ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, May 16, 2010

शिकवणनाम

बालकें बाळबोध अक्षर । घडसून करावें सुंदर ।
जे देखतांचि चतुर । समाधान पावती ॥१॥

वाटोळें सरळें मोकळें । वोतलें मसीचें काळें ।
कुळकुळीत वोळी चालिल्या ढाळें । मुक्तमाळा जैशा ॥२॥

अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट ।
आडव्या मात्रा त्याही नीट । आर्कुलीं वेलांट्या ॥३॥

पहिलें अक्षर जें काढिलें । ग्रंथ संपेतों पाहात गेले ।
येका टांकेचि लिहिलें । ऐसें वाटे ॥४॥

अक्षराचें काळेपण । टांकाचे ठोंसरपण ।
तैसेंचि वळण वांकण । सारिखेंची ॥५॥

वोळीस वोळी लागेना । आर्कुली मात्रा भेदीना ।
खालिले वोळीस स्पर्शेना । अथवा लंबाक्षर ॥६॥

पान शिष्यानें रेखाटावें । त्यावरी नेमकेंचि ल्याहावें ।
दुरी जवळी न व्हावें । अंतर वोळीचें ॥७॥

कोठें शोधासी आडेना । चुकी पाहातां सांपडेना ।
गरज केली हें घडेना । लेखकापासुनी ॥८॥

ज्याचें वय आहे नूतन । त्यानें ल्याहावे जपोन ।
जनासी पडे मोहन । ऐसें करावे ॥९॥

बहु बारीक तरुणपणीं । कामा न ये म्हातरपणीं।
मध्यस्थ लिहिण्याची करणी । केली पाहिजे ॥१०॥

भोंवतें स्थळ सोडून द्यावें । मध्येंचि चमचमित ल्याहावें ।
कागद झडतांचि झडावें । नलगेचि अक्षर ॥११॥

ऐसा ग्रंथ जपोनि ल्याहावा । प्राणिमात्रांस उपजे हेवा ।
ऐसा पुरुष तो पाहावा । म्हणती लोक ॥१२॥

काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी ।
चटक लावुनी सोडावी । कांहीं येक ॥१३॥

- श्री रामदास स्वामी


Share/Bookmark

No comments:

Post a Comment