ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde
Showing posts with label मुक्तविचार. Show all posts
Showing posts with label मुक्तविचार. Show all posts

Saturday, July 18, 2020

Written Vs Spoken Marathi

     लेखी मराठी मजकूर वाचून निवेदन करताना बोलीभाषेत 'लाईव्ह कन्व्हर्जन' करण्याची बहुतेक निवेदकांना सवय असते.
     उदाहरणार्थ, छापील वाक्य जर असे असेल - "आजच्या प्रमुख पाहुण्यांनी याच महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले व आपल्या माता-पित्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले."
     तर निवेदक बोलताना असे म्हणतील - "आजच्या प्रमुख पाहुण्यांनी याच महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि आपल्या माता-पित्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं."
     यासंदर्भात एक किस्सा (बहुतेक सुधीर गाडगीळांकडून) ऐकलेला आठवतो, तो असा -
     छापील वाक्य होते - "ललित साहित्याचा इतिहास सांगताना खांडेकर, खरे, खोटे, काळे, फडके, अशा अनेक प्रतिभावान लेखकांची नावे आवर्जून घ्यावी लागतील."
     हे वाक्य निवेदनाच्या धुंदीत असे वाचले गेले - "ललित साहित्याचा इतिहास सांगताना खांडेकर, खरं, खोटं, काळं, फडकं, अशा अनेक प्रतिभावान..."


Share/Bookmark

Saturday, July 6, 2019

संस्कृती

हाताने लिहिलेले रंगवलेले फलक नाहीत, त्याजागी सुरेख रंगीत फ्लेक्स प्रिंटिंग केलेले प्लास्टिकचे (पावसात न भिजणारे) बोर्ड... लहान-लहान मुलींना नऊवारी साड्या 'नेसवलेल्या' नाहीत, त्याऐवजी 'शिवलेल्या' साड्या आणि धोतरं मुला-मुलींनी चढवलेली... ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांचा तोंडाने जयघोष नाही, पण स्पीकरवर कर्कश्श आवाजात अजय-अतुलचं 'माऊली माऊली' वाजतंय... अशा प्रकारे, पहाटे-पहाटे ११ वाजता, ट्रॅफिकच्या वेळेत रस्त्यावरून ट्रॅफिकची वाट लावत, पुढच्या पिढीला आपल्या महान संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी 'प्रभातफेरी' येत आहे हो sss. बोला फ्लेक्स प्रिंटिंगवाले हारी विठ्ठल.. श्री अजय आणि अतुल राम राम.. संस्कृती बचाव मंडळ की जय !!


Share/Bookmark

Thursday, May 25, 2017

रिटायरमेंट

काम करायची इच्छा आणि क्षमता असणार्‍यांना जबरदस्ती ५०/५८/६० व्या वर्षी रिटायर करून २५/३५/४५ वयाच्या अकार्यक्षम आणि अनिच्छेने काम करणार्‍या लोकांना फुकट संधी देणारा सेवानिवृत्तीचा नियम मला चुकीचा वाटतो. दरवर्षी परफॉरमन्स रिव्ह्यू करायचा आणि काम सुरु ठेवायचं की बंद करायचं ह्याचा निर्णय घ्यायचा. मग वय ६० वर्षं झालं की ७०, ह्याचा काय संबंध?

An interested and capable person is forcefully retired from work at 50/58/60 years of age, while inefficient and disinterested persons of 25/35/45 years age are given more opportunities to work. I feel this rule is based on totally wrong assumptions. Decision of continuing to work or not can be based on a periodic performance review, not on whether the person turns 60 years old or 70.


Share/Bookmark

Friday, January 20, 2017

जगण्याची जत्रा

जगात कुणाचंच कुणावाचून काहीच अडत नाही. आपण केलं नाही म्हणून काहीही घडायचं रहात नाही. आपल्यावाचूनच जग चालणार असेल, तर आजूबाजूला घडणा-या घटनांमधे भाग का नाही घ्यायचा? या सर्व घटनांमध्ये भाग घेऊन जगाची आणि जगण्याची मजा लुटायची संधी प्रत्येकाला असते. ही संधी ओळखून भाग घेणारा स्वतः आनंद मिळवतो आणि इतरांनाही देतो. ही संधी न ओळखणारा किंवा ओळखूनही बाहेर राहणारा स्वतःच कोरडा राहतो. त्याच्याशिवाय काही घडायचं रहात नाहीच. या जगण्याच्या जत्रेत येऊन, हाताची घडी घालून गंभीर चेह-यानं कोप-यात उभं राहण्यात काय मजा? आलोच आहोत जत्रेत तर, फुगे फोडू, पाळण्यात बसू, आइस्क्रीम खाऊ, पिपाण्या वाजवू, खेळणी घेऊ, सगळं करु... नाहीतर जत्रेत यायचंच कशाला?

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६


Share/Bookmark

Wednesday, November 9, 2016

काळा पैसा - गोरा पैसा

सगळा काळा पैसा पाचशे-हजारच्या नोटांची थप्पी लावून लपवून ठेवलेला नसतो, हे मला माहित्येय. कॅशमधल्या काळ्या पैशाहून सोनं, जमीन वगैरे रुपात जास्त संपत्ती साठवलेली आहे, हेही मान्य. तरीसुद्धा, 'बेहिशेबी' कॅशवाल्यांना बसणारा फटका जबरदस्त आहे याबद्दल शंका नाही. पाचशे-हजाराच्या नोटा अचानक रद्द करण्याचा निर्णय इमोशनल आहे, पण हरकत नाही. आपण अशी 'कॅश' कमवू / खर्चू शकत नाही याचं इतके दिवस ज्यांना वाईट वाटत आलं असेल तेच काल सुखानं झोपले असतील. जय हो!



Share/Bookmark

Thursday, October 27, 2016

पास-नापास

परीक्षा नक्की कशासाठी? नो डिटेन्शन पॉलिसी म्हणजे काय? कुणालाही नापास करण्याचा नक्की हेतु काय? मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी परीक्षा हवी की चाचणी हवी? मुळात परीक्षा पद्धत सुरु करणं किंवा न करणं राज्य सरकारच्या हातात तरी आहे का? मुलांना शिकवण्यापेक्षा, त्यांना शाळेत यावंसं वाटेल असं वातावरण बनवण्यापेक्षा शाळेत येणा-या मुलांना नापास करायची कसली घाई आहे? परीक्षा नाही म्हणून मुलं शिकत नाहीत असं म्हणणा-यांनी परीक्षा असताना आपण खरंच काय शिकलो यावर प्रामाणिकपणे विचार करावा, असं मला वाटतं...




Share/Bookmark

Wednesday, October 26, 2016

टीव्ही आणि आपण

घरात टीव्ही असावा की नसावा हे ज्याचं त्यानं ठरवावं. आमच्याकडं मात्र खूप वर्षांपासून नाही. आम्हाला सिनेमे बघायला आवडतं. ते आम्ही थिएटरमधे किंवा सीडी आणून लॅपटॉपवर बघतो. अगदीच ब्रेकिंग न्यूज बघायची असेल तर युट्युब आणि न्यूज चॅनेलच्या वेबसाईट असतातच. बाकी जेवताना, चहा पिताना, नाष्टा करताना आम्ही टीव्हीच्या स्क्रीनऐवजी एकमेकांकडं तोंड करून बसतो. कामाचा कंटाळा आला की एकमेकांशी गप्पा मारतो, पुस्तकं वाचतो, फिरायला जातो. अर्थात, हा आमचा अनुभव आहे, पण टीव्ही असावा की नसावा हे ज्याचं त्यानं ठरवावं...


Share/Bookmark

Sunday, October 16, 2016

पैसा फेको...

आजच्या 'लोकसत्ता'मधे अर्धं पान भरुन एका बाईंचा 'वास्तुशास्त्रातील अनुभव' छापून आलाय. यामधे 'समुद्रातील एका नकारात्मक शक्ती'मुळं घरात रक्ताचे थेंब व रक्ताच्या पावलांचे ठसे उमटण्याबद्दल आणि चोवीस तास 'चांटिंग मशिन' चालू ठेऊन या समस्येचं निराकरण कसं केलं याबद्दल लिहिलं आहे. लग्न न जुळणा-यांची पैजेवर लग्नं लावणा-या कुठल्या तरी 'अण्णां'ची पण अशीच अर्धं पान जाहिरात 'लोकमत' वगैरे पेपर नेहमी छापतात. 'सकाळ'वाल्यांनी तर जन्माआधीपासूनच संस्कार करणारे लोक नेहमीच झळकवत ठेवलेत. 'वर्तमानपत्रात छापल्या जाणा-या जाहिराती आणि लेखांशी संपादक सहमत असतीलच असे नाही' अशी एक ओळ कुठल्यातरी कोप-यात छापली की संपादक अख्ख्या जगाला शहाणपण शिकवायला मोकळे होतात. तात्पर्य - पैसा फेको, कुछ भी छापून आणो! समाजप्रबोधनाचा आव आणून बौद्धिक अग्रलेखांची मक्तेदारी जपणा-या संपादकांना असल्या अंधश्रद्धा पसरवणा-या आणि फसवणूक करणा-या जाहिराती आणि लेख का छापावे लागतात? जागरुक पत्रकार-संपादक मित्र-मैत्रिणींनी कृपया मार्गदर्शन करावे...


Share/Bookmark

Friday, September 23, 2016

सिंहाचे दात मोजणारी जात, वगैरे वगैरे

"सिंहाच्याजबड्यातघालुनीहात मोजतीदातअशीहीजात मराठ्याची!" असं एका दमात म्हणायला लहानपणी फार्फार मज्जा यायची. खास करुन, ही अशी स्फूर्तिदायी डर्काळी फोडण्याचा जन्मसिद्ध हक्क आपल्यालाच मिळालेला आहे, या गोष्टीचा जाज्वल्य अभिमानही वाटायचा. पाठांतर चांगलं असलं तरी, आवाज खणखणीत असला तरी, उच्चार शुद्ध असले तरी - म्हणजे सिंहाला शिंव्व नव्हे तर सिंहच म्हणता येत असलं तरीसुद्धा ही गर्जना फक्त आपणच करु शकतो, आपले इतर मित्र नाही, कारण आपण शहाण्णव कुळी मराठ्यांच्या खानदानात जन्माला येण्याचा पराक्रम केलाय, अशी लहान असताना माझीही समजूत होती, पण... पण मग मी मोठा झालो! आडनावाच्या पंखांखालून बाहेर आल्यावर, अमक्याचा पुतण्या - तमक्याचा भाऊ अशा ओळखी चालणार नाहीत अशा ठिकाणी जगावं लागल्यावर लक्षात आलं की सिंहाच्या (त्येच त्ये शिंव्वाच्च्या) जबड्यात हात घालून काय त्याचं रूट कॅनाल करणार आहोत का आपण? त्यापेक्षा एखाद्या आपल्यासारख्याच हाडामांसाच्या माणसाच्या मनात घर करता आलं तर जास्त चांगलं नाही का?

Share/Bookmark

'मराठा क्रांती मोर्चा'च्या निमित्तानं...

गुरुवारच्या 'लोकसत्ते'तलं व्यंगचित्र सध्याच्या 'मोर्चा'मय वातावरणावर मार्मिक भाष्य करणारं आहे. खिडकीतून बाहेर जमलेली गर्दी पाहणा-या नेत्याला सहाय्यक सांगतोय, "फारच भव्य! त्यातील काहींना पाणी पाहिजे, काहींना नोक-या तर काहींना कर्जमुक्ती! इतकंच नव्हे तर त्यातील दहा पंधरा जणांना मुख्यमंत्रिपदही पाहिजे!!"

**********

'माझी फिल्लमबाजी'मधे शिरीष कणेकर म्हणतात, "सभेला किती लोक आले हे कोण आणि कसं मोजतं? म्हणजे, डोकी मोजावीत तर तिथं जमलेल्यांपैकी कितीजणांना ती असतात माहिती नाही. बरं, पाय मोजून भागाकार करावा तर दोनानं भागावं की चारानं हाही प्रश्नच!" :-)

**********

शक्यतो आजूबाजूला घडणा-या प्रत्येक गोष्टीची पॉझिटीव्ह बाजू शोधण्याची मला सवय आहे, सहसा निगेटीव्ह विचार मी करत नाही. पण जन्मावरुन ठरणा-या जातीचा अभिमान व्यक्त करण्यासाठी आणि जातीआधारित शक्तिप्रदर्शन करण्यासाठी एकत्र रस्त्यावर उतरलेल्या गर्दीकडून कसल्याही विधायक आणि समाजोपयोगी कार्याची मला स्वतःला अपेक्षा नाही. लाखो लोकांनी एकत्र येण्यामागं जन्माधारित जातीची अट असणं हा गेल्या शेकडो वर्षांत समता आणि बंधुतेसाठी काम करून गेलेल्या सर्व सुधारकांचा दणदणीत पराभव आहे. (बाय द वे, गेल्या वर्षी पन्नास लाख लोकांनी नाशिकमधे एकत्र येऊन हिंदू धर्माचं आणि हिंदू जनतेचं किती आणि काय भलं केलं याचं उदाहरण समोर असताना पाच-पंचवीस लाख 'मराठ्यां'च्या नुसत्या संख्येनं हुरळून गेलेले लोक बघितले की गलबलूनच येतंय मला तर... जिज्ञासूंनी 'एक मराठा = लाख मराठा' या समीकरणावरही गौर फरमावावा! :-P)

Share/Bookmark

Monday, September 19, 2016

संवाद पिढ्या-पिढ्यांचा

आजच्या तरुण पिढीमधे (म्हणजे होर्डींगवरच्या निबर चेह-यांच्या 'युवा' नेतृत्वांमधे नव्हे, खरोखर तरुण - विशीतल्या मुला-मुलींमधे) खूप एनर्जी आहे, फक्त तिला व्यवस्थित चॅनेल मिळालं पाहीजे. त्यांच्याशी किंवा त्यांच्याबद्दल बोलताना-वागताना आधीच्या पिढ्या (इन्क्लुडींग अस) थोड्या असूया आणि थोड्या न्यूनगंडाच्या शिकार झालेल्या मला दिसतात. 'आमच्या वेळी असं नव्हतं' या टोमण्यांमधून ही असूया दिसते, तर 'हल्लीची पिढी खूपच स्मार्ट आणि फास्ट आहे' या कौतुकमिश्रित तक्रारीमधे आपण मागं पडत चालल्याची भावना (आणि भीती) व्यक्त होते. या दोन्हींच्या फ्रस्ट्रेशनमधून पुढच्या पिढीला दाबण्याचे आणि नावं ठेवण्याचे प्रकार घडताना दिसतात. या दोन पिढ्यांमधला संवाद सुधारण्यासाठीकुणीतरी काम करायची गरज आहे, असं मला वाटतं!

Share/Bookmark

Monday, May 30, 2016

Speed or Focus?

I made this sketch some 18-20 years ago. Found this in some old books today. I was myself amazed with the detailing and proportions in the drawing, considering my age when I made this. Lesson of the day: I have grown less patient and less persistent over the years. This and few other (even older) creations have made me rethink on the necessity of Speed against Focus in life. Not that I have a definite answer today, but I am hopeful that the question will not let me pass without finding one soon...


Share/Bookmark

Sunday, March 20, 2016

Plan

Don't try to 'plan' your life. There's so much coming your way. Keep yourself free to take that up. You deserve much more than what you expect!

 - Aksharmann


Share/Bookmark

Monday, March 7, 2016

राजकारण नको?

काय गंमत आहे नाही? शाळा-कॉलेजात गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करायला आपली हरकत नसते. पण शाळा-कॉलेजातल्या मुलांनी राजकारणावर बोललेलं मात्र आपल्याला खपत नाही. म्हणजे आपल्याला पुढच्या पिढीकडून नक्की काय अपेक्षित आहे? एका लोकशाही देशाचे सुजाण नागरिक बनणं की झुंडशाहीपुढं माना तुकवणारे दैववादी बनणं?


Share/Bookmark

Monday, September 21, 2015

जाणीव

आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लाखो रुपये खर्चून त्यांना शिक्षण देणा-या पालकांनी, विशेषतः मातांनी सर्व मुलांना लहानपणापासूनच स्वयंपाकघरातल्या कामाचीही सवय लावावी. यामुळे मोठेपणी ही 'पुरुष' मंडळी स्वावलंबी तर होतीलच, पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या बायकांकडून आयत्या जेवणाची अपेक्षा करताना त्यामागच्या कष्टांची त्यांना किमान जाणीव तरी राहील.


Share/Bookmark

Tuesday, July 15, 2014

स्वस्त आणि महाग

हातात घालायचं घड्याळ, अंगावर घालायचे कपडे, खिशात ठेवायचा मोबाईल लोकांना ब्रँडेड आणि स्टँडर्डच लागतो, कितीही महाग असला तरी! पण पोटात जाणारा पदार्थ स्वस्तच लागतो, मग तो सबस्टँडर्ड असला तरी चालतो 'थोडासा'...

Share/Bookmark

Friday, May 30, 2014

संवाद

संवाद कसा साधायचा, हा प्रश्न नसतोच मुळी. प्रश्न असतो - संवाद साधावासा वाटतोय की नाही, हा! एकदा संवाद साधायचा ठरवलाच, तर संवादासाठी खूप माध्यमं सापडतील. पण संवाद साधावासाच वाटत नसेल, तर मात्र खिशात मोबाईल, डेस्कवर कॉम्प्युटर, ड्रॉवरमधे फुलस्केप नि लिफाफा, सगळं असून नसल्यासारखंच. म्हणजे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कितीही पुढं गेली तरी कम्युनिकेशनच्या ऊर्मीला ओव्हरराईड करु शकणारच नाही, बरोबर ना?


Share/Bookmark

Friday, May 23, 2014

वेळ

७६ वर्षांचा माणूस म्हणतोय, अजून खूप काही करायचं बाकी आहे पण वेळ कमी पडतोय. आणि तिशीतला माणूस टाईम 'पास' करण्यासाठी टीव्हीसमोर बसलाय.


Share/Bookmark

Sunday, August 18, 2013

A better thing to do...

Praising someone without any reason is a better thing to do than cursing someone without any reason.


Share/Bookmark

Thursday, August 8, 2013

नाती

काहीतरी फायदा करून देणारी नाती टिकवली जातातच... आर्थिक फायदा करून देणारी तर नक्कीच!

Share/Bookmark