रात्री राहिला दरवाजा उघडा
घरात शिरला मोठ्ठा किडा
किड्याचे पंख मोठ्ठे-मोठ्ठे
पंखांवर होते चट्टे-पट्टे
किड्याला होत्या लांब-लांब मिशा
बाळाला वाटली खूप-खूप मज्जा
किड्याने केली फडफड सुरु
बाळ पळू लागले तुरु तुरु
किड्याने मारला जमिनीवर सूर
बाळ म्हणाले, मी पण शूर!
बाळाने घेतला हातात झाडू
म्हणाले, किड्याला बाहेर काढू
बाळाने फिरवला झाडू गरगर
किड्याने घातला गोंधळ घरभर
किड्याने धरली खिडकी
बाळाला भरली धडकी
घराबाहेर जातो का घरामधे येतो?
जातो का येतो, येतो का जातो?
जाऊ दे त्याला जाईल जिकडे
बाळाने केले दुर्लक्ष तिकडे
किड्याला दिले बाबांवर सोडून
बाळ झोपी गेले पांघरुण घेऊन...
- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
No comments:
Post a Comment