ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, June 14, 2010

भ्रम


राजा असे राणी असे, अन्‌ असे गुलाम कुणी
कागदांवर राज्य करीती, लाल कुणी काळे कुणी,
मज नसे भ्रम हा, एक्का मोठा की राजा मोठा
पान असेन मी हुकुमाचे, भले म्हणा दुर्री-तिर्री कुणी.

Share/Bookmark

Sunday, June 13, 2010

अंतर

तुझी आठवण माझ्या मनात
सलत राहते एकटेपणात,
वाटते दोघांमधले अंतर
विरुन जावे एका क्षणात...

Share/Bookmark

स्वप्न-स्मृती

स्वप्नातले जग तुझे नि माझे
स्वप्नामध्ये मी पाहतो,
जागेपणी त्या स्वप्न-स्मृती
श्वासांत माझ्या गुंफतो...

Share/Bookmark

नकळत

खरंच आपल्याही नकळत
आपण किती जवळ आलो,
एकमेकाला जिंकण्याच्या नादात
किती सहज दोघंही हरलो...

Share/Bookmark

प्रेम

माणसानं आयुष्यात
एकदातरी प्रेम करावं,
तीरावर नाही पोहोचलं
तरी भिजण्याचं सुख लुटावं...

Share/Bookmark

कडवे

माझे जीवनगाणे
मलाच गायचे आहे,
तुझेही एक कडवे
त्यात गुंफायचे आहे...

Share/Bookmark

स्वभाव

भावनांच्या विश्वात
व्यवहाराचा अभाव असतो,
स्वप्नातच रमण्याचा
एखाद्याचा स्वभाव असतो...

Share/Bookmark