मी एक पाकळी
तुझ्याचसाठी
शोधून आणली
संध्याकाळी
हसलीस तू अन्
उजळून गेला
रात्रीचा चंद्रमा...
मग पुन्हा दुसरी
सकाळ झाली
शोध पाकळी
सुरूच राही
हसशील तू या
आशेवरती
रात्रीही जागल्या...
- मंदार
३१/१२/२०२३

A blog by Mandar Shinde 9822401246
Powered By
Versatile Corporate Solutions
या ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार
No comments:
Post a Comment