ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Thursday, September 8, 2011

लाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणे

लाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?
मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे, हरती जिथे शहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे?
हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे!
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

जाता समोरुनी तू, उगवे टपोर तारा
देशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्यांचे सुचते सुरेल गाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

गीत - मंगेश पाडगावकर
स्वर - पं. हृदयनाथ मंगेशकर
संगीत - श्रीनिवास खळे

Share/Bookmark

No comments:

Post a Comment