ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde
Showing posts with label चारोळी. Show all posts
Showing posts with label चारोळी. Show all posts

Sunday, October 9, 2016

आठवण


या घराच्या चार भिंती..
वाट पाहती रोज तुझी,
रोजच होतो भास तुझा अन्
आठवण येते रोज तुझी...


Share/Bookmark

Saturday, July 30, 2011

आरसा

चढवितोस आठी अपुल्या कपाळी
पाहूनी आरशात जेव्हा तू स्वतःला,
बसविलाच नाही आरसा म्हणूनी
देतो धन्यवाद तेव्हा मी स्वतःला.

Share/Bookmark

Wednesday, July 6, 2011

शब्द

जे मनात माझ्या होते,
शब्दांतून व्यक्त ते झाले,
तू मनात या शिरताना,
ते शब्दही परके झाले...

Share/Bookmark

Friday, May 20, 2011

चूक

चुकतात अंदाज अन्‌ चुकतात निर्णय काही
चुकलेल्या निर्णयांवर अडणारा मी पण नाही,
वाट एखादी चुकण्यात दोष कुणाचा नाही, पण
चुकलेल्याच वाटेवर चालून मिळणार किनारा नाही

Share/Bookmark

Saturday, April 23, 2011

कशी विसरशील मला?

कशी विसरशील मला?
कारण परत येणार आहे
येत राहणार आहे
दरवर्षी... पावसाळा !

Share/Bookmark

Tuesday, December 7, 2010

वचन

वचन नको देऊस
उगाचच अपेक्षा वाढतील,
'प्रयत्न करते' म्हण
कदाचित मनेही जुळतील.

Share/Bookmark

Sunday, June 13, 2010

अंतर

तुझी आठवण माझ्या मनात
सलत राहते एकटेपणात,
वाटते दोघांमधले अंतर
विरुन जावे एका क्षणात...

Share/Bookmark

स्वप्न-स्मृती

स्वप्नातले जग तुझे नि माझे
स्वप्नामध्ये मी पाहतो,
जागेपणी त्या स्वप्न-स्मृती
श्वासांत माझ्या गुंफतो...

Share/Bookmark

नकळत

खरंच आपल्याही नकळत
आपण किती जवळ आलो,
एकमेकाला जिंकण्याच्या नादात
किती सहज दोघंही हरलो...

Share/Bookmark

प्रेम

माणसानं आयुष्यात
एकदातरी प्रेम करावं,
तीरावर नाही पोहोचलं
तरी भिजण्याचं सुख लुटावं...

Share/Bookmark

कडवे

माझे जीवनगाणे
मलाच गायचे आहे,
तुझेही एक कडवे
त्यात गुंफायचे आहे...

Share/Bookmark

स्वभाव

भावनांच्या विश्वात
व्यवहाराचा अभाव असतो,
स्वप्नातच रमण्याचा
एखाद्याचा स्वभाव असतो...

Share/Bookmark