एका कवेत चंद्र अन् दुसरीत भाकर होती
जिंदगीची गोष्ट माझ्या, भलतीच कातर होती
तो चंद्र दाखवी स्वप्ने, भलतीच भलतीसलती
मग चंद्रावर पांघरली, मी भाकरीची चादर होती
झोपेला गाई अंगाई, मी असाच निद्रानाशी
स्वप्नांच्या दुनियेलाही, मारली मी ठोकर होती
त्या चांदण्यांच्या गप्पा, अन् पौर्णिमेची स्वप्ने
या फाटक्या संसाराला, आशेची झालर होती

No comments:
Post a Comment