ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, September 28, 2016

An Empty Mind...


 An empty mind is devil's workshop!
So fill it with something you like.
#ChaiPeCharcha


Share/Bookmark

Friday, September 23, 2016

सिंहाचे दात मोजणारी जात, वगैरे वगैरे

"सिंहाच्याजबड्यातघालुनीहात मोजतीदातअशीहीजात मराठ्याची!" असं एका दमात म्हणायला लहानपणी फार्फार मज्जा यायची. खास करुन, ही अशी स्फूर्तिदायी डर्काळी फोडण्याचा जन्मसिद्ध हक्क आपल्यालाच मिळालेला आहे, या गोष्टीचा जाज्वल्य अभिमानही वाटायचा. पाठांतर चांगलं असलं तरी, आवाज खणखणीत असला तरी, उच्चार शुद्ध असले तरी - म्हणजे सिंहाला शिंव्व नव्हे तर सिंहच म्हणता येत असलं तरीसुद्धा ही गर्जना फक्त आपणच करु शकतो, आपले इतर मित्र नाही, कारण आपण शहाण्णव कुळी मराठ्यांच्या खानदानात जन्माला येण्याचा पराक्रम केलाय, अशी लहान असताना माझीही समजूत होती, पण... पण मग मी मोठा झालो! आडनावाच्या पंखांखालून बाहेर आल्यावर, अमक्याचा पुतण्या - तमक्याचा भाऊ अशा ओळखी चालणार नाहीत अशा ठिकाणी जगावं लागल्यावर लक्षात आलं की सिंहाच्या (त्येच त्ये शिंव्वाच्च्या) जबड्यात हात घालून काय त्याचं रूट कॅनाल करणार आहोत का आपण? त्यापेक्षा एखाद्या आपल्यासारख्याच हाडामांसाच्या माणसाच्या मनात घर करता आलं तर जास्त चांगलं नाही का?

Share/Bookmark

'मराठा क्रांती मोर्चा'च्या निमित्तानं...

गुरुवारच्या 'लोकसत्ते'तलं व्यंगचित्र सध्याच्या 'मोर्चा'मय वातावरणावर मार्मिक भाष्य करणारं आहे. खिडकीतून बाहेर जमलेली गर्दी पाहणा-या नेत्याला सहाय्यक सांगतोय, "फारच भव्य! त्यातील काहींना पाणी पाहिजे, काहींना नोक-या तर काहींना कर्जमुक्ती! इतकंच नव्हे तर त्यातील दहा पंधरा जणांना मुख्यमंत्रिपदही पाहिजे!!"

**********

'माझी फिल्लमबाजी'मधे शिरीष कणेकर म्हणतात, "सभेला किती लोक आले हे कोण आणि कसं मोजतं? म्हणजे, डोकी मोजावीत तर तिथं जमलेल्यांपैकी कितीजणांना ती असतात माहिती नाही. बरं, पाय मोजून भागाकार करावा तर दोनानं भागावं की चारानं हाही प्रश्नच!" :-)

**********

शक्यतो आजूबाजूला घडणा-या प्रत्येक गोष्टीची पॉझिटीव्ह बाजू शोधण्याची मला सवय आहे, सहसा निगेटीव्ह विचार मी करत नाही. पण जन्मावरुन ठरणा-या जातीचा अभिमान व्यक्त करण्यासाठी आणि जातीआधारित शक्तिप्रदर्शन करण्यासाठी एकत्र रस्त्यावर उतरलेल्या गर्दीकडून कसल्याही विधायक आणि समाजोपयोगी कार्याची मला स्वतःला अपेक्षा नाही. लाखो लोकांनी एकत्र येण्यामागं जन्माधारित जातीची अट असणं हा गेल्या शेकडो वर्षांत समता आणि बंधुतेसाठी काम करून गेलेल्या सर्व सुधारकांचा दणदणीत पराभव आहे. (बाय द वे, गेल्या वर्षी पन्नास लाख लोकांनी नाशिकमधे एकत्र येऊन हिंदू धर्माचं आणि हिंदू जनतेचं किती आणि काय भलं केलं याचं उदाहरण समोर असताना पाच-पंचवीस लाख 'मराठ्यां'च्या नुसत्या संख्येनं हुरळून गेलेले लोक बघितले की गलबलूनच येतंय मला तर... जिज्ञासूंनी 'एक मराठा = लाख मराठा' या समीकरणावरही गौर फरमावावा! :-P)

Share/Bookmark

Monday, September 19, 2016

संवाद पिढ्या-पिढ्यांचा

आजच्या तरुण पिढीमधे (म्हणजे होर्डींगवरच्या निबर चेह-यांच्या 'युवा' नेतृत्वांमधे नव्हे, खरोखर तरुण - विशीतल्या मुला-मुलींमधे) खूप एनर्जी आहे, फक्त तिला व्यवस्थित चॅनेल मिळालं पाहीजे. त्यांच्याशी किंवा त्यांच्याबद्दल बोलताना-वागताना आधीच्या पिढ्या (इन्क्लुडींग अस) थोड्या असूया आणि थोड्या न्यूनगंडाच्या शिकार झालेल्या मला दिसतात. 'आमच्या वेळी असं नव्हतं' या टोमण्यांमधून ही असूया दिसते, तर 'हल्लीची पिढी खूपच स्मार्ट आणि फास्ट आहे' या कौतुकमिश्रित तक्रारीमधे आपण मागं पडत चालल्याची भावना (आणि भीती) व्यक्त होते. या दोन्हींच्या फ्रस्ट्रेशनमधून पुढच्या पिढीला दाबण्याचे आणि नावं ठेवण्याचे प्रकार घडताना दिसतात. या दोन पिढ्यांमधला संवाद सुधारण्यासाठीकुणीतरी काम करायची गरज आहे, असं मला वाटतं!

Share/Bookmark