ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, January 13, 2012

सहावं वरीस शाळेचं...

शहाणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण मोक्याचं
सहावं वरीस शाळेचं गं सहावं वरीस शाळेचं

मिळाला मोका शिकण्याचा, अ आ इ ई वाचण्याचा
पाठीवरती दप्तर घेतलं आणि चालणं ठेक्याचं
सहावं वरीस शाळेचं...

बाराखडी मी शिकली गं, मला गणितं सुटली गं
पाटीवरती सांडु लागलं टपोरं अक्षर मोत्याचं
सहावं वरीस शाळेचं...

ओढ लागली शिकण्याची, शाळेमधल्या गमतीची
आज मला हे गुपित कळलं माणूस मोठ्ठा बनण्याचं
सहावं वरीस शाळेचं...

http://everychildcounts-pune.blogspot.com/2012/01/blog-post_13.html

Share/Bookmark

Monday, January 2, 2012

आपण दोघे

तुला नाही वेळ तुझ्या दुनियादारीतून
मला नाही सवड आपलंच रडं रडण्यातून
भेटणार आपण दोघे कसं आणि कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही

कळत तुला नाहीच रे कितीही मी सांगून
ऐकत मीही नाही खरं तू रोज-रोज बोलून
संवादाचं नाटक असं करायचं हे कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही

सुख म्हणजे नक्की काय करावंसं वाटतं
तुझ्या कुशीमध्ये फक्त शिरावंसं वाटतं
पैसा आणि सोयींचे हे डोंगर रे कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही

नात्यातून या मला अरे खूप बळ हवंय
तुझं मन माझं मन जवळ-जवळ हवंय
तुला मी मला तू आणखी कोण कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जेव्हा वाटत राही

०२ जानेवारी २०१२


Share/Bookmark