ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, January 27, 2023

उत्खनन



खोदायला चालू केलं की,
उघडे पडायला लागतात
जमिनीचे थर.
पृष्ठभाग म्हणजे सरफेस,
मग मधला थर -
असंख्य गोष्टींनी भरलेला.
त्याखाली झिजलेला खडक -
तुकड्या-तुकड्यांमध्ये विखुरलेला.
मग मूळ खडक -
अभेद्य राहिलेला
अजून तरी.
या सगळ्यामध्ये झिरपणारं
नितळ स्वच्छ पाणी.
जितकं खोल जावं
तितकी विविधता
एकाच जमिनीत.

हे असंच काहीतरी
माणसाचं सुद्धा असतं,
नाही का?

खोदायला चालू केलं की,
उघडे पडायला लागतात
मनाचे थर.
सगळ्यांना दिसणारा चेहरा
म्हणजे सरफेस.
मग मधला थर -
इच्छा आकांक्षा भावनांनी भरलेला.
त्याखाली झिजलेला खडक -
अनुभव आणि आठवणींचा पसारा.
मग मूळ खडक -
भाव-भावनांच्या पलिकडचा,
अभेद्य राहिलेला
अजून तरी.
या सगळ्यामध्ये झिरपणारी
येणारी-जाणारी माणसं
बनणारी तुटणारी नाती.
जितकं खोल जावं
तितकी विविधता
एकाच माणसात.

काहीतरी विशिष्ट उद्देश
असल्याशिवाय करू नये
उत्खनन -
जमिनीचं आणि
माणसांचं सुद्धा.
नको असलेलंच काहीतरी
येईल उफाळून बाहेर,
आणि मग आवरता येणार नाही
दाबलेल्या भावनांचा,
आठवणींचा आवेग.

एवढं कळत असूनसुद्धा
उकरतच असतो आपण
मनावर साठलेली माती.
आणि नाराजसुद्धा होतो
जेव्हा लक्षात येते
आयुष्याची झालेली माती.


    नाटकातल्या पात्रांचं ‘उत्खनन’ सुरु असताना प्रेक्षकांच्या मनाचे पापुद्रे सुटू लागतात, ही ताकद प्रदीप वैद्यांच्या लिखाणाची की नरेश आणि कौमुदी या कलाकारांच्या सादरीकरणाची, हे ठरवणं या नाटकाच्या बाबतीत जरा अवघडच आहे. ‘उत्खनन’ या नाटकाचा विषय जितका गूढ आणि खोल आहे, तितकंच त्याचं व्हिज्युअल प्रेझेंटेशन प्रभावी आणि ठोस आहे. नाटकाचा सेट मल्टी-लेव्हल असल्यामुळं खोली आणि उंची दाखवणं (आणि समजणं) सोपं झालंय. लाईट्सचा आणि अंधाराचा योग्य वापर, विशेषतः खिडकीतून येणाऱ्या मर्यादीत उजेडाचा इफेक्ट एखाद्या जुन्या इंग्रजी सिनेमातल्या सीनची आठवण करून देतो. नरेशच्या आवाजात मोनोलॉग ऐकणं तर खास आहेच, पण कौमुदीचं व्हॉइस मोड्युलेशन आणि सेटवरचा सहज वावर खूपच इम्प्रेसिव्ह. याशिवाय, दिवस-रात्र आणि ऋतुबदलासाठी वापरलेले सेटवरचे काही सरप्राइज एलिमेंट्स प्रत्यक्ष बघूनच अनुभवले पाहिजेत. एकदा बघितल्यावर स्टोरी कळाली, या प्रकारातलं हे नाटक नाही. यातल्या प्रसंगांचे साक्षीदार होण्यासाठी पुन्हा-पुन्हा बघावंसं वाटेल असं हे नाटक आहे. पुढचा प्रयोग अजिबात चुकवू नका. न जाणो, नाटकातलं उत्खनन सुरु असताना तुमच्या मनावरची पण एखादी खपली निघू शकेल.

मंदार शिंदे
9822401246
27/01/2023




Share/Bookmark

Thursday, January 26, 2023

Pathaan




बॉलीवूड ही एक नशा आहे
आपलं दुःख, आपल्या अडचणी
आपली भांडणं, नकोशा आठवणी
सगळं विसरून, आपल्याला खेचून
घेऊन जातात एका वेगळ्या दुनियेत
स्वप्नांच्या, दोस्तीच्या, प्रेमाच्या दुनियेत
जिथं शत्रूसुद्धा बनतात मित्र
आणि आनंद भरून उरतो सर्वत्र
पडद्यावरच्या खोट्या दुनियेत
हरवून जातो माणूस प्रत्येक
हसतो, रडतो, नाचतोसुद्धा
जगतो ते क्षण पुन्हा पुन्हा
या दुनियेची किंमत काय
मोजणार किती, फेडणार काय
सिनेमा आणतो आपल्यासाठी
नाच, गाणी, गप्पा, गोष्टी
मोकळं मन आणि बाहू पसरून
आपण घेऊ त्याला रिचवून
अंगाअंगात भिनेल पुन्हा
बॉलीवूडची ही सॉलीड नशा

आज हे सुचायचं कारण म्हणजे
खूप वर्षांनंतर बघायला मिळालेली
थेटरमधली गर्दी,
शिट्ट्या, टाळ्या, नाच
थँक्स टू 'पठान'!

बॉलीवूड नीडेड अ पुश
वी मिस्ड यू, शाह रुख!



Share/Bookmark

Thursday, January 12, 2023

Parting With Words

How important is it
To talk about death
Is it necessary at all
Can't we just live
And then leave
Silently, when it is time
It is a personal choice
Of course
Whether you decide
Parting in silence
Or parting with words

'Parting With Words… न होना केवल शब्दों में' is a beautiful performance where poetry meets death. And death is not always a depressing thought. It is unavoidable, no doubt. The only thing you can surely predict about your own future. But this is an attempt to arrest the feelings in words and serve them in a bearable, rather pleasurable format to an audience young and old. Yes, the concept is gold and the presenters are gems. Rupali, Aanand and Ashwini have brought to us a mix of English and Hindi poems talking about parting, about losing, about missing, about the end, about death. It's all about losing someone close to you, losing something you've loved and treasured, losing your self, too. It's also about hoping for a new beginning and it's about knowing that there's not another beginning. Basically, it's about being free - breaking free. Or whatever way you take it. Thank you, Annand, Rupali, Ashwini and The Box team, for this wonderful experience. It is perhaps for the first time that I have heard about death and parting for an hour or so and I want to hear that again, from you. Looking forward to experiencing parting with beautiful words again!

Mandar Shinde
9822401246
12/01/2023





Share/Bookmark

Sunday, January 8, 2023

Blind Trust and Mad Love - Marathi Couplet


विश्वास आंधळा अन्‌ ती प्रीत वेडी होती

तुटल्यावरी कळाले रेशीम बेडी होती


- मंदार


#poetry #marathi #sher #love #handwriting

 



Share/Bookmark