ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, November 20, 2012

फ्लॅट खरेदीः- रेडी पझेशन की अंडर-कन्स्ट्रक्शन?

फ्लॅट खरेदी करणार्‍यांची पहिली पसंती बहुदा 'रेडी पझेशन' अर्थात् तयार घराला असते. तयार घरात ते ताबडतोब रहायला जाऊ शकतात, आपल्या सोयीनुसार त्यात पटकन् बदल करून घेऊ शकतात, आणि त्या ठिकाणी लगेच मॅच होऊन जातात. असं असलं तरी, रेडी फ्लॅट विकत घेण्यात काही समस्यादेखील आहेत.

  • वाढलेली किंमतः तयार फ्लॅट्सना असणार्‍या जास्त मागणीमुळं या फ्लॅट्सच्या किंमतीदेखील अंडर-कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्सपेक्षा जास्त असतात. याचाच अर्थ, जास्त किंमतीला खरेदी केल्यामुळं रेडी फ्लॅटमधील गुंतवणूक तुलनेने कमी फायदेशीर ठरते.
  • जास्त रकमेचा मासिक हप्‍ताः बँक व इतर वित्तसंस्था, बांधकामाच्या टप्प्यांनुसार कर्जाची रक्कम वितरीत करतात. त्यामुळं होम लोन घेताना, कन्स्ट्रक्शनमधील फ्लॅटवर मिळणारी छोट्या हप्‍त्याची सुविधा रेडी फ्लॅट घेणार्‍या ग्राहकांना मिळत नाही.
  • अंतर्गत बदलांवर मर्यादाः तयार फ्लॅटमध्ये व्यक्‍तिगत आवडी-निवडीनुसार बदल करायला खूप कमी संधी असते. तयार फ्लॅटमध्ये बदल किंवा पुनर्रचना करणं जास्त महाग तर पडतंच, शिवाय राहत्या जागी काम करून घेताना दैनंदिन गोष्टींवर परीणामही होतो.
  • निवडीला कमी वावः रेडी फ्लॅट्सना असलेल्या प्रचंड मागणीमुळं ग्राहकांना घाईगडबडीत निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळं त्यांच्या निवडीला खूप कमी वाव मिळतो. बरेचदा अशा निर्णयांवर पश्चात्ताप करण्याचीही वेळ त्यांच्यावर येते. याउलट, आजूबाजूला शोध घेतल्यास कित्येक ठिकाणी रेडी पझेशन फ्लॅट्सपेक्षा चांगले अंडर-कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स मिळू शकतात.
  • रोखठोक व्यवहारः थेट रेडी पझेशन फ्लॅट घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाशी व्यवहार करताना बिल्डरला पेमेंट टर्म्सवर सूट देण्याची गरजच नसते.

या गोष्टींचा विचार करता, अंडर-कन्स्ट्रक्शन फ्लॅटमध्ये गुंतवणूक करणं हेच शहाणपणाचं ठरेल. अशा फ्लॅटची कमी किंमत आणि जास्त रिटर्न्सची शक्यता ही तर मुख्य दोन कारणं आहेतच, शिवाय तुम्हाला फ्लॅटच्या डिझाईनमध्ये तुमच्या पसंतीनुसार किंवा वास्तुशास्त्रानुसार बदलही करुन घेता येऊ शकतो. बिल्डींग अजून बांधकामाच्या टप्प्यात असल्यामुळं, बिल्डर (संपूर्ण बिल्डींगच्या रचनेला धक्का बसणार नसेल किंवा त्याला अवास्तव खर्च करावा लागणार नसेल तर) मूळ डिझाईनमध्ये तुम्हाला हवे ते बदल करुन द्यायला तयारही होतो. अलीकडं 'सामूहीक खरेदी'चा पर्याय निवडणार्‍यांनाही अंडर-कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमधून जास्त फायदा मिळवता येऊ शकतो. यामध्ये, काही ग्राहक एकत्र येऊन बिल्डरला एकापेक्षा जास्त फ्लॅट्स एकावेळी विकत घेण्याची ऑफर देऊन त्या सर्वांच्या किंमतीवर घसघशीत सूट मिळवू शकतात. या पद्धतीमुळं घर-खरेदीच्या व्यवहारात लक्षणीय बचत होऊ शकते.

अर्थात अंडर-कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी विकत घेण्यामध्ये काही संभाव्य धोकेही आहेत. उदाहरणार्थ, बांधकाम सुरू करण्यापूर्वी बिल्डरनं आवश्यक त्या सर्व परवान्यांची व कागदपत्रांची पूर्तता केलेली नसणं किंवा प्रोजेक्ट पूर्ण करण्याइतकी बिल्डरची आर्थिक क्षमता नसणं, वगैरे. अशा गोष्टी टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे, त्याच शहरात इतर प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या नामवंत व प्रस्थापित बिल्डर-डेव्हलपरशीच व्यवहार करणं!


http://www.fairdealsangli.com/in-the-news/phletakharedih-redipajhesanakiandara-kanstraksana

Share/Bookmark

No comments:

Post a Comment