स्वप्न एकदा तरी पडायला हवे
प्रेम एकदा तरी करायला हवे
ते मुकाम, तेच मार्ग, तीच मंझिले
वाट एकदा तरी चुकायला हवे
जगायचे जुनेच की मरायचे नवे
लक्ष्य एकदा तरी ठरायला हवे
चौकटीत वागणे त्रिकोण तोलुनी
ढोंग एकदा तरी जमायला हवे
दिसे तसे नसे असे निभायचे कसे
स्पष्ट एकदा तरी कळायला हवे
दगे छुपे कितीक, कुठे दुश्मनी छुपी
समोर एकदा तरी लढायला हवे
भरभरून पुण्य मोजले पदोपदी
माप एकदा तरी भरायला हवे
- उषाकुमारी
No comments:
Post a Comment