ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde
Showing posts with label story of coats. Show all posts
Showing posts with label story of coats. Show all posts

Tuesday, January 21, 2020

कोटाचं गाणं


"कोटाचं गाणं"

(नेहमीच्या युनिफॉर्मऐवजी, 'उन्नती संस्थे'ने यावेळी शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी ऐन थंडीच्या दिवसांत कोट शिवून घेतले, त्याचीच ही गोष्ट!)

संचित ये, सावित्री ये
ये रे शेखर, ये गं सुहाना,
रुपेश आणि विराट ये
शारदा मागे राहू नको ना!

सकाळची वेळ, थंडीचा खेळ
झोपेचा राहिला नाही ठिकाणा.
शाळेत खास, काहीतरी आज
बाई म्हणाल्या, मिळणार आम्हाला.

मिळणार काय, माहिती हाय
भारीच कोट एक ताजा तवाना!
मोठ्यांनी घातला, सिनेमात पाह्यला
तरी नाय झाला, जुना पुराणा.

कॉलर टाईट, वाढेल ऐट
घालून दाखवू आई-बाबांना.
हसली ताई, दादाला घाई
पाणीच आईच्या आले डोळ्यांना.

अंगात कोट, हलतंय पोट
गदागदा खदाखदा हसू येताना.
लाजतंय कोण, नाचतंय कोण
कोटाचा कसला भारी बहाणा.

काढूया फोटो, बाजू को हटो
कोटवाले राजा को सलाम ठोका ना.
अंगात चढवला, मिरव-मिरवला
काढून ठेवायला, सांगू नका ना!
कोटात खेळू, कोटात पळू
राहू दे अंगात, झोपी जाताना...



(Click on image to read)



Share/Bookmark