सांगायचे आहे मला ते सत्य मी झाकतो आहे
खोटारड्यांच्या वस्तीत ह्या चुपचाप मी राहतो आहे
दिसत असले जरी मला हे उजेडातले पाप आहे
डोळे मिटून माझ्यापुरती दिवसाला रात्र मानतो आहे
उत्तरे नसलेल्या प्रश्नांची अगणित इथे पैदास आहे
अन् उत्तरे मिळतील ज्यांची प्रश्न असे मी टाळतो आहे
तर्कबुद्धी भ्रमविणारी दुनिया जणू मयसभाच आहे
आंधळ्यांच्या राज्यात दिवे का उगा मी लावतो आहे
माणसाच्या मुखवट्यामागे श्वापदेच फिरती इथे
देव कुठुनी भेटायचा इथे माणसाचीच वानवा आहे
ऐसी अक्षरे
Monday, November 7, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
jabardast.............aawdli
ReplyDelete