मन उदास..
जुन्या आठवणींतून
न संपणारा प्रवास.
आठवणी - बोचणार्या
आठवणी - सलणार्या,
विसरतो म्हटलं तरी
पुन्हा आठवणार्या.
छोट्या-छोट्या गोष्टींच्या
त्या आठवणी खास;
आज पुन्हा एकदा
मन उदास...
आठवणी - कधीच बाहेर न येणार्या
आठवणी - आतल्या आत रुंजी घालणार्या
नको म्हणत असलो तरी
हवाहवासा वाटणारा
या आठवणींचाच सहवास;
आज पुन्हा एकदा
मन उदास..
जुन्या आठवणींतून
न संपणारा प्रवास !
- मंदार