ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, February 4, 2020

Mobile and Internet

मोबाईल आणि इंटरनेट
(मंदार शिंदे 9822401246)

नको मला मोबाईल आणि नको इंटरनेट
माणसाची माणसाशी रोज व्हावी भेट...

व्हॉट्सऐपवरून फॉरवर्ड येतो
गटात भांडण लावून देतो
मित्रही पक्का दुश्मन होतो
शिव्या-शापही भरपूर देतो
आवडत्या माझ्या ग्रुपवरून मी एक्झिट घेतो थेट
माणसाची माणसाशी रोज व्हावी भेट...

पिक्चर कुठला कुणी बघावा
कुणाला आमचा राजा म्हणावा
डावा-उजवा शिक्का मारावा
देवाच्या नावाने कल्ला करावा
समोर लव्हली वागणारेसुद्धा ऑनलाइन करतात हेट
माणसाची माणसाशी रोज व्हावी भेट...

प्रोफाईल खोटे बातम्या खोट्या
व्हिडीओ खोटे पोस्टही खोट्या
मोठ्या लोकांच्या अकला छोट्या
छोट्यांच्या पुढे काळज्या मोठ्या
विझले सारे सूर्य नि तारे, काजवे झाले ग्रेट
माणसाची माणसाशी रोज व्हावी भेट...

धर्माच्या नावाने मांडला खेळ
पैशाच्या मागे चालला वेळ
रोजीरोटीचा लागेना मेळ
खऱ्या खोट्याची झालीया भेळ
आयुष्य तुझं संपून चाललं, आता तरी पेट
माणसाची माणसाशी रोज व्हावी भेट...

नको मला मोबाईल आणि नको इंटरनेट
माणसाची माणसाशी रोज व्हावी भेट...

- मंदार शिंदे 9822401246


Share/Bookmark

No comments:

Post a Comment