ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Thursday, June 3, 2021

Campaign Against Child Labour - Sakal News

काम नको, शिक्षण हवे! बालमजुरीतून बाहेर पडलेल्या मुलांनी व्यक्त केली भावना
सकाळ वृत्तसेवा | Jun 3, 2021

लहान मुलांना घरी सुरक्षित वातावरण मिळणे गरजेचे आहे. कुटुंबासाठी पैसे कमावण्याची वेळ त्यांच्यावर येवू नये. बालमजुरीची व्याख्या तसेच धोकादायक आणि अ-धोकादायक व्यवसायाबद्दल अधिक स्पष्टता आणावी. यापुढे आम्हाला श्रम नको, शिक्षण हवे आहे, अशी आस बालमजुरीतून बाहेर पडलेल्या मुलांनी व्यक्त केली.

जागतिक बालमजुरी विरोधी दिनाच्या निमित्ताने बालमजुरी विरोधी अभियानाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे राज्यस्तरीय ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असणाऱ्या मुलांनी या परिसंवादामध्ये सहभागी होऊन आपल्या समस्या मांडल्या. तसेच बालमजुरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. सहभागी मुला-मुलींपैकी बहुतेकजण यापूर्वी किंवा सध्या शेती, वीटभट्टी, भाजी विक्री, घरकाम, तसेच कचरावेचक अशा कामांमध्ये गुंतलेले होते किंवा आहेत.

राज्यभरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पालक आणि मुलांनी या परिसंवादामध्ये सहभाग घेतला. बालमजुरी विरोधी अभियानाच्या राज्य संयोजक एलिशिया तौरो यांनी अशा परिसंवादाच्या माध्यमातून मुलांना आपली मते आणि मागण्या मांडण्याची संधी देण्याची गरज व्यक्त केली. मंदार शिंदे यांनी सहभागी मुलांच्या सत्राचे सूत्रसंचालन केले. तर आरोकिया मेरी यांनी मुलांच्या तसेच बालमजुरी विरोधी अभियानाच्या मागण्यांची यादी सादर केली. पूर्व राज्य संयोजक मनीष श्रॉफ यांनी आभार प्रदर्शन केले.

परिसंवादात मांडलेले मुद्दे...

  • दारूची दुकाने बंद करावीत, जेणेकरून मुलांना घरी सुरक्षित वातावरण मिळू शकेल
  • कुटुंबासाठी पैसे कमावण्याची वेळ मुलांवर येऊ नये
  • बालमजुरीची व्याख्या तसेच धोकादायक आणि अ-धोकादायक व्यवसायाबद्दल अधिक स्पष्टता आणावी
  • आई-वडील कामासाठी घरापासून दूर असताना मुलांना वस्तीत संगोपन केंद्र आणि पाळणाघरांची व्यवस्था करावी
  • कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना आर्थिक साहाय्य आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात
  • तसे झाल्यास मुलांना काम करण्याऐवजी शिक्षण सुरू ठेवता येईल
  • स्थानिक पातळीवरील सर्व बाल हक्क यंत्रणा कार्यान्वित कराव्यात
  • शिक्षणाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करावी

(Click on image to read)


https://www.esakal.com/pune/no-work-want-education-emotions-expressed-by-children-out-of-child-laborShare/Bookmark

No comments:

Post a Comment