ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, November 13, 2016

आयुष्याची कणीक मळतो...

पीठात कष्टाच्या थोडेसे
मीठ स्वप्नांचे मिसळतो
आयुष्याची कणीक मळतो...

परिस्थितीच्या पाण्यामध्ये
विचार एकजीव करतो
आयुष्याची कणीक मळतो...

तेलाच्या हाताने अवघ्या
जगण्याला आकार देतो
आयुष्याची कणीक मळतो...

सुबक बनावी कार्य-चपाती
मनात इतकी आशा धरतो
आयुष्याची कणीक मळतो...

क्षुल्लक दुर्लक्षित कामातून
ब्रह्मांडाचा अर्थही कळतो
आयुष्याची कणीक मळतो...

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६



Share/Bookmark

No comments:

Post a Comment