ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, November 21, 2026

Punishing the Child for the fault of Adults?

 


अल्पवयीन मुलांचा सहभाग असलेल्या हिंसक गुन्ह्यांमधे वाढ होत असल्यामुळे सहभागी अल्पवयीन मुलांच्या वयासंबंधीच्या तरतुदींचा पुनर्विचार करण्याची विनंती केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यानिमित्ताने पडलेले काही प्रश्न -

1. अशा गुन्ह्यातील पीडितांना न्याय मिळण्याची गरज असेल तर शासकीय यंत्रणेकडून जलद गतीने तपास झाला पाहिजे, पुनर्वसन प्रक्रिया तातडीने सुरू केली पाहिजे, पुन्हा गुन्हा घडू नये म्हणून उपाययोजना केली पाहिजे. यापैकी काहीही न करता अल्पवयीन मुलांना शिक्षा करण्याचा हट्ट कशासाठी?

2. डिजिटल माध्यमांचा प्रभाव आणि किशोरवयीन मुलांपर्यंत सहज पोहोचणारी ऑनलाईन सामग्री यामुळे मुलांकडून गुन्हे घडत असतील तर ही माध्यमं आणि त्यावरील कन्टेन्ट स्वतः मुलांकडून तयार केला जातो का? मुलांना शिक्षा करून हे कसं थांबेल?

3. अपघात करणारी अथवा न करणारी वाहने अल्पवयीन मुले स्वत: विकत घेऊन चालवतात का? या गाड्या कुणाच्या असतात आणि मुलांना त्या चालवायला कोण देतं? मुलांना शिक्षा करून हे कसं थांबेल?

4. अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मुलांकडून गुन्हे घडत असतील तर हे अमली पदार्थ त्यांना कोण पुरवतं, ते कुठे साठवले जातात, त्यांची वाहतूक कशी केली जाते, जाहिरात कशी केली जाते, यावर शासनाची काय भूमिका आहे? मुलांना शिक्षा करून हे कसं थांबेल?

जबाबदार लोकप्रतिनिधी आणि सर्व राजकीय पक्षांचे पुढारी वारंवार अशी बेजबाबदार विधानं कुठल्याही आकडेवारीशिवाय करत राहतात. याबद्दल त्यांच्या पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर करण्याची, तसेच सर्वसामान्य जनतेच्या मनातील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज वाटते.

~ मंदार शिंदे
21/11/2026



Share/Bookmark