तुला नाही वेळ तुझ्या दुनियादारीतून
मला नाही सवड आपलंच रडं रडण्यातून
भेटणार आपण दोघं कसं आणि कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही
कळत तुला नाहीच रे कितीही मी सांगून
ऐकत मी ही नाही खरं तू रोज-रोज बोलून
संवादाचं नाटक असं करायचं हे कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही
सुख म्हणजे नक्की काय करावंसं वाटतं
तुझ्या कुशीमध्ये फक्त शिरावंसं वाटतं
पैसा आणि सोयींचे हे डोंगर रे कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही
नात्यातून या मला अरे खूप बळ हवंय
तुझं मन माझं मन जवळ-जवळ हवंय
तुला मी मला तू आणखी कोण कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जेव्हा वाटत राही
No comments:
Post a Comment