ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, December 5, 2011

षंढ नजरा अन्‌ मृत मुठी

षंढ नजरा अन्‌ मृत मुठी घेऊन
जगत असतो आपण
मर्दानगीच्या गप्पा मारत...
तेव्हा रस्त्यावर एखादी
आरक्षण-वंचित अबला
किंवा चार भिंतींआड एखादी
'आरक्षित' सौभाग्यवती
भोगत असते शिक्षा
पुरुषांच्या दुनियेत,
पुरुष नसण्याची..
आसूड ओढत स्वतःच
चारित्र्याची झूल पांघरुन
नागड्या देहावर..
कारण, दोन्ही आवश्यक
तिच्या अस्तित्वासाठी -
चारित्र्याची झूलही
अन्‌ नागडा देहही...
हजारो वर्षांपासून यशस्वी
पुरुषांची जमात,
पटवून तिला देण्यात
की तूच, तू स्वतःच
ओढतेस आसूड स्वतःवर.
आम्ही आमच्या हातांनी
काहीच करत नाही..
करुही शकत नाही..
कारण, नजरा आमच्या षंढ
अन्‌ मृत आमच्या मुठी!


Share/Bookmark

1 comment:

  1. Nice poem Mandar!
    पुरुषांच्या दुनियेत पुरुष नसण्याची शिक्षा.... छान!

    ReplyDelete