ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, September 23, 2016

सिंहाचे दात मोजणारी जात, वगैरे वगैरे

"सिंहाच्याजबड्यातघालुनीहात मोजतीदातअशीहीजात मराठ्याची!" असं एका दमात म्हणायला लहानपणी फार्फार मज्जा यायची. खास करुन, ही अशी स्फूर्तिदायी डर्काळी फोडण्याचा जन्मसिद्ध हक्क आपल्यालाच मिळालेला आहे, या गोष्टीचा जाज्वल्य अभिमानही वाटायचा. पाठांतर चांगलं असलं तरी, आवाज खणखणीत असला तरी, उच्चार शुद्ध असले तरी - म्हणजे सिंहाला शिंव्व नव्हे तर सिंहच म्हणता येत असलं तरीसुद्धा ही गर्जना फक्त आपणच करु शकतो, आपले इतर मित्र नाही, कारण आपण शहाण्णव कुळी मराठ्यांच्या खानदानात जन्माला येण्याचा पराक्रम केलाय, अशी लहान असताना माझीही समजूत होती, पण... पण मग मी मोठा झालो! आडनावाच्या पंखांखालून बाहेर आल्यावर, अमक्याचा पुतण्या - तमक्याचा भाऊ अशा ओळखी चालणार नाहीत अशा ठिकाणी जगावं लागल्यावर लक्षात आलं की सिंहाच्या (त्येच त्ये शिंव्वाच्च्या) जबड्यात हात घालून काय त्याचं रूट कॅनाल करणार आहोत का आपण? त्यापेक्षा एखाद्या आपल्यासारख्याच हाडामांसाच्या माणसाच्या मनात घर करता आलं तर जास्त चांगलं नाही का?

Share/Bookmark

No comments:

Post a Comment