- शाडूच्या मूर्तीचा आकार लहान असतो आणि वजन जास्त असतं. पाच-सहा फुटी (किंवा त्याहून मोठी) मूर्ती नक्कीच शाडूची नसणार.
- शाडूच्या मूर्तीमध्ये फार नाजूक कलाकुसर करता येत नाही. पीओपीची मूर्ती तुलनेनं फार सुबक दिसते.
- शाडूची रंगवलेली मूर्ती शक्यतो मॅट फिनिशमध्ये येते. जास्त ग्लॉसी रंगवलेली मूर्ती पीओपीची असण्याची शक्यता जास्त असते.
- पीओपीची मूर्ती पाण्यात विरघळत नाही, तिचे तुकडे पडतात. याउलट शाडूची (नैसर्गिक रंगांत रंगवलेली) मूर्ती पाण्यात विरघळून चिखल तयार होतो, जो बागेतल्या झाडांनाही घालता येतो.
जाणकारांनी याविषयी अधिक माहिती पुरवावी, तसंच आजूबाजूच्या मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करावी.

चांगली माहिती. नैसर्गिक रंग म्हणजे कोणते तेही खूप लोकांना ठाऊक नसतं. ती माहितीही उपयोगी ठरेल
ReplyDeleteछान माहिती दिली.
ReplyDelete