काय चूक नि काय बरोबर, हिशेब सोडला मागे
नाती-गोती भाव-भावना, अवघा व्याप सोडला मागे
माझे-माझे मला-मला, ही हावच संपत नव्हती
माझ्यासाठी काय हवे, मग हा विचार सोडला मागे
हरवू नये नि सुटू नये, याचीच कायम भीती
पंगू मनाला करणारा हरेक आधार सोडला मागे
भावनावश निर्णय घेऊन, पाळल्या जगाच्या रीती
फसविणार्या भावनांचा आता व्यवहार सोडला मागे
परमेश्वरावर श्रद्धा आणि भक्ती अपार होती
आकाराचा पण हट्ट धरणारा निराकार सोडला मागे
No comments:
Post a Comment