आईना देख खुद पे हँसने से यहीं अच्छा।
ऐसी अक्षरे
Friday, October 21, 2011
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून,
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे?
दीप सारे जाती येथे विरुन विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून झडून,
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे...
अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी,
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे...
- आरती प्रभू

Wednesday, October 5, 2011
माणूस
माणूस माणसाला माणसासारखं
मानतच नाही,
ज्याच्यासाठी, ज्यानं केले नियम,
त्यातलं कुणीच नियम पाळत नाही.
माणसानंच संपवायची
माणसाची जात,
याला नियतीचा सूड म्हणावं की
माणसाची औकात?

मानतच नाही,
ज्याच्यासाठी, ज्यानं केले नियम,
त्यातलं कुणीच नियम पाळत नाही.
माणसानंच संपवायची
माणसाची जात,
याला नियतीचा सूड म्हणावं की
माणसाची औकात?
माणूस
Sunday, September 18, 2011
बदल
मी बदललंय, तुम्हीही बदलू शकता

विस्कटलेली घडी
तुम्हीही बसवू शकता
होत नाही, मिळत नाही
यावर रडूही शकता
मी करेन, मी मिळवेन, असंही म्हणू शकता
हात दोन्ही जोडून
दयाही मागू शकता
हाताला हात जोडून
फौज उभारु शकता
कसं बदलेल सारं
नुसतं बघत बसू शकता
स्वतःला बदलून बघा
जग बदलेल बघता-बघता
बदल
Saturday, September 17, 2011
Sunday, September 11, 2011
।।बाप्पा मोरया।।
तू बुध्दीची देवता, तुझा जयजयकार आम्ही करता,
तू प्रसन्न होशी आशीष दिधशी, मोरया रे बाप्पा मोरया।।
लेकरं तुझी ही जनता, कुठं जाती तू बुध्दी वाटता?
तुझ्या नावानं मांडती बाजार पैशांचा, मोरया रे बाप्पा मोरया।।
तुझा उत्सव भक्तिभावाचा, ज्याच्या-त्याच्या आवडी-निवडीचा।
का धमक्या देऊन खंडण्या उकळती, मोरया रे बाप्पा मोरया।।
आकार मोठा तुझ्या कानांचा, ऐकशी तू धावा दीन-दुबळ्यांचा।
कान फाटेस्तोवर का मग आरत्या घोकती, मोरया रे बाप्पा मोरया।।
तू होतास रे स्वामी विश्वाचा, आता संसार तुझा रस्त्यावरचा।
तुझी धिंडही काढती पाण्यात बुडवती, मोरया रे बाप्पा मोरया।।
आता दाखव हिसका अंकुशाचा, भरलाय घडा मानवाच्या पापांचा।
त्यांची मस्ती जिरव जे तुला-मला छळती, मोरया रे बाप्पा मोरया।।

Subscribe to:
Comments (Atom)