माझ्यासोबत बोलण्यासाठी,
क्षण क्षण वाचवून ठेव
माझ्यासोबत जगण्यासाठी.
ऐकायचंय की नाही मला
हा प्रश्न मुळीच नाही,
सांगावंसं वाटतंय तुला
याहून मोठं काहीच नाही.
माझा वेळ, तुझा वेळ
वेळेचं काम वाहत जायचं,
तो जातो वाहत वाहत
आपण फक्त चिंब व्हायचं.
शब्द शब्द मोजून ठेव
मलाही कधी चुकावंसं वाटेल,
हेच शब्द आठवून पुन्हा
तुझ्याकडंच झेपावंसं वाटेल...
No comments:
Post a Comment