ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, September 18, 2011

बदल

मी बदललंय,  तुम्हीही बदलू शकता
विस्कटलेली घडी तुम्हीही बसवू शकता

होत नाही, मिळत नाही यावर रडूही शकता
मी करेन, मी मिळवेन,  असंही म्हणू शकता

हात दोन्ही जोडून दयाही मागू शकता
हाताला हात जोडून फौज उभारु शकता

कसं बदलेल सारं नुसतं बघत बसू शकता
स्वतःला बदलून बघा जग बदलेल बघता-बघता

मी बदललंय,  तुम्हीही बदलू शकता

Share/Bookmark

Saturday, September 17, 2011

करके घायल हमें...

करके घायल हमें जो चल दिये हमसे दूर,
लब्जों में कैद कर लिये हमनें नखरे उनके!

Share/Bookmark

Sunday, September 11, 2011

।।बाप्पा मोरया।।

तू बुध्दीची देवता, तुझा जयजयकार आम्ही करता,
तू प्रसन्न होशी आशीष दिधशी, मोरया रे बाप्पा मोरया।।

लेकरं तुझी ही जनता, कुठं जाती तू बुध्दी वाटता?
तुझ्या नावानं मांडती बाजार पैशांचा, मोरया रे बाप्पा मोरया।।

तुझा उत्सव भक्तिभावाचा, ज्याच्या-त्याच्या आवडी-निवडीचा।
का धमक्या देऊन खंडण्या उकळती, मोरया रे बाप्पा मोरया।।

आकार मोठा तुझ्या कानांचा, ऐकशी तू धावा दीन-दुबळ्यांचा।
कान फाटेस्तोवर का मग आरत्या घोकती, मोरया रे बाप्पा मोरया।।

तू होतास रे स्वामी विश्वाचा, आता संसार तुझा रस्त्यावरचा।
तुझी धिंडही काढती पाण्यात बुडवती, मोरया रे बाप्पा मोरया।।

आता दाखव हिसका अंकुशाचा, भरलाय घडा मानवाच्या पापांचा।
त्यांची मस्ती जिरव जे तुला-मला छळती, मोरया रे बाप्पा मोरया।।

Share/Bookmark

Thursday, September 8, 2011

एकदा तरी

स्वप्न एकदा तरी पडायला हवे
प्रेम एकदा तरी करायला हवे

ते मुकाम, तेच मार्ग, तीच मंझिले
वाट एकदा तरी चुकायला हवे

जगायचे जुनेच की मरायचे नवे
लक्ष्य एकदा तरी ठरायला हवे

चौकटीत वागणे त्रिकोण तोलुनी
ढोंग एकदा तरी जमायला हवे

दिसे तसे नसे असे निभायचे कसे
स्पष्ट एकदा तरी कळायला हवे

दगे छुपे कितीक, कुठे दुश्मनी छुपी
समोर एकदा तरी लढायला हवे

भरभरून पुण्य मोजले पदोपदी
माप एकदा तरी भरायला हवे

- उषाकुमारी

Share/Bookmark

शायरी

नुसतेच ना दुनियेत तुमच्या
आलो अम्ही, गेलो अम्ही
भगवन्‌ तुझ्या दुनियेस काही
देऊनी गेलो अम्ही.
शायरी अर्पून गेलो
माझे जणू सर्वस्व ती
दुनिया तुला विसरेल भगवन्‌
ना अम्हा विसरेल ती.

- भाऊसाहेब पाटणकर

Share/Bookmark

लाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणे

लाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?
मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे, हरती जिथे शहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे?
हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे!
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

जाता समोरुनी तू, उगवे टपोर तारा
देशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्यांचे सुचते सुरेल गाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

गीत - मंगेश पाडगावकर
स्वर - पं. हृदयनाथ मंगेशकर
संगीत - श्रीनिवास खळे

Share/Bookmark