ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, June 20, 2010

कोहिनूर तो हरपुनी गेला...


ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्राज तथा वि. वा. शिरवाडकर यांना श्रद्धांजली -
दै
. केसरी, २० मार्च १९९९






कुसुमाग्रज गेले. मराठी साहित्याच्या अवकाशातील एक तारा निखळला. पण इतर अनेक तार्‍यांपैकी एक, यापेक्षा काही वेगळे अस्तित्व या तार्‍याचे होते. आपले स्वतःचे सौरमंडल निर्माण करुन सार्‍या ब्रह्मांडाला आपल्याभोवती फिरायला लावणार्‍या सूर्याचे तेज या महामानवाकडे होते.

"सात रंगांची मैफल वाहे येथे हवेतून;
येथे मरणही नाचे मोरपिसारा लेवून"

असा एक उल्हासदायी आनंदलोक निर्माण करताना विश्वामित्रांचाच उत्साह त्यांच्यात सामावत असे. इहलोकाच्या दुःखी, निराश सृष्टीला आव्हान देणारी एक प्रबळ, हसरी प्रतिसृष्टी त्यांनी उभी केली. आपल्या लेखणीच्या जोरावर त्यांनी अनेक वादळे शमविली. अनेक निराशेचे डोंगर पचविले आणि साहित्य रसिकांसमोर सारे जीवन उलगडून सादर केले. जीवनाची मजा कशी लुटायची असते, मरणाला कसे सामोरे जायचे असते, प्रेम कसे नि कुणावर करायचे असते, निराशा कशी टाळायची असते, आशा कशी जपायची असते, अशी अनेक प्रकारची शिकवणूक त्यांनी आपल्या साहित्यातून आपल्याला दिली. असा एक दिलदार मार्गदर्शक गेल्याचे दुःख सहन करण्यापलीकडचे आहे. कुसुमाग्रजांनी दाखवलेला मार्ग जपण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे. सूर्य बुडाला तरी, जाता जाता आपले तेज तो चंद्राजवळ देऊन जातो. त्याचप्रमाणे आपल्याला ही साहित्य-ज्योत तेवत ठेवायची आहे. कुसुमाग्रजांची महानता शब्दांत कैद करण्यापलीकडची आहे. त्यांची स्मृती जागवणे हे म्हणूनच तर अवघड काम आहे.

"अखेर मी कोण स्मृती जागवणारा?
स्मृतीच मला जगवतात.
अखेर मी कोण शब्द जपणारा?
शब्दच मला जपतात."

Share/Bookmark

No comments:

Post a Comment