ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, February 13, 2023

प्रोफाईल पिक


रंगीत रंगीत कपड्यांतलं

तुझं ताजं ताजं प्रोफाईल पिक

मी हळूच सेव्ह करुन ठेवतो

तुझ्या मोबाईल नंबरपुढं.


तुला दिसतात आकडे फक्त

फेसबुक प्रोफाईलवरच्या

लाईक आणि शेअरचे.


पण तुझ्या त्या रंगांनी खुललेलं

माझं ब्लॅक ऐन्ड व्हाईट फोनबुक

मी तुला कधीच नाही दाखवत.


भीती वाटते...

भीती वाटते चुकून कधी जर

लागलं फोनबुकला बोट तुझं,

तर उडून जातील रंग सारे

फुलपाखराच्या पंखांवरच्या रंगांसारखे.


आणि मागे उरेल फक्त

एक ब्लॅक ऐन्ड व्हाईट फोनबुक,

जिथं नसेल...


रंगीत रंगीत कपड्यांतलं

तुझं ताजं ताजं प्रोफाईल पिक

मी हळूच सेव्ह करुन ठेवलेलं

तुझ्या मोबाईल नंबरपुढं...


-  अक्षर्मनShare/Bookmark

No comments:

Post a Comment