Astronight! A wonderful experience of watching the sky and beyond... Was introduced to many of the stars, the planets, the constellations, the milky way, and satellites, too. Great insights on the history of telescopes, branches of astronomy, and happenings in the universe. Got a closer view of surface of the moon, crescent of the venus, rings of the saturn, storms on the jupiter, colours of the double stars, and many more interesting features in the sky. Thank you, Shweta Kulkarni, Nimish Aage, and team Astron for all the arrangements and informative sessions! And special mention for choice of the location, away from the city, with almost no light pollution.
ऐसी अक्षरे
Thursday, May 25, 2017
रिटायरमेंट
काम करायची इच्छा आणि क्षमता असणार्यांना जबरदस्ती ५०/५८/६० व्या वर्षी रिटायर करून २५/३५/४५ वयाच्या अकार्यक्षम आणि अनिच्छेने काम करणार्या लोकांना फुकट संधी देणारा सेवानिवृत्तीचा नियम मला चुकीचा वाटतो. दरवर्षी परफॉरमन्स रिव्ह्यू करायचा आणि काम सुरु ठेवायचं की बंद करायचं ह्याचा निर्णय घ्यायचा. मग वय ६० वर्षं झालं की ७०, ह्याचा काय संबंध?
An interested and capable person is forcefully retired from work at 50/58/60 years of age, while inefficient and disinterested persons of 25/35/45 years age are given more opportunities to work. I feel this rule is based on totally wrong assumptions. Decision of continuing to work or not can be based on a periodic performance review, not on whether the person turns 60 years old or 70.
रिटायरमेंट
Labels:
English,
मराठी,
मुक्तविचार,
लेख
Thursday, May 18, 2017
लावणी अखेरच्या विनवणीची
लावणी अखेरच्या विनवणीची
मैतर हो! खातरजमा करु मी कशी
आम्ही जाणारच की कवा तरी पट्दिशी
काय तरुणपणाची एकेक येडी घडी
काय धुंदफुंद रंगात रंगला गडी
काय खट्याळ खोड्या येक येकावर कडी
मस्तीत मिजाशित रमलो रातंदिशी
आता जायाचंच की कवा तरी पट्दिशी
आम्ही साधू नव्हतो, नव्हतो योगी कुणी
आम्ही छंदीफंदी नादी नाना गुणी
इश्काच्या पायी कैक जणींचे ऋणी
केली फसवाफसवी अन् कितिदा पडलो फशी
आता जायाचंच की कवा तरी पट्दिशी
किणकिणता कंकण कणकण नाचायचा
रुमझुमता पैंजण जीव येडा व्हायचा
कधी मैनेसंगे वनभर उधळायचा
दो हाती लुटली आणि लुटवली खुशी
आता जायाचंच की कवा तरी पट्दिशी
तुम्ही जीव लावला, मैत्र आपुले जुने
केलेत माफ तुम्ही शंभर माझे गुन्हे
हे एकच आता अखेरचे मागणे
ही मैफल तुमची अखंड चालो अशी
आम्ही जाणारच की कवा तरी पट्दिशी
- वसंत बापट
मैतर हो! खातरजमा करु मी कशी
आम्ही जाणारच की कवा तरी पट्दिशी
काय तरुणपणाची एकेक येडी घडी
काय धुंदफुंद रंगात रंगला गडी
काय खट्याळ खोड्या येक येकावर कडी
मस्तीत मिजाशित रमलो रातंदिशी
आता जायाचंच की कवा तरी पट्दिशी
आम्ही साधू नव्हतो, नव्हतो योगी कुणी
आम्ही छंदीफंदी नादी नाना गुणी
इश्काच्या पायी कैक जणींचे ऋणी
केली फसवाफसवी अन् कितिदा पडलो फशी
आता जायाचंच की कवा तरी पट्दिशी
किणकिणता कंकण कणकण नाचायचा
रुमझुमता पैंजण जीव येडा व्हायचा
कधी मैनेसंगे वनभर उधळायचा
दो हाती लुटली आणि लुटवली खुशी
आता जायाचंच की कवा तरी पट्दिशी
तुम्ही जीव लावला, मैत्र आपुले जुने
केलेत माफ तुम्ही शंभर माझे गुन्हे
हे एकच आता अखेरचे मागणे
ही मैफल तुमची अखंड चालो अशी
आम्ही जाणारच की कवा तरी पट्दिशी
- वसंत बापट
लावणी अखेरच्या विनवणीची
Labels:
marathi,
vasant bapat,
कविता,
मराठी,
संग्रह
Thursday, May 4, 2017
Centralized or Decentralized?
Centralized or Decentralized?
Mahatma Gandhi promoted ideal concept of decentralizatio n of production and administration for independent India. Dr. Ambedkar highlighted practical problems of prejudice and discrimination at local levels. Mahatma Gandhi warned against rise in corruption, unequal distribution, and biased development due to concentration of power. Dr. Ambedkar expressed concern about communal, biased, and traditional rulers influencing local governance.
Decentralizatio n is the ultimate solution for effective and successful administration of a country with size and diversity like India. However, centralized administration is initially required to empower and regulate local authorities till they become self-dependent and unprejudiced. So, Centralized administration eventually leading to decentralizatio n is the golden mean for our country.
केंद्रीकरण की विकेंद्रीकरण?
महात्मा गांधींनी स्वतंत्र भारतासाठी उत्पादन व प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाची आदर्श संकल्पना मांडली. डॉ. आंबेडकरांनी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर सर्वसामान्यांना पूर्वग्रहदूषित भेदभावपूर्ण वागणूक मिळेल याकडं लक्ष वेधलं. महात्मा गांधींनी सत्तेच्या केंद्रीकरणामुळं भ्रष्टाचारात वाढ, असमान वाटप, आणि भेदभावपूर्ण विकास या धोक्यांची जाणीव करुन दिली. डॉ. आंबेडकरांनी स्थानिक प्रशासनावर जातीयवादी, पक्षपाती, आणि पारंपारिक राज्यकर्त्यांच् या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली.
भारतासारख्या प्रचंड आकाराच्या आणि सगळ्याच गोष्टींत विविधता असणा-या देशाच्या कार्यक्षम आणि यशस्वी प्रशासनासाठी विकेंद्रीकरण हाच अंतिम उपाय आहे. असं असलं तरी, स्थानिक प्रशासन स्वयंपूर्ण आणि निष्पक्षपणे काम करण्यालायक बनेपर्यंत त्यांचं सक्षमीकरण आणि नियमन करणा-या केंद्रीय प्रशासनाचीही गरज आहेच. म्हणजेच, केंद्रीय प्रशासनाचं टप्प्याटप्प्यानं विकेंद्रीत व्यवस्थेत रुपांतर होणं, हा आपल्या देशासाठी सुवर्णमध्य म्हणता येईल.
Centralized or Decentralized?
Subscribe to:
Posts (Atom)