"बक्षिसं,
पदव्या, मानमरातब, प्रसिद्धी, पैसा हे येऊन फक्त आपली पाठ थोपटतात आणि
पुन्हा धावत राहायचं बळ देतात. तेही महत्त्वाचं असतं. म्हणजे, मॅरेथॉन
धावताना रस्त्यात पाण्याचा ग्लास देत, पाठीवर थोपटून प्रोत्साहन देणारे
असतात ना, तशी बक्षिसं वगैरे असतात. तिथे फार रेंगाळायचं नसतं. पाण्याचा एक
घोट घेत, जरा फ्रेश होऊन पुढे जायचं असतं. पाणी देऊन फ्रेश करणा-या त्या
थांब्याचं महत्त्व आहेच, पण त्या पाण्याच्या ग्लाससाठी धावायचं नसतं!"
- नविन काळे ('मज्जानो मंडे' या पुस्तकातून)
- नविन काळे ('मज्जानो मंडे' या पुस्तकातून)
No comments:
Post a Comment