का भास तिचा होई मना, रोज रोज पुन्हा पुन्हा
अडखळतो - सावरतो, रोज रोज पुन्हा पुन्हा
ना पटले जरी सत्य हे, सांगितले मी तिला
हा श्वास चाले बघुनी तुला, रोज रोज पुन्हा पुन्हा
ती येऊनी प्रत्यक्ष कधी जागविते चेतना
अन् त्रास देती आठवणी मग रोज रोज पुन्हा पुन्हा
ती असता जग सुंदर, ती नसता भेसूर का
जग बदलते हे असे कसे, रोज रोज पुन्हा पुन्हा
हे जगणे ना संभव अता, तिच्याविना तिच्याविना
हे झुरणे घेई प्राण अता, रोज रोज पुन्हा पुन्हा

- अक्षर्मन

No comments:
Post a Comment