the increased number of 'reported' cases. Women (and their families) are coming out with determination for justice, in recent times. They are overcoming the guilt and fear of social embarrassment, which were preventing them from reporting crimes, in the past. More reporting instances can give justice to more victims. Also, it would give out a strong message to potential criminals that they would not get away so easily. In this sense, the courage shown by victims and support offered by their families can help actually reducing potential instances of heinous crimes against women. And this applies to all levels of society - from rich to poor, from educated to illiterate, from urbanites to villagers...
The second ignorant consideration of crimes against women is treating them as just another crime like theft and murder. Why is a woman sexually assaulted, instead of being beaten up or murdered? It's because 'rape' is worse than 'murder' for a woman. So, crimes like rape and eve-teasing may have motives of demoralising a woman, and mental harassment for life. A man can 'teach a lesson' to a woman by hurting her 'character' and 'purity'. So, this reads much more beyond sexual hunger of the criminal. Blackmailing a woman about her 'relationships', deforming her face by throwing acid, and sexual assault are tools used against woman's confidence and moral. The victim is actually helpless in such cases, as she has to face the trauma twice. First, when attacked by the criminal, and second, when demoralised by family and society. Strong punishment to the criminal can be considered as half justice here.
For the second part, attitude change is required in the atmosphere around victim (or around women, in general). In a case of burglary, the house owner is never considered as guilty or embarrassed. But in case of a rape or similar crime, the society looks down upon the victim who is already physically hurt. Even the thought of future embarrassment for family frightens the victim more than the actual crime being conducted against her. This happens in unpredictable crimes out on the streets as well as in hidden cases of mental and physical torture behind closed doors. The society should take efforts to build confidence in every woman's mind that reporting a crime and seeking justice is her right. Women need to be mentally and morally empowered to overcome the fear of social embarrassment and guilt. Then, any potential criminal would dare not think of using a woman's 'character' against her own confidence and moral!
Mandar Shinde
9822401246
shindemandar@yahoo.com
Crimes against Women and Reforms
Thursday, November 22, 2012
भारतीय चिकित्सा पद्धती
इतर अनेक प्रस्थापित व नवनवीन उपचार पद्धतींबरोबरच, आजही बर्याच ठिकाणी भारतीय चिकित्सा पद्धती व होमिओपॅथीचा वापर केला जातो. याचं कारण म्हणजे, या पद्धतीच्या उपचारांची आणि औषधांची सर्वत्र उपलब्धता. तसंच, सर्वसामान्यांना शारीरिक व आर्थिकदृष्ट्या परवडणार्या उपचार पद्धती म्हणूनही यांच्याकडं पाहिलं जातं.
पूरक आणि पर्यायी औषधं, तसंच पारंपारिक चिकित्सा पद्धती यांचं महत्त्व एकंदर जगभरात वाढू लागलंय. त्यामुळं, भारतीय चिकित्सा पद्धतींकडं देखील लोकांचा ओढा वाढतोय. रासायनिक औषधांचे विपरीत परिणाम आणि प्रस्थापित आरोग्य सेवांचे वाढते दरही याला कारणीभूत आहेत. दीर्घायुष्याची कामना आणि बदलत्या जीवनशैलीनं निर्माण केलेल्या शारीरिक/मानसिक समस्या, या दोन्हींसाठी नवनवीन उपचार व तंत्रज्ञान विकसित होत असलं तरी, लोकांना साध्या-सोप्या उपचार पद्धतींमध्ये जास्त रस आहे. अशा पद्धती, ज्यानं आरोग्यविषयक समस्यांचं निराकरण तर होईलच पण त्याचबरोबर जीवनमानाचा दर्जाही उंचावेल.
सुदैवानं, भारताच्या प्राचीन चिकित्सा पद्धतींमध्ये रोगप्रतिबंधक (प्रिव्हेन्टीव्ह) आणि रोगनिवारक (क्युरेटीव्ह) उपचार पद्धतींचा अनमोल खजिना उपलब्ध आहे. भारतीय चिकित्सा पद्धतींमध्ये आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, सिद्ध, युनानी, तसंच होमिओपॅथी आदींचा समावेश होतो. यांची काही खास वैशिष्ट्यं आहेत. उदाहरणार्थ, या पद्धतींमधील उपचारांची विविधता व लवचिकता, जी एकाच रोगावर वेगवेगळ्या रुग्णांच्या वैद्यकीय स्थितींनुसार निरनिराळ्या पद्धतीचे उपचार सुचवते. यामुळं व्यक्तिगत उपचारांतून दीर्घकाळ टिकणारे उपाय योजणं शक्य होतं. या पद्धतीच्या औषधींची व अन्य सामग्रीची उपलब्धता हेही एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. आपल्या आजूबाजूला आढळणार्या वनस्पती व पदार्थांमधून ही औषधं बनवली जातात. रसायनांचा वापर नसल्यानं यांच्यापासून साईड-इफेक्टचा धोका नाही. तसंच, औषध निर्मितीसाठी सर्वसाधारण तंत्रज्ञान व त्यामुळं तुलनेनं कमी खर्चात उपचार शक्य होतात. या पद्धती परंपरेशी व संस्कृतीशी निगडीत असल्यानं त्यांना वर्षानुवर्षं समाजमान्यता मिळत आलेली आहे. या बाबींचा विचार केल्यास असं लक्षात येईल की, भारतासारख्या देशात व्यापक प्रमाणावर प्रभावी आरोग्य सेवा पुरवण्याची क्षमता या चिकित्सा पद्धतींमध्ये आहे.
आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध, युनानी, योग व निसर्गोपचार, यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा रोगप्रतिबंधक आणि रोगनिवारक उपचार पद्धती उपलब्ध आहेत, ज्या इतर पद्धतींच्या तुलनेत अधिक स्वस्त आणि गुणकारक ठरल्या आहेत. या उपचार पद्धतींकडं शासकीय पातळीवरुन दीर्घकाळ दुर्लक्ष झालं असलं तरी, १९८३च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये, संबंधित चिकित्सा पद्धतींचा पुरेपूर वापर होण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज असल्याचं नमूद करण्यात आलं. १९९५ मध्ये भारतीय चिकित्सा पद्धती व होमिओपॅथी (ISM&H) विभागाची स्थापना करण्यात आली.
आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाच्या केंद्रीय समितीनं १९९९ मध्ये सादर केलेल्या शिफारशींपैकी काही मुद्दे या क्षेत्रात भरपूर नव्या संधी निर्माण करणारे होते. जसे की -
- प्रत्येक प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रावर किमान एक, भारतीय चिकित्सा पद्धतीचा (ISM&H) डॉक्टर असावा.
- अॅलोपॅथिक डॉक्टरांच्या अनुपलब्धतेमुळं रिकाम्या राहिलेल्या जागा, भारतीय चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांनी भरुन काढाव्यात.
- ग्रामीण रुग्णालयांमध्ये भारतीय चिकित्सा पद्धतींची उपचार केंद्रं सुरु करावीत. तसंच, या उपचार पद्धतींचा जनतेला फायदा मिळवून देण्यासाठी, राज्य व जिल्हा पातळीवरील सरकारी इस्पितळांत स्वतंत्र विभाग उघडावेत.
भारतीय चिकित्सा पद्धती व होमिओपॅथी (ISM&H) या विभागाचं नोव्हेंबर २००३ मध्ये, 'आयुष' (AYUSH म्हणजे आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, आणि होमिओपॅथी) असं नामकरण करण्यात आलं. देशातील, वरील भारतीय चिकित्सा पद्धतींच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणं, हे या विभागाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाशी संलग्न असणार्या 'आयुष' विभागाकडून मान्यता प्राप्त केलेल्या आयुर्वेदीक मेडीकल कॉलेजांमध्ये देशपातळीवर पुढील अभ्यासक्रम चालवले जातात -
१. पदवी अभ्यासक्रम - साडेपाच वर्षांचा 'आयुर्वेदाचार्य' (म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदीक मेडिसीन अॅण्ड सर्जरी - BAMS) हा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. साडेचार वर्षं मुख्य अभ्यासक्रम आणि एक वर्ष इंटर्नशिप असं याचं स्वरुप आहे.
२. पदव्युत्तर अभ्यासक्रम - आयुर्वेद वाचस्पती (MD) किंवा आयुर्वेद धन्वंतरी (MS) असा तीन वर्षांचा विशिष्ट विषयांचा पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रम आहे. सर्वसाधारणपणे २२ विषयांमध्ये एम.डी. किंवा एम.एस. करता येतं.
३. पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम - सर्वसाधारणपणे १६ विषयांमध्ये पदव्युत्तर पदविका (PG Diploma) अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याचा कालावधी आहे दोन वर्षं.
आयएमसीसी अॅक्ट १९७० नुसार, भारतातील आयुर्वेद, युनानी इ. चिकित्सा पद्धतींचं पदवी व पदव्युत्तर शिक्षण, तसंच आयुर्वेदीक उपचार पद्धतीचा वापर (प्रॅक्टीस) यांचं नियंत्रण, भारतीय चिकित्सा केन्द्रीय परिषद (सीसीआयएम) या नियामक मंडळाकडं आहे. भारतीय चिकित्सा पद्धतींचे अभ्यासक्रम व महाविद्यालयांची सर्व माहिती परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे - www.ccimindia.org.
भारतीय चिकित्सा पद्धती
Tuesday, November 20, 2012
फ्लॅट खरेदीः- रेडी पझेशन की अंडर-कन्स्ट्रक्शन?
- वाढलेली किंमतः तयार फ्लॅट्सना असणार्या जास्त मागणीमुळं या फ्लॅट्सच्या किंमतीदेखील अंडर-कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्सपेक्षा जास्त असतात. याचाच अर्थ, जास्त किंमतीला खरेदी केल्यामुळं रेडी फ्लॅटमधील गुंतवणूक तुलनेने कमी फायदेशीर ठरते.
- जास्त रकमेचा मासिक हप्ताः बँक व इतर वित्तसंस्था, बांधकामाच्या टप्प्यांनुसार कर्जाची रक्कम वितरीत करतात. त्यामुळं होम लोन घेताना, कन्स्ट्रक्शनमधील फ्लॅटवर मिळणारी छोट्या हप्त्याची सुविधा रेडी फ्लॅट घेणार्या ग्राहकांना मिळत नाही.
- अंतर्गत बदलांवर मर्यादाः तयार फ्लॅटमध्ये व्यक्तिगत आवडी-निवडीनुसार बदल करायला खूप कमी संधी असते. तयार फ्लॅटमध्ये बदल किंवा पुनर्रचना करणं जास्त महाग तर पडतंच, शिवाय राहत्या जागी काम करून घेताना दैनंदिन गोष्टींवर परीणामही होतो.
- निवडीला कमी वावः रेडी फ्लॅट्सना असलेल्या प्रचंड मागणीमुळं ग्राहकांना घाईगडबडीत निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळं त्यांच्या निवडीला खूप कमी वाव मिळतो. बरेचदा अशा निर्णयांवर पश्चात्ताप करण्याचीही वेळ त्यांच्यावर येते. याउलट, आजूबाजूला शोध घेतल्यास कित्येक ठिकाणी रेडी पझेशन फ्लॅट्सपेक्षा चांगले अंडर-कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स मिळू शकतात.
- रोखठोक व्यवहारः थेट रेडी पझेशन फ्लॅट घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाशी व्यवहार करताना बिल्डरला पेमेंट टर्म्सवर सूट देण्याची गरजच नसते.
या गोष्टींचा विचार करता, अंडर-कन्स्ट्रक्शन फ्लॅटमध्ये गुंतवणूक करणं हेच शहाणपणाचं ठरेल. अशा फ्लॅटची कमी किंमत आणि जास्त रिटर्न्सची शक्यता ही तर मुख्य दोन कारणं आहेतच,
शिवाय तुम्हाला फ्लॅटच्या डिझाईनमध्ये तुमच्या
पसंतीनुसार किंवा वास्तुशास्त्रानुसार बदलही करुन घेता येऊ शकतो. बिल्डींग
अजून बांधकामाच्या टप्प्यात असल्यामुळं, बिल्डर (संपूर्ण बिल्डींगच्या
रचनेला धक्का बसणार नसेल किंवा त्याला अवास्तव खर्च करावा लागणार नसेल तर)
मूळ डिझाईनमध्ये तुम्हाला हवे ते बदल करुन द्यायला तयारही होतो. अलीकडं
'सामूहीक खरेदी'चा पर्याय निवडणार्यांनाही अंडर-कन्स्ट्रक्शन
प्रॉपर्टीमधून जास्त फायदा मिळवता येऊ शकतो. यामध्ये, काही ग्राहक एकत्र
येऊन बिल्डरला एकापेक्षा जास्त फ्लॅट्स एकावेळी विकत घेण्याची ऑफर देऊन
त्या सर्वांच्या किंमतीवर घसघशीत सूट मिळवू शकतात. या पद्धतीमुळं
घर-खरेदीच्या व्यवहारात लक्षणीय बचत होऊ शकते.अर्थात अंडर-कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी विकत घेण्यामध्ये काही संभाव्य धोकेही आहेत. उदाहरणार्थ, बांधकाम सुरू करण्यापूर्वी बिल्डरनं आवश्यक त्या सर्व परवान्यांची व कागदपत्रांची पूर्तता केलेली नसणं किंवा प्रोजेक्ट पूर्ण करण्याइतकी बिल्डरची आर्थिक क्षमता नसणं, वगैरे. अशा गोष्टी टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे, त्याच शहरात इतर प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या नामवंत व प्रस्थापित बिल्डर-डेव्हलपरशीच व्यवहार करणं!
http://www.fairdealsangli.com/in-the-news/phletakharedih-redipajhesanakiandara-kanstraksana
फ्लॅट खरेदीः- रेडी पझेशन की अंडर-कन्स्ट्रक्शन?
Sunday, November 18, 2012
भारतीय सिंह
गुजरातमध्ये एक मोठ्ठं जंगल आहे - डांगचं जंगल. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं-झुडपं आणि प्राणी इथं दिसतात. शेकडो वर्षांपासून काही आदिवासी जमाती तिथं राहतात. त्यापैकी एक आहे - मालधारी जमात, 'सासन गीर' जंगलात राहणारी. या जमातीतले लोक गाई-म्हशी पाळून त्यांचं दूध विकतात. जनावरांना चारा, चुलीसाठी लाकडं, आणि इतर गोष्टी त्यांना जंगलातून मिळतात. पण त्याबरोबरच त्यांचा सामना होतो एका बलवान रहिवाशाशी...
आशियाई सिंह!
सासन गीरच्या जंगलातला प्रमुख प्राणी. सबंध जगात 'आशियाई सिंह' फक्त गीरच्या जंगलातच सापडतो. फार पूर्वी, इंग्लंड, ग्रीस, रोम, आफ्रिका, अरबस्तान, आणि आशियात खूप सिंह होते. पण आता ते फक्त आशिया आणि आफ्रिका खंडातच उरलेत.आफ्रिकन सिंह मोकळ्या पठारांवर राहतात. त्यामुळं ते चपळ आणि कुशल शिकारी बनतात. आशियाई सिंहाला मात्र दाट जंगलात रहायला आवडतं. सिंह कळपात राहणारा प्राणी आहे. त्याच्या सोनेरी केसांमुळं पिवळ्या पडलेल्या झाडा-झुडपांतून तो दिसून येत नाही. त्यामुळं त्याचं सावज बेसावध राहतं. मानेवरच्या भरगच्च आयाळीमुळं त्याचे शत्रू मानेचा लचका तोडू शकत नाहीत.
सिंह हा मांसाहारी गटातला मांजर-वर्गीय प्राणी आहे. त्यामुळं त्याच्याकडं तीक्ष्ण दात आणि धारदार नख्या असतात. लपतछपत, हलक्या पावलांनी पाठलाग करून, जवळ आल्यावर झडप घालून तो शिकार करतो. सिंहाची नजर, कान, आणि नाक तीक्ष्ण असतात. तो वास घेत-घेत शिकार शोधतो. त्याच्या डोळ्यांवर ऊन किंवा प्रखर प्रकाश पडला की, डोळ्यांची बाहुली लहान होते. उलट अंधारात बाहुली मोठी होऊन जास्तीत जास्त प्रकाश डोळ्यात जातो. त्यामुळं रात्री अंधारातसुद्धा सिंहाला व्यवस्थित दिसतं - मांजरासारखंच!
शिकारीचं काम सिंहिणींचा कळप करतो. सावजाच्या चारही बाजूंनी सिंहिणी हळूहळू पुढे सरकतात. एका सिंहिणीनं झडप घातली की, सावज उधळतं. पण सगळीकडून वेढलं गेल्यामुळं लवकरच ताब्यात येतं. सिंहिणींनी त्याला ठार मारलं की मग सिंहराज येतात, आणि शिकारीतला मोठा वाटा स्वतःसाठी घेतात.
सिंहांच्या कळपात एक अनुभवी नेता नर असतो. शिवाय पाच-सहा सिंहिणी आणि दोन-तीन लहान सिंह असतात. भरपूर खाद्य मिळणार्या जंगलात ते राहतात. मांजर गटातल्या इतर प्राण्यांपेक्षा सिंहांचं स्वरयंत्र जास्त कार्यक्षम असतं. त्यामुळं ते मोठमोठ्यानं आवाज काढून गोंगाट करत फिरतात.
गीरच्या जंगलात खूप हरिण आणि चितळ आहेत. पण सिंह पूर्वीसारखी त्यांची शिकारच करत नाहीत. उलट, भूक लागली की मालधारी लोकांच्या गुरांची शिकार करतात. यासाठी त्यांना फार कष्ट पडत नाहीत. दिवसभर सावलीत आराम करायचा, आणि रात्री गाई-म्हशींचा फडशा पाडायचा. एक म्हैस सिंहांच्या पूर्ण कळपाला पुरते. शिवाय नंतरचे सहा दिवस शिकार करावी लागत नाही. अंगात शिकारीचं कसब असूनसुद्धा आशियाई सिंह गुराढोरांची सोपी शिकार करू लागलेत. म्हणून गीरचे वन अधिकारी आणि सरकारनं मालधारींना जंगलापासून थोडं दूर हलवलं आहे. शिवाय इथल्या काही सिंहांना दुसर्या अभयारण्यात हलवण्याचा प्रयत्नही केला आहे.
सिंहांसाठी योग्य हवामान आणि जागा शोधणं, हा अभ्यासाचा मोठा विषय आहे. यात खूप अडचणीदेखील आहेत. म्हणून सरकारबरोबरच संस्था आणि नागरिकांनी या कामात स्वतः रस घेतला पाहिजे. सरकारनं गीर जंगलाचं अभयारण्य केलं आहे. त्यामुळं तीनशेहून अधिक सिंह तिथं मुक्तपणे राहतायत. असं होत राहिलं तर, हा जंगलाचा राजा पुन्हा एकदा भारताच्या मातीत स्थिरावेल, आणि पूर्वीसारखंच आपलं शिकारीचं कौशल्यसुद्धा दाखवू लागेल.
भारतीय सिंह
Wednesday, November 14, 2012
तुझको जो पाया...
अब मुझसे क्या छीनेगी दुनिया
तूने किया है जो मुझपर भरोसा
परवाह नहीं अब क्या सोचेगी दुनिया
आंखोंने तेरी जो बातें कही हैं
उनको भला क्या समझेगी दुनिया
तूने किया साथ देने का वादा
अब कैसे मुझसे जीतेगी दुनिया
तुझको जो पाया...
Monday, November 12, 2012
गुँचा कोई मेरे नाम कर दिया...
साकी ने फिर से मेरा जाम भर दिया
तुम जैसा कोई नहीं इस जहाँ में
सुबह को तेरी जुल्फ ने शाम कर दिया
मेहफिल में बार-बार इधर देखा किये
आँखों के जझीरों को मेरे नाम कर दिया
होश बेखबर से हुये उनके बगैर
वो जो हमसे केह ना सके, दिलने केह दिया
(गुँचा = कळी; जझीरा = बेट)
- रॉकी खन्ना / मोहित चौहान
गुँचा कोई मेरे नाम कर दिया...
Sunday, November 11, 2012
सर्व शिक्षा अभियान
"आजची मुले हे उद्याचे निर्माते आणि भविष्यातील नेते आहेत, असे म्हटले जाते, ते योग्यच आहे. महाराष्ट्रात १८ वर्षांखालील मुलांची संख्या ४ कोटी पेक्षा जास्त आहे. हे प्रमाण राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या १/३, इतके जास्त आहे.
‘सर्व शिक्षा अभियान’ – २०१२-१३ साली केंद्र सरकारच्या व्यापक आणि एकात्म पथदर्शी विकास योजनेने बाराव्या वर्षात पदार्पण केले. मुलांच्या शिक्षण हक्कांसंदर्भातील मोफत आणि सक्तीचे शिक्षण अधिनियम (आर.टी.ई.)-२००९, मंजूर होणे, हा या प्रक्रियेतील महत्वाचा भाग होय. 'महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद' हा महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम असून राज्यात एस.एस.ए. अर्थात 'सर्व शिक्षा अभियाना'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा उपक्रम प्रयत्नशील आहे.
या एस.एस.ए. उपक्रमाची अवाढव्य व्याप्ती आणि वित्तीय गुंतवणूक लक्षात घेता, काटेकोर नियोजन आणि सक्त मूल्यमापन गरजेचे ठरते. वार्षिक कामाचा आराखडा आणि २०१२-१३ साठीच्या अर्थसंकल्पाच्या प्रस्तावात १४ जिल्ह्यांवर विशेष लक्ष पुरवण्यासह सार्वत्रिक उपलब्धतता आणि धारकता, दर्जा वृध्दी, सामाजिक गटांमधील तसेच लिंगाधारित विषमता यातील दरी कमी करणे, सामाजिक सहभाग, शालेय पायाभूत सुविधा, व्यवस्थापन आणि देखरेख या बाबींचा समावेश आहे. शालेय विकास आराखड्याअंतर्गत 'शालेय व्यवस्थापन समिती'मार्फत ग्रामीण स्तरावरील शाळांकडून योग्य माहिती आणि नियोजनपूर्व तयारीसाठी काटेकोर तपशील मागवण्यात आले.
प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न वास्तवात आणणे, राज्याचा साक्षरता दर नव्या उंचीवर नेणे आणि राज्यासह देशातील जनतेला सक्षम करण्याची ध्येये आम्हाला प्रत्येक सरत्या वर्षाबरोबर गाठता येतील, अशी आशा आहे."
- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (एम.पी.एस.पी.)
http://mpsp.maharashtra.gov.in
सर्व शिक्षा अभियान
Friday, November 9, 2012
खारीचा वाटा
आजच्या प्रवचनात बुवांनी श्रीरामाला सेतू बांधण्यात मदत करणार्या खारीची गोष्ट घेतली होती. लोक तल्लीन होऊन ऐकत होते. म्हातारीच्या मनात मात्र आज चलबिचल होती. प्रवचन संपताना लोक रोज दक्षिणा-पेटीत पैसे टाकतात हे ती बघत होती. आपण गरीब आहोत, आपण दक्षिणा टाकू शकत नाही, याचं तिला वाईट वाटत होतं. बुवांसाठी इतरांसारखा हार आणू शकत नाही, याची तिला लाजही वाटत होती. प्रभू श्रीरामाची सेवा करण्यात आपण कमी पडतोय, याचं तिला खूप दुःख होत होतं. याच विचारात मग्न असल्यानं आज तिचं कथेकडंही लक्ष नव्हतं. आजूबाजूचे सगळे लोक दानाचं पुण्य कमावून समाधानी दिसतायत, आपण मात्र कमनशीबी, असं तिला वाटत होतं. इतक्यात...
कथा सांगता-सांगता अचानक कीर्तनकार बुवांना मोठ्ठा ठसका लागला. समोर बसलेल्या श्रोत्यांमध्ये चुळबूळ झाली. तीन-चार जण उठून बुवांकडं धावले. म्हातारीलाही काहीतरी करावंसं वाटलं. पण ती जागेवरून उठेपर्यंत बुवांनी शेजारी ठेवलेला पाण्याचा तांब्या उचलला आणि पाण्याचे तीन-चार घोट घेतले. ठसका थांबला. बुवांच्या चेहर्यावर स्मितहास्य तरळलं. श्रोत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आणि सगळ्यात मागं बसलेली म्हातारी पदर तोंडाला लावून खुदकन् हसली. तिनं भरून ठेवलेल्या पाण्याच्या तांब्याची किंमत या प्रसंगी लाखमोलाची होती. हीच तिची सेवा होती. हीच तिची खरी दक्षिणा होती. म्हातारीच्या चेहर्यावर समाधान पसरलं. आणि कीर्तनकार बुवा 'खारीच्या वाट्या'ची गोष्ट पुढं सांगू लागले...
खारीचा वाटा
Thursday, October 11, 2012
मृत्युपत्र - काळाची गरज
मृत्युपत्र - काळाची गरज
Sunday, October 7, 2012
फिर ले आया दिल मजबूर, क्या कीजे
रास न आया, रहना दूर, क्या कीजे
दिल कह रहा, उसे मकम्मल, कर भी आओ
वो जो अधूरी सी, बात बाकी है
वो जो अधूरी सी, याद बाकी है
करते हैं हम, आज कबूल, क्या कीजे
हो गयी थी, हमसे जो भूल, क्या कीजे
दिल कह रहा, उसे मयस्सर, कर भी आओ
वो जो दबी सी, आस बाकी है
वो जो दबी सी, आंच बाकी है
किस्मत को है, यह मंजूर, क्या कीजे
मिलते रहें हम, बादस्तूर, क्या कीजे
दिल कह रहा, उसे मुसलसल, कर भी आओ
वो जो रुकी सी, राह बाकी है
वो जो रुकी सी, चाह बाकी है
(मकम्मल= पूर्ण; मयस्सर= उपलब्ध; बादस्तूर= बेकायदा; मुसलसल= अविरत/अखंड चालू)
स्वानंद किरकिरे/ सईद कादरी/ नीलेश मिश्रा
बर्फी (२०१२)
फिर ले आया दिल मजबूर, क्या कीजे
Sunday, September 30, 2012
बदलाची तयारी
| सांगलीच्या ग्रीन एफएम (९०.४) वर 'आरंभ फाउंडेशन'चं आवाहन ऐकून, कोल्हापूर जिल्ह्यातूनही फोन आले. एका मंडळानं गणपतीची दहा फुटी मूर्ती बसवली होती. एवढ्या मोठ्या मूर्तीचं आणि निर्माल्याचं नदीतच विसर्जन करतात. मूर्तीच्या आकाराबद्दल आणि पीओपी न वापरण्याबद्दल चर्चा करताना मंडळाच्या कार्यकर्त्यानं सांगितलं, "गेल्या दोन-तीन वर्षांपासूनच उत्सवाचं नियोजन आमच्याकडं आलंय. त्याआधी सगळे निर्णय वडीलधारी मंडळी घ्यायची. पेपरमध्ये वाचून आम्हाला पण काहीतरी चांगले बदल करावंसं वाटू लागलंय. मागच्या दोन वर्षांपासून डॉल्बी पूर्ण बंद आहे. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत दांडपट्ट्याचा खेळ ठेवला होता. आमचं गाव छोटं आहे. गावातल्याच भजनी मंडळाला बोलवून, एखाद्या सामाजिक विषयावर प्रवचन द्या असं सांगितलं. पीओपीच्या मूर्तीमुळं नुकसान होतं असं पेपरमध्ये वाचलं होतं, पण तुमच्याशी प्रत्यक्ष बोलल्यावर नक्की काय करायचं ते कळलं. गावातल्या जुन्या माणसांना समजावणं जरा अवघड आहे, पण गावकर्यांच्याच फायद्याची गोष्ट असेल तर आम्ही नक्की प्रयत्न करू. निर्माल्याचा तुमचा मुद्दा एकदम पटला. आता आपापल्या अंगणातल्या झाडांनाच निर्माल्य घालायला सांगतो सगळ्यांना. रेडीओवर तुमचं आवाहन ऐकलं.. नुकसान तर काय होणार नाही, झाला तर फायदाच होईल, असं वाटलं, म्हणून फोन लावला बघा." |
बदलाची तयारी
Friday, September 28, 2012
गणेशोत्सवाचं बदलतं रूप
गणेशोत्सवाचं बदलतं रूप
Thursday, September 27, 2012
इको-फ्रेंडली गणेशमूर्ती
- साचा वापरण्यातल्या मर्यादा: एका साच्यातून एका दिवसात एकच मूर्ती बनवता येते. त्यामुळं जास्तीत जास्त फायबरचे साचे तयार करून घेणं आवश्यक आहे.
- रंगकामासाठी कुशल कारागिरांची गरज: लगदा तयार करणं आणि साच्यात भरणं, या तशा सोप्या गोष्टी आहेत; पण गणपतीच्या मूर्तीचं रंगकाम हा एक अवघड प्रकार मानला जातो. त्यासाठी थोड्या कुशल कामगारांची गरज भासते. असे कारागिर फारसे मिळत नाहीत, आणि मिळाले तर जास्त मजुरी घेतात, ज्यामुळं मूर्तीची किंमत वाढते. यावर एक उपाय म्हणजे, पूर्ण मूर्ती एकाच रंगात रंगवणे. पण, गणपतीच्या मूर्तीची प्रतिमा लोकांच्या मनात अशी वसली आहे की, एकाच रंगातला गणपती, दागिने, शस्त्रं, पीतांबर, या गोष्टी एकाच रंगात पाहणं लोकांना सहज मान्य होणार नाही. दुसरा उपाय अर्थातच कुशल कारागिर शोधणं किंवा तयार करणं.
पुढच्या वर्षी जास्तीत जास्त लोकांनी इको-फ्रेंडली मूर्ती बसवाव्यात असं वाटत असेल तर, तशा मूर्ती बाजारात उपलब्ध करून देणंही आवश्यक आहे. यासाठी काम करायचं असेल तर आत्तापासूनच सुरुवात केली पाहिजे.
मंगलमूर्ती मोरया!
इको-फ्रेंडली गणेशमूर्ती
Wednesday, September 26, 2012
आशादायी गणेशोत्सव
- एक मोठी कायमस्वरुपी मूर्ती आणि एक छोटी उत्सवमूर्ती अशी प्रथा काही मंडळांनी सुरु केली आहे. मोठी मूर्ती वर्षभर कुणाच्या तरी घरी किंवा मंदीरात ठेवली जाते. गणेश चतुर्थीला छोट्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या छोट्या मूर्तीचं विसर्जन करणं सोपं असतं. आता ही छोटी मूर्ती शाडूची किंवा कागदाच्या लगद्याची घेतली जावी, एवढंच बघायचं.
- विसर्जन घाटावर निर्माल्य गोळा करण्यासाठी महापालिकेनं जय्यत तयारी ठेवलीय. काल सातव्या दिवशीच्या विसर्जनासाठी, निर्माल्य कुंडाजवळ सतत महापालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक थांबून होते. विसर्जनासाठी आलेल्या प्रत्येकाला थांबवून निर्माल्य नदीत न टाकण्याची विनंती करत होते. शिवाय, निर्माल्य कुंडात टाकण्यापूर्वी प्लॅस्टीकच्या पिशव्या काढून घेण्याचंही काम सुरु होतं.
- मिरवणुकीवर होणारा खर्च टाळून मंडळांनी, कायमस्वरुपी मंदीराचं बांधकाम, मूर्तीला चांदीचे दागिने, काही हजार लोकांसाठी महाप्रसाद, अशा प्रकारचे उपक्रम सुरु केले आहेत. अजून विधायक आणि समाजोपयोगी उपक्रमांबद्दल मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणं गरजेचं आहे. जितक्या मंडळांशी आम्ही चर्चा केली, त्या सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता एकत्र बसून काही
उपक्रमांची आखणी करायची आहे.
गणपती बाप्पा मोरया!
आशादायी गणेशोत्सव
Monday, September 24, 2012
गणेशोत्सवातल्या सुटलेल्या समस्या
- एकाही सार्वजनिक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजला नाही! ढोल, ताशा, लेझीम, झांज, बँजो, आणि 'मोरया मोरया'चा गजर...
- निर्माल्य नदीत टाकलं जाऊ नये, यासाठी बरेच स्वयंसेवक विसर्जनस्थळी तैनात होते. सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि बहुतांश घरगुती गणपती घेऊन आलेले लोक निर्माल्य कुंडांचा वापर करताना दिसले. शिवाय, महापालिकेचे कर्मचारी निर्माल्य प्लॅस्टीकच्या पिशव्यांमधून काढून कुंडात टाकण्याचं काम करत होते.
- विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विसर्जनासाठी नदीऐवजी कृत्रिम विसर्जन हौदांचा वापर! सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेनं काही ठिकाणी निर्माल्य कलश आणि कृत्रिम टाक्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या-त्या परिसरातल्या नागरिकांनी या कृत्रिम टाक्यांमध्ये विसर्जन केलं.
गणेशोत्सवादरम्यान होणारं सर्व प्रकारचं प्रदूषण आणि त्यावरचे उपाय, यांबद्दल लोकांमध्ये चांगलं प्रबोधन होतंय आणि होईल, याची खात्री पटण्यासारखी परिस्थिती दिसतेय.
गणेशोत्सवातल्या सुटलेल्या समस्या
Sunday, September 23, 2012
विधायक गणेशोत्सवाच्या दिशेने वाटचाल
- बहुतेक सर्व मंडळं निर्माल्य नदीत न टाकता निर्माल्य कुंडातच टाकतायत.
- काही मंडळं गणेशाची प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणुकीशिवाय करतायत.
- काही मंडळांनी स्वतःहून रस्त्यात खड्डे खणून मंडप घालणं बंद केलं असून, आता ते सार्वजनिक मोकळ्या जागेवर किंवा कॉलनीतल्या रिकाम्या प्लॉटवर गणपती बसवतायत.
- काही मंडळांनी भव्य देखावे आणि विद्युत रोषणाईला फाटा देऊन, परिसरातल्या लोकांसाठी मनोरंजक आणि लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलंय.
विधायक गणेशोत्सवाच्या दिशेनं चालताना, आधी नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी होणं आवश्यक आहे. हे सगळे बदल बघून विधायक गणेशोत्सवाबद्दल जास्त विश्वास वाटू लागलाय.
विधायक गणेशोत्सवाच्या दिशेने वाटचाल
Saturday, September 22, 2012
शाडू माती आणि प्लास्टर ऑफ पॅरीस
- शाडूच्या मूर्तीचा आकार लहान असतो आणि वजन जास्त असतं. पाच-सहा फुटी (किंवा त्याहून मोठी) मूर्ती नक्कीच शाडूची नसणार.
- शाडूच्या मूर्तीमध्ये फार नाजूक कलाकुसर करता येत नाही. पीओपीची मूर्ती तुलनेनं फार सुबक दिसते.
- शाडूची रंगवलेली मूर्ती शक्यतो मॅट फिनिशमध्ये येते. जास्त ग्लॉसी रंगवलेली मूर्ती पीओपीची असण्याची शक्यता जास्त असते.
- पीओपीची मूर्ती पाण्यात विरघळत नाही, तिचे तुकडे पडतात. याउलट शाडूची (नैसर्गिक रंगांत रंगवलेली) मूर्ती पाण्यात विरघळून चिखल तयार होतो, जो बागेतल्या झाडांनाही घालता येतो.
जाणकारांनी याविषयी अधिक माहिती पुरवावी, तसंच आजूबाजूच्या मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करावी.
शाडू माती आणि प्लास्टर ऑफ पॅरीस
Thursday, September 20, 2012
शांततामय गणेशोत्सव
"आज कित्येक वर्षांनी गजाननाचं आगमन सुसह्य वाटलं," असं काही ज्येष्ठांनी बोलून दाखवलं.
"बाप्पांच्या घोषणा देऊन घसा बसला पण मन मोकळं झालं," असं मंडळांचे कार्यकर्ते म्हणाले.
"कोण रांडचा डॉल्बी बंद करतोय बघूच," असं उत्सवापूर्वी म्हणणारे काल शांतपणे आपापल्या मंडळांच्या मंडपात बसून होते.
फक़्त पोलिसांनी सक़्ती केली म्हणून डॉल्बी एका वर्षात बंद झाला असं म्हणता येणार नाही. लोकांचाही त्याला अंतर्गत विरोध होताच. काही गोष्टींची सुरुवात सक़्तीनं करावी लागली तरी, लोकसहभागातून त्यांची ताबडतोब अंमलबजावणी होऊ शकते, नाही का?
शांततामय गणेशोत्सवाच्या समस्त सांगलीकरांना शुभेच्छा!
शांततामय गणेशोत्सव
Tuesday, September 18, 2012
सांगलीच्या गणेशोत्सवात तरुणाईचे योगदान
सांगलीच्या गणेशोत्सवात तरुणाईचे योगदान
Sunday, September 9, 2012
Education for every child!
Till August 2012, ECC could enrol around 600 children in schools across Pune city. However, it is observed that only 400 are attending schools regularly. Why are these 200 children still away from school? Here's a quick analysis by ECC:
1. A child of 6 or 7 years age cannot travel/walk/ride to school on its own. It needs some escort for daily commute. Preferably, this escort should be the child's parents, which is hardly possible in case of labourers working on daily wages. (Forget about child's basic psychological need of being with mother or father during its initial exposure to external world!)
Statistics: Out of 400, less than 10 children are being escorted to school by parents. Around 100 children have to walk to the school on their own or in groups.
2. Sarva Shiksha Abhiyan and Education Dept (Shikshan Mandal) of PMC have committed to provide transport facility to children in question. However, the management and logistics part (finding a local van or rickshaw, identifying and verifying needy children, supervising daily transport activity, actual payments and reimbursements, etc) has held back the scheme till date.
Statistics: With the help of few concerned school staff members, close to 130 children are getting benefitted by some or the other means of transport (but with no assured provisions for entire year).
3. As an integral part of taking every child to school, ECC decided to make transport provisions on immediate basis, wherever required. Focus was shifted from new admissions to continuity of already admitted children. Local vans or rickshaws were identified by volunteers and field staff, and transport started at very non-standard rates. It is becoming difficult to arrange funds for everyday transport expenses. Not sure how many days ECC can transport these children. (And more than 50% admissions are still pending...)
Statistics: Around 150 children are using transport facility by ECC, since June 2012. Vans and rickshaws are charging anywhere between Rs.400 and Rs.800 per child per month. (PMC estimate on school transport is Rs.300 per child per month. Daily management and follow-up with rickshaw-wallas is a different story altogether...)
What are possible solutions?
- Parents taking interest in child's education & attendance in school. THE BEST, but most difficult solution!
- Schools and PMC arranging daily transport of children living away from school. Schools need to be empowered (financially and resourcefully) for handling this activity.
- Local citizens volunteering to arrange and monitor the transport (and escort, if possible) on daily basis. A group of concerned senior citizens, professionals, students, ladies, can help the children reach school everyday, safely and surely.
The 'survey--admission--follow-up' process will have to be continued till every child gets its right to education. The campaign is a citizens' initiative. It believes in every citizen's contribution. And it believes - every child counts!
(From http://everychildcounts-pune.blogspot.in/2012/08/ecc-campaign-status-in-august-2012.html )
Education for every child!
Wednesday, August 1, 2012
गुंतवणूकपूर्व अभ्यास महत्त्वाचा
आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) ही इक्विटी मार्केटमधली सगळ्यात खळबळजनक आणि लोकप्रिय घटना असते. खास करून, एखाद्या सुप्रसिद्ध ब्रँडचा आयपीओ येणार असेल तर, गुंतवणूकदार अगदी वेडेपिसे होऊन जातात. अशीच अलिकडची घटना म्हणजे, सोशल नेटवर्किंगचा टॉप ब्रँड - फेसबुक - चा आयपीओ! लाखो इन्व्हेस्टर्स या कंपनीचा एखादा तरी शेअर मिळावा म्हणून धडपड करत होते. अंतिम ऑफर जाहीर होण्यापूर्वीच, इन्व्हेस्टमेंट बँकांनी केलेलं व्हॅल्युएशन अब्जावधीचा आकडा पार करून गेलं होतं. गुंतवणूक क्षेत्रातले रथी-महारथी आपापल्या परीनं या कंपनीच्या किंमतीचा अंदाज लावण्यात गुंतले होते. आणि प्रत्येकाचा आकडा इतरांपेक्षा जास्तच येत होता. पण त्याचवेळी, गुंतवणूक क्षेत्रातल्या एका महान व्यक्तीनं स्वतःला या सगळ्यापासून अलिप्त ठेवलं होतं. ती व्यक्ती म्हणजे... होय, वॉरेन बफे!
वॉरेन बफेंच्या मते, बहुतांश गुंतवणूकदार हे निव्वळ आकर्षक परताव्याच्या आशेनं 'फेसबुक'च्या आयपीओमधे गुंतवणूक करायला निघाले होते. ते म्हणतात, "तुम्ही शेतजमिनीचा एखादा तुकडा का विकत घेता? दुसर्या दिवशी जास्त किमतीला विकून नफा कमवण्यासाठी? केवढं भयानक कारण आहे हे... शेतीसंदर्भात आणि स्टॉकसंदर्भातही!" आयपीओनंतर 'फेसबुक'च्या स्टॉकचा परफॉर्मन्स बघितला तर, पुन्हा एकदा "वॉरेन बफे साब को मानना ही पडेगा" असंच म्हणावं लागेल. 'फेसबुक'च्या आयपीओ प्राइसमधे आतापर्यंत जवळपास १९ टक्क्यांची घट झालीसुद्धा!
गुंतवणूक क्षेत्रातले हे 'पितामह' स्वतः टेक्नॉलॉजी स्टॉक घेणं टाळतातच, कारण हे क्षेत्र आपल्या क्षमतेबाहेरचं आहे असं त्यांना वाटतं. तरीसुद्धा सर्व गुंतवणूकदारांसाठी त्यांनी एक सल्ला दिलाय. 'फेसबुक'मधे गुंतवणूक करणार्यांसाठी वॉरेन बफेंनी दिलेला सल्ला खरं तर अगदीच जुनापुराना आहे - "कुठल्याही कंपनीच्या बेसिक्सचा अभ्यास केल्याशिवाय तिच्यात पैसे गुंतवू नका." कंपनीची कार्यपद्धती, उत्पन्नाचे स्रोत, आणि तिची मुलभूत तत्त्वं समजल्याशिवाय, तिच्या स्टॉकची उपयुक्तता तुम्ही ठरवू शकत नाही. व्हॅल्युएशन नंतरची पुढची पायरी म्हणजे, इंट्रिन्सिक व्हॅल्युची मार्केट प्राइसशी तुलना. इंट्रिन्सिक व्हॅल्युच्या तुलनेत मार्केट प्राइस कमी असेल तरच तो स्टॉक विकत घेण्यायोग्य आहे, अन्यथा नाही.
हा सल्ला समजायला सोपा असला तरी, पाळायला तितकाच अवघड आहे... खास करून, एखाद्या आयपीओ बद्दल बाजारात खूपच हवा तयार झाली असेल तेव्हा! जशी 'फेसबुक'च्या आयपीओबद्दल झाली होती. स्वतः अभ्यास करण्यापेक्षा, चाणाक्ष इन्व्हेस्टमेंट बँकर्सच्या (मार्केटींग) बडबडीवर विश्वास ठेवणं गुंतवणुकदारांनी पसंत केलं. आणि काय मिळालं त्यातून? आपल्या मूल्यवान स्टॉकच्या किंमतीतली पडझड! त्यापेक्षा, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः अभ्यास करणं आणि वॉरेन बफेंचा सल्ला ऐकणं, हेच गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरतं, असं म्हणता येईल. मग गुंतवणूक लिस्टेड स्टॉकमधे असो किंवा आयपीओमधे...दोन्हींसाठी अभ्यास सारखाच महत्त्वाचा!
http://www.fairdealsangli.com/in-the-news/guntavanukapurvaabhyasamahattvaca
गुंतवणूकपूर्व अभ्यास महत्त्वाचा
Sunday, July 22, 2012
Wednesday, June 20, 2012
जेंडर डिस्क्रिमिनेशन
मीः म्हणजे काय रे?
तोः म्हंजि त्यो हापिसात जातुय बायावानी झाडू माराया. आनि फरशी बी पुसतुय बायावानी...
मीः मग? त्यात काय झालं? तू नाही करत घरी ही कामं?
तोः छ्या! म्या न्हाई बायांची कामं करत!
कुठुन येतो एवढ्याशा मुलांमधे हा अॅटीट्यूड? घरातल्या, समाजातल्या मोठ्या माणसांना कळतंय का हे? आपल्या वागण्या-बोलण्यातून 'नकळत' काय बिंबवतोय आपण मुलांच्या मनावर? हे 'नकळत' होणारे कु-संस्कार थांबवले नाहीत तर 'जाणूनबुजून' संस्कार करायचे सगळे प्रयत्न वायाच जातील, नाही का?
जेंडर डिस्क्रिमिनेशन
Tuesday, June 19, 2012
The work has begun now...
1. Locating nearest PMC or ZP schools for children found through surveys;
2. Checking current capacity of these schools with respect to additional enrollments through this campaign;
3. Discussing the situation and immediate possible solutions, with school heads and teachers;
4. Taking the children and their parents to schools on the day of admissions.
The capacity assessment of schools gave big shortfalls at many schools. Discussions with the school heads and teachers went well; however no proactive measures for shortfalls were promised.
PMC schools opened on 15th June. Some transport facility is being arranged by ECC on the first day; however no further plans for everyday transport yet. Sarva Shiksha Abhiyan and Shikshan Mandal of Pune have offered some solutions like - (i) free PMPML bus passes for school-going children; or (ii) schools to arrange local transport through auto-rickshaw or vans, and get reimbursement from PMC. None of the solutions have been finalised yet.
Children are found very very excited about going to school. (A major reason for excitement could be the school bus that they are seeing on day-one...) There is still some resistance or ignorance from some of the parents; however, overall sentiment looks positive. People want their children to be educated; but are holding back - some due to lack of knowledge about schools and admission procedure, others due to fear of fees and academic expenses. A lot of parent awareness is required!
Some parents are visiting the schools along with ECC volunteers. This is a very positive sign, according to the school teachers. This can be considered as a personal success of ECC volunteers. They have worked hard to convince the parents, not only for sending their children but also for being present for the admissions. As of now, the parents are saying that they would look after their children's regular attendance in schools. However, this needs a strong follow-up.
Children across Pune city are being taken to nearest PMC schools. This process will continue until all the children are enrolled in schools. Looks too ambitious? Yes, it is! The survey also looked 'too ambitious' when we planned in November 2011. Apart from school admissions of these children, a 'hidden' agenda of this campaign was to involve citizens in the RTE implementation. To some extent, this campaign has been successful in doing that. Citizens from all over Pune have come foreward to contribute in surveying, teaching, enrolling, and talking-writing-discussing about the Right To Education Act! The school admissions will continue for some time, then facilities at government schools will be checked, then quality of education will be monitored. All this will be done through citizens' force!
Thank you volunteers for your hard work! Sorry, but there's no time for rest. The work has begun now. Hope you all are and will be with us... Because, every child counts!
The work has begun now...
स्वप्न माझे आसवांनी बुडवले...
निष्ठेने माझ्याच एकटे पाडले
जीवनातली तहान नाही सरली
गीत प्रेमाचे न पूर्ण जाहले
वार त्याचा हा असेल अखेरचा
आशेवर या वार सारे सोसले
नष्ट केले मी जरी माझे मला
दोघांमधले अंतर नाही संपले
(हसन कमाल यांच्या 'दिल के अरमां' या प्रसिद्ध हिंदी गाण्याचं मराठी रूपांतर)
स्वप्न माझे आसवांनी बुडवले...
Sunday, June 10, 2012
साधो, सहज समाधि भली।
तनिक कष्ट नहीं धारौं।
खुले नैन पहचानौं हँसि हँसि
सुंदर रूप निहारौं।।
जहँ जहँ डोलौं सो परिकरमा,
जो कुछ करौं सो सेवा।
जब सोवौं तब करौं दंडवत,
पूजौं और न देवा।।
कहौं सो नाम, सुनौं सो सुमिरन
खावँ पियौं सो पूजा।
गिरह उजाड एकसम लेखौं
भाव मिटावौं दूजा।।
सबद निरंतरसे मन लागा
मलिन वासना त्यागी।
ऊठत बैठत कबहुँ न छटैं
ऐसी तारी लागी।।
- कबीर
साधो, सहज समाधि भली।
Friday, June 1, 2012
संस्कृती
म्हणून बसले नाही रडत
कधी दुर्लक्ष, कधी खूपच 'लक्ष'
राहिले सगळं सोसत
सांगणार कुणाला?
ऐकणार कोण?
बाप म्हणाला, ओरडू नकोस
आपण आहोत सुसंस्कृत
आई म्हणाली, बोलू नकोस
कारण आपण सुसंस्कृत
समाज म्हणाला, सांगू नकोस
आम्ही फारच सुसंस्कृत
माझ्या नशिबी चिताही नाही
चितेतली लाकडंही सुसंस्कृत
...चुलीत घाला ही संस्कृती!
संस्कृती
Thursday, May 31, 2012
भारत बंद
वो ही आज अकलमंद है
सुनिए सुनिए आज सारा भारत बंद है
पेट्रोल बढी, गैस भी बढी,
तो फिर तनखा कहाँ चंद है
सुनिए सुनिए आज सारा भारत बंद है
बसें जलाई, शीशे तोडे,
अपने ही लोगों से ये कैसी जंग है
सुनिए सुनिए आज सारा भारत बंद है
देश का धंदा बंद कर डाला,
ये देशप्रेम का कौनसा रंग है
सुनिए सुनिए आज सारा भारत बंद है
नारे लगाओ, रैली निकालो,
किस जश्न में 'जनता' दंग है
सुनिए सुनिए आज सारा भारत बंद है
भारत बंद
Wednesday, May 2, 2012
छोडो भी...
छोडो भी नजरें ये सब जानती हैं
छुपाए राज कितने सीने में
छोडो भी हवाएँ सब जानती हैं
वफादारी की खाई कसमें कितनी
छोडो भी हसिनाएँ कहाँ मानती हैं
छोडो भी...
Tuesday, March 27, 2012
शिक्का
विश्वास नात्यावरुन उडाला, दुःख आहे
नाही मिळाले जे हवे ते, हरकत नाही
मागण्याचा हक्क गेला, दुःख आहे
वेळ वाया गेला तुझ्यामुळे, हरकत नाही
खूपच वाया गेला याचे दुःख आहे
विसरली पावसाची गाणी, हरकत नाही
येत नाही डोळ्यात पाणी, दुःख आहे
ओळखले नाही मला तू, हरकत नाही
तरी मारला शिक्का याचे दुःख आहे
शिक्का
Tuesday, March 13, 2012
अनादि मी - स्वातंत्र्यवीर सावरकर
मारील रिपु कवण असा जगति जन्मला ॥
धर्मरक्षणार्थ तो शस्त्रजारणी
अट्टाहास खड्गपाणी करि जई दणी
न देह अग्नि जाळीतो, न खड्ग भंगितो
मलाचि भिऊनि भ्याड रिपु पळत सुटतो
तथापि या मृत्युच्या भये
खुळा हा शत्रू मजसि भिववू ये
अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला
मारील रिपु कवण असा जगति जन्मला ॥
- स्वातंत्र्यवीर सावरकर
(आत्मबल)
अनादि मी - स्वातंत्र्यवीर सावरकर
Saturday, March 10, 2012
Saturday, March 3, 2012
रडत नाही, लढतोय!
रडतोय रडतोय, मी रडतोय रडतोय
मिळत नाही मागेन ते म्हणून
रडतोय रडतोय
मीः
लढतोय लढतोय, मी लढतोय लढतोय
मागणार नाही, घेण्यासाठी
लढतोय लढतोय
तोः
रडतोय रडतोय, मी रडतोय रडतोय
काय झालं काय होईल म्हणून
रडतोय रडतोय
मीः
लढतोय लढतोय, मी लढतोय लढतोय
केलं मीच करणार मीच, बघ
लढतोय लढतोय
तोः
रडतोय रडतोय, मी रडतोय रडतोय
माझं हे माझं ते, हरवेल म्हणून
रडतोय रडतोय
मीः
लढतोय लढतोय, मी लढतोय लढतोय
माझी हिम्मत माझं जग, हात तर लाव
लढतोय लढतोय, मी लढतोय लढतोय
रडत नाही तुझ्यासारखा मी
लढतोय लढतोय
पटत नाही ते बदलण्यासाठी
लढतोय लढतोय
सुंदर भविष्य घडवण्यासाठी
लढतोय लढतोय, मी लढतोय लढतोय
रडत नाही तुझ्यासारखा मी
लढतोय लढतोय!
रडत नाही, लढतोय!
हम देखेंगे
वो दिन की जिसका वादा है, जो लौहे-अज़ल पे लिखा है
हम देखेंगे
जब जुल्मो-सितम के कोहे-गरां, रुई की तरह उड़ जाएंगे
हम महकूमों के पांव तले, ये धरती धड़-धड़ धड़केगी
और अहले-हिकम के सर ऊपर, जब बिजली कड़-कड़ कड़केगी
हम देखेंगे
जब अर्ज़े-खुदा के काबे से, सब बुत उठवाए जाएंगे
हम अहले-सफा मर्दूदे-हरम, मसनद पे बिठाए जाएंगे
सब ताज उछाले जाएंगे, सब तख्त गिराए जाएंगे
हम देखेंगे
बस नाम रहेगा अल्लाह का
जो गायब भी है हाज़िर भी, जो मंज़र भी है नाज़िर भी
उठ्ठेगा अनलहक़ का नारा, जो मैं भी हूं और तुम भी हो
और राज़ करेगी खल्क़े-खुदा, जो मैं भी हूं और तुम भी हो
हम देखेंगे
- फैज़ अहमद फैज़
लाज़िम : जरुर
लौहे-अज़ल पे लिखा : विधीलिखित
कोहे-गरां : दुर्लंघ्य पर्वत / अडचणींचे डोंगर
रुई : कापूस
महकूम : क्षूद्र
अहले-हिकम : जुलमी लोक
बुत : मूर्ती / पुतळा
अर्ज़े-खुदा के काबे से : ईश्वराच्या दरबारातून
अहले-सफा : सज्जन
मर्दूदे-हरम : धर्मातून बहिष्कृत
मसनद : गादी / सत्ता
मंज़र : दृश्य
नाज़िर : बघणारा
अनलहक़ : अहंब्रह्मास्मि / मीच ईश्वर आहे
खल्क़े-खुदा : परमेश्वराची लेकरं
हम देखेंगे
Friday, March 2, 2012
Together, We Can!
There are marginalised sections of society, unaware and deprived of benefits of education. They call it their fate, we call it our failure. If a certain part of the society is trailing on development, how can we dream of all-inclusive growth? It is unfortunate to see our society, after so many years of complete freedom, struggling for basic needs, including education. And we refuse to blame the Government, until we have done our bit.
We, the other part of this paralysed society, the 'responsible' citizens, thought about delivering fruits of education to those who really need them. No, we cannot teach. Not every one of us. That's not even required. There are (have to be) enough number of government schools in Pune, to admit all children in the city. For some reasons, the classrooms are vacant and streets are full of education-deprived children of all ages. We thought, let's start with bridging this gap. Let's ensure every child reaches school. We, a group of people interested in child education, came together, discussed, and figured out how to do this. Under the guidance of veterans in the field of education, and with the enthusiasm of young and willing activists from Pune, the 'Every Child Counts' team is ready with a primary plan, waiting for thousands of hands joining the cause.
We believe that every child counts. And we are trying to sow this feeling in every citizen's mind. Yes, this has to be a citizens' campaign. It's not always the parents who do not admit their children in school. It's not always the government that fails to deliver free and compulsory education to every child. It's sometimes us, the citizens who are enjoying fruits of education, but not passing them on to every child. Let's make this happen now. Let's all join hands to ensure that every child gets its right of education.
The goal is simple. By June-2012, let's ensure that every child of 6-7 years age is admitted to neighbourhood school. We still have six months in our hands. Let's find out every out-of-school child and send it to school. The volume may be too high, but we are sure, if every citizen contributes, the goal can be achieved. There are numerous activities for every citizen to contribute in. The campaign needs IT support, government support, legal support, financial support, media support, and support in many more areas.
Let's do this for once. Let's kick-start the progress-express for next generation.
To join Every Child Counts campaign,
please write to everychildcounts.pune@gmail.com or
call Rajani Paranjpe at 9371007844 or
call Mandar Shinde at 9822401246.
For more details,
visit http://everychildcounts-pune.blogspot.com or
join us at http://on.fb.me/eccpune or
follow us on http://twitter.com/eccpune
Together we can. And we will!
http://everychildcounts-pune.blogspot.in/2011/12/together-we-can.html
Together, We Can!
Wednesday, February 15, 2012
Saturday, February 11, 2012
दादा कोंडकेंची कविता...
दादाः मयतीला कुणाला बोलवायचं?
सबनीसः बाळ कोल्हटकरांना बोलवूया.
दादाः नको, नको, मुडदा राहिला बाजूला आणि उगाच 'डी' वर 'डी' च्या फुटकळ कवितेच्या उड्या पडतील मयतावर. नको.
यावर सबनीस रागावले. त्यांना 'दुर्वांची जुडी' नाटक खूप आवडायचं. बाळ कोल्हटकरांबद्दल खूप आदर होता. ते दादांना म्हणाले, कोल्हटकरांच्या 'जुडी'ची टिंगल करताय. एक तरी 'डी' वर 'डी' ची फुटकळ का होईना कविता तुम्हाला आत्ता म्हणता येईल का?
सगळ्यांना वाटलं की दादांची बोलती बंद होणार, पण कसचं काय? त्यांनी प्रेक्षकांत बसलेल्या बाळ कोल्हटकरांकडे बघत 'ऑन द स्पॉट' कविता सुरू केली -
सुंदर पोहे पातळ पातळ
खमंग तुकडे खोबरे पुष्कळ
शेंग, चुरमुरे अन् डाळ
या सर्वांनी, विविध चवींनी
असा बनविला चविष्ट चिवडा
पडते त्यावर 'उडी'
बांधतो ही चिवड्याची 'पुडी'
यावर प्रचंड हशा उसळला...
बाळ कोल्हटकरांनी प्रेक्षागारातून दादांना वंदन करुन, त्यांच्या उत्स्फूर्ततेला दाद दिली.
- सुधीर गाडगीळ
'आठवणी लेखणी अन् वाणीच्या' (ग्राहकहित दिवाळी २०११)
दादा कोंडकेंची कविता...
Friday, January 13, 2012
सहावं वरीस शाळेचं...
सहावं वरीस शाळेचं गं सहावं वरीस शाळेचं
मिळाला मोका शिकण्याचा, अ आ इ ई वाचण्याचा
पाठीवरती दप्तर घेतलं आणि चालणं ठेक्याचं
सहावं वरीस शाळेचं...
बाराखडी मी शिकली गं, मला गणितं सुटली गं
पाटीवरती सांडु लागलं टपोरं अक्षर मोत्याचं
सहावं वरीस शाळेचं...
ओढ लागली शिकण्याची, शाळेमधल्या गमतीची
आज मला हे गुपित कळलं माणूस मोठ्ठा बनण्याचं
सहावं वरीस शाळेचं...
http://everychildcounts-pune.blogspot.com/2012/01/blog-post_13.html
सहावं वरीस शाळेचं...
Monday, January 2, 2012
आपण दोघे
मला नाही सवड आपलंच रडं रडण्यातून
भेटणार आपण दोघे कसं आणि कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही
कळत तुला नाहीच रे कितीही मी सांगून
ऐकत मीही नाही खरं तू रोज-रोज बोलून
संवादाचं नाटक असं करायचं हे कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही
सुख म्हणजे नक्की काय करावंसं वाटतं
तुझ्या कुशीमध्ये फक्त शिरावंसं वाटतं
पैसा आणि सोयींचे हे डोंगर रे कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही
नात्यातून या मला अरे खूप बळ हवंय
तुझं मन माझं मन जवळ-जवळ हवंय
तुला मी मला तू आणखी कोण कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जेव्हा वाटत राही
आपण दोघे














