लढण्याआधीच गेलो हरुन आम्ही, लागली कुणामुळे ही वाट?
लढत लढत हारणार्या, हरत हरत जिंकणार्या
सळसळत्या तारुण्याची, हा देश पाहतो वाट.
ओवाळणारे भक्त नाही, झेपावणारे रक्त नाही
घाव झेलण्या शक्त नाही, लागली कुणामुळे ही वाट?
भक्तीने ओथंबलेल्या, शक्तीने ओसंडलेल्या
खणखणीत तारुण्याची, हा देश पाहतो वाट.
धडाडणारी छाती नाही, घडविणारी माती नाही
पोसणारी नाती नाही, लागली कुणामुळे ही वाट?
मातीत सोने पिकविणार्या, नात्यांतून भविष्य फुलविणार्या
कार्यकर्त्या तारुण्याची, हा देश पाहतो वाट - उगवेल कधी ती पहाट?
No comments:
Post a Comment