ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, October 16, 2016

पैसा फेको...

आजच्या 'लोकसत्ता'मधे अर्धं पान भरुन एका बाईंचा 'वास्तुशास्त्रातील अनुभव' छापून आलाय. यामधे 'समुद्रातील एका नकारात्मक शक्ती'मुळं घरात रक्ताचे थेंब व रक्ताच्या पावलांचे ठसे उमटण्याबद्दल आणि चोवीस तास 'चांटिंग मशिन' चालू ठेऊन या समस्येचं निराकरण कसं केलं याबद्दल लिहिलं आहे. लग्न न जुळणा-यांची पैजेवर लग्नं लावणा-या कुठल्या तरी 'अण्णां'ची पण अशीच अर्धं पान जाहिरात 'लोकमत' वगैरे पेपर नेहमी छापतात. 'सकाळ'वाल्यांनी तर जन्माआधीपासूनच संस्कार करणारे लोक नेहमीच झळकवत ठेवलेत. 'वर्तमानपत्रात छापल्या जाणा-या जाहिराती आणि लेखांशी संपादक सहमत असतीलच असे नाही' अशी एक ओळ कुठल्यातरी कोप-यात छापली की संपादक अख्ख्या जगाला शहाणपण शिकवायला मोकळे होतात. तात्पर्य - पैसा फेको, कुछ भी छापून आणो! समाजप्रबोधनाचा आव आणून बौद्धिक अग्रलेखांची मक्तेदारी जपणा-या संपादकांना असल्या अंधश्रद्धा पसरवणा-या आणि फसवणूक करणा-या जाहिराती आणि लेख का छापावे लागतात? जागरुक पत्रकार-संपादक मित्र-मैत्रिणींनी कृपया मार्गदर्शन करावे...


Share/Bookmark

No comments:

Post a Comment