ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Thursday, June 12, 2014

मेट्रो

मुंबईच्या चकाला (अंधेरी) स्टेशनवरुन वर्सोव्याला जायचं होतं.
नविन रिलायन्स मेट्रोच्या घाटकोपर-वर्सोवा रुटवरच चकाला स्टेशन असल्यानं मेट्रो प्रवासाचा चान्स मिळाला.
चकाला स्टेशनवर लोकलच्या मानानं कमी असली तरी बर्‍यापैकी गर्दी होती.
तिकीटासाठी रांगेत उभं रहावं लागलं नाही. टच्‌-स्क्रीन किऑस्कवर ती सोय केली होती.
डेस्टीनेशन वर्सोवा सिलेक्ट केल्यावर मशिननं दहा रुपये मागितले.
दहाची नोट मशिनमधे टाकली की एक प्रिंटेड रिसीट आणि एक प्लास्टिकचं टोकन बाहेर!
एन्ट्री गेट आपोआप उघडझाप होणारं. गेटवर टोकन ठेवलं की गेट उघडणार.
(रिलायन्स मेट्रोचं प्रीपेड कार्ड असेल तर टोकन घ्यायची पण गरज नाही. शंभर रुपयांचं रिचार्ज, एक वर्षाची व्हॅलिडिटी. गेटवर टोकनऐवजी कार्ड ठेवलं की गेट उघडणार आणि चकाला स्टेशनची एन्ट्री तुमच्या नावावर. मग जिथं उतरणार त्या स्टेशनवर एक्झिटला कार्ड ठेवलं की त्या स्टेशनपर्यंतचं भाडं कार्डवरुन परस्पर कट. मस्त ना?)
मग एन्ट्री झाल्यावर सिक्युरिटी चेक.
त्यानंतर कुठंही कसलंही चेकींग, कसलीही रांग नाही.
प्लॅटफॉर्मवर मेट्रो आली की दरवाजे आपोआप उघडतात. आत गेलो की बंद होतात.
आतमधून मेट्रो पूर्ण एसी! मुंबईत!!
बाहेरुन वेगवेगळे डबे दिसले तरी आतून सलग पॅसेज. बेंच फक्त दोन बाजूंना, मधे उभं राहण्यासाठी रिकामी जागा. उभं राहताना आधारासाठी बार, सर्कल, हँडल...
पुढचं स्टेशन कुठलं येणार, याची स्पीकरवरुन अनाऊन्समेंट. शिवाय दरवाजावर त्या स्टेशनच्या नावाचा इंडिकेटर. ज्या बाजूचा दरवाजा उघडणार तिकडचा वेगळा इंडिकेटर.
वर्सोवा लास्ट स्टेशन. दहाव्या मिनिटाला बाहेर.
एक्झिट गेटवर प्लास्टिक टोकनसाठी कॉईन-बॉक्ससारखी फट. त्यात टोकन टाकलं की गेट उघडणार. पुन्हा कुठलं चेकींग, टी.सी. काहीच भानगड नाही.
हेच अंतर बाय रोड जायला म्हणे अर्ध्या-पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लागतो. मेट्रोनं फक्त दहा मिनिटं.
शिवाय ती दहा मिनिटंसुद्धा एसीमधे!
मुंबईचा लोकल प्रवासपण असा करता आला तर...?


Share/Bookmark

No comments:

Post a Comment