पुण्यातल्या एका मॉलच्या पार्किंगमधला सीन. एक माणूस मॉलमधून खरेदी केलेल्या सामानाची ट्रॉली ढकलत येतो. मागून येणार्या बाईंच्या हातात एक तशाच सामानाचं बास्केट, दुसर्या हाताशी लहान मुलगी. आपल्या कारची डिकी उघडून माणूस सामान आत भरतो. रिकामी ट्रॉली शेजारी पार्क केलेल्या कारसमोर सरकवतो. मग बाईंच्या हातातलं बास्केट घेऊन सामान डिकीत ओततो. रिकामं बास्केट शेजारच्या दुसर्या कारसमोर ठेवतो. डिकी बंद. महाराज, महाराणी, आणि राजकन्या गाडीत बसतात. गाडी पार्किंगमधून बाहेर येते, झूऽऽम्म निघून जाते. गाडीचा नंबर जीजे-१९ असा काहीतरी असतो. (त्यानं काही विशेष फरक पडत नाही म्हणा... म्हणजे मला तरी तसं वाटतं... म्हणजे काही विशेष फरक पडत नाही असं... पण 'द डेव्हिल इज इन द डिटेल्स'... असो, तर) त्या शेजारी पार्क केलेल्या दोन कारच्या मालकांनी काय करायचं? आणि त्या छोट्या राजकन्येनं काय आदर्श घ्यायचा आई-बापाकडून? 'सिव्हिक सेन्स' नावाची गोष्ट कधी शिकणार आपण?

No comments:
Post a Comment