ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, January 14, 2011

ज्युलियन असांजः जगाला विकीलीक्सची गरज का आहे? (Video)वादग्रस्त वेबसाईट 'विकीलीक्स' संवेदनशील अधिकृत कागदपत्रं आणि व्हिडीओ मिळवून प्रसिद्ध करते. संस्थापक ज्युलियन असांज, जे चौकशीसाठी अमेरिकी अधिकार्‍यांना हवे आहेत, ते बोलताहेत 'टेड'च्या ख्रिस अँडरसन सोबत, ही साईट कशी चालते, तिनं काय साध्य केलंय - आणि त्यांना स्फूर्ती कुठुन मिळते, यांबद्दल.
(Click 'View subtitles' and select 'Marathi')

Share/Bookmark

Tuesday, January 11, 2011

ज्युलिया स्वीनी यांचं "ते" संभाषणजेव्हा ज्युलिया स्वीनींच्या ८ वर्षांच्या मुलीनं बेडकांच्या प्रजननाबद्दल शिकण्यास सुरुवात केली - आणि त्यानंतर हुशारीनं काही प्रश्न विचारले, तेव्हा सत्यकथनाचा कितीही प्रयत्न केला तरी ज्युलिया स्वीनींना शेवटी धडधडीत खोटं बोलावंच लागलं.
(Click 'View subtitles' and select 'Marathi')

Share/Bookmark

सुनिता कृष्णनचा लैंगिक गुलामगिरीविरुद्धचा लढा (Video)सुनिता कृष्णन यांनी आपलं आयुष्य वेचलं स्त्रिया आणि मुलांना मुक्त करण्यासाठी लैंगिक गुलामगिरीतून, जो एक करोडो रुपयांचा वैश्विक बाजार आहे. या साहसपूर्ण भाषणात, त्या सांगताहेत तीन जबरदस्त गोष्टी, सोबत स्वतःची कथा सुद्धा, आणि या तरुण पिडीतांना त्यांचं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी अधिक माणुसकीच्या दृष्टीकोनातून मदत करण्याचं आवाहनही करताहेत.
(Click 'View subtitles' and select 'Marathi')

Share/Bookmark

स्वामी दयानंद सरस्वतीः करुणेचा अभ्यासपूर्ण शोधस्वामी दयानंद सरस्वतींनी, वैयक्तिक विकास व करुणेच्या जाणीवेचे समांतर मार्ग आपल्यासमोर उलगडले आहेत. असहाय्य अर्भकावस्थेपासून, इतरांची काळजी घेण्याइतपत निर्भय होण्यापर्यंतच्या आत्मबोधाच्या सर्व पायर्‍या ते आपल्याला दाखवतात.

(Click 'View subtitles' and select 'Marathi')

Share/Bookmark

इमाम फैजल अब्दुल रौफः अहंकार सोडा, दयाळू बनाइमाम फैजल अब्दुल रौफ, कुराण, रुमीच्या कथा, आणि मोहम्मद व येशूच्या उदाहरणांतून दाखवून देतात की, आपल्यातील प्रत्येकाला दयाळू बनण्यापासून रोखणारी एकच गोष्ट आहे - आपण स्वतः

(Click 'View subtitles' and select 'Marathi')

Share/Bookmark

नंदन निलेकणी यांच्या भारताच्या भविष्याबद्दलच्या कल्पना (Video)आउटसोर्सिंगमध्ये अग्रेसर असलेल्या 'इन्फोसिस'चे दूरदर्शी प्रमुख कार्यकारी अधिकारी, नंदन निलेकणी, भारताची सध्याची प्रगतीची घोडदौड सुरू राहिल की नाही, हे ठरविणार्‍या चार प्रकारच्या कल्पना समजावत आहेत.

(Click 'View subtitles' and select 'Marathi')

Share/Bookmark

शुक्ला बोसः एका वेळी एका मुलाचं शिक्षण (Video)शुक्ला बोस यांच्या मते, गरीबांचं शिक्षण म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नव्हे. त्या आपल्या परिक्रमा ह्युमॅनिटी फाउंडेशनबद्दल सांगत आहेत, जे निराशाजनक आकडेवारीच्या पलीकडं जाऊन आणि प्रत्येक मुलाला स्वतंत्र व्यक्ती मानून, भारतातील झोपडपट्ट्यांमध्ये आशेचा किरण आणत आहे.

(Click 'View subtitles' and select 'Marathi')

Share/Bookmark

केन रॉबिन्सन म्हणतात - शाळा मारुन टाकतात निर्मितिक्षमता (Video)सर केन रॉबिन्सन एका मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण संभाषणातून मांडत आहेत संकल्पना एका अशा शिक्षण व्यवस्थेची जिथं निर्मिताक्षमता (दडपली जाण्याऐवजी) जोपासली जाते.
(Click 'View subtitles' and select 'Marathi')

Share/Bookmark