कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून,
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे?
दीप सारे जाती येथे विरुन विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून झडून,
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे...
अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी,
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे...
- आरती प्रभू
ऐसी अक्षरे
Friday, October 21, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment