ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, October 27, 2020

Gazalkar - Marathi Gazals Collection


उत्सवाची कोणत्याही शान वाढवते गझल

उर्दू घ्या वा घ्या मराठी, छान बागडते गझल”


गझलकार’ हा श्रीकृष्ण राऊत यांचा मराठी गझलांचा ब्लॉग. या ब्लॉगचा ‘सीमोल्लंघन २०२०’ हा वार्षिकांक प्रत्येक गझल रसिकानं नक्की वाचण्यासारखा आहे. सुरेशकुमार वैराळकर, श्रीकृष्ण राऊत, अमोल शिरसाट यांनी संपादित केलेल्या या अंकामधे महाराष्ट्रभरातल्या १५७ मराठी गझलकारांच्या गझला आणि गझलविषयक काही लेखांचा समावेश आहे. या अंकातल्या मला आवडलेल्या काही गोष्टींचा उल्लेख इथं करतोय.


सुरेशकुमार वैराळकर यांनी लिहिलेला ‘आँख में पानी रखो, होटों पे चिंगारी रख्खो…’ हा संपादकीय लेख. राहत इंदौरी साहेबांचे काही महत्त्वाचे शेर यामधे वाचायला मिळतात. गझल-वाचनाचा ‘मूड’ सेट करणारा हा लेख आहे.


‘फिर संसद में हंगामा’ या प्रकाश पुरोहित यांच्या दीर्घ गझलेवर श्याम पारसकर यांची टिप्पणी आणि यातले काही शेर जरूर वाचण्यासारखे. उदाहरणादाखल -

अपने रिश्तेदार बहुत… रिश्तों का विस्तार बहुत

वैसे तो है यार बहुत… मतलब के दो चार बहुत


अमित वाघ यांची आवडलेली गझल -

मीच यावे का तुझ्या दारी विठोबा

तूच ये आता तुझी बारी विठोबा


स्वाती शुक्ल यांची आवडलेली गझल -

प्रेमामध्ये डुबलो आपण

नंतर मग गुदमरलो आपण

याच गझलेचा शेवटचा शेर -

बरेच झाले भांडण झाले

आता दोघे सुटलो आपण

क्या बात है… बहोत खूब!


स्वाती शुक्ल यांचीच दुसरी गझल -

पुन्हा बघ फोडला आहे जुन्या वादास फाटा तू

विषय साधाच होता पण किती गंभीर केला तू

या गझलेतला एक ‘कन्टेम्पररी’ शेर फारच आवडला -

कधीचा ड्राफ्ट मधला हा जुना मेसेज आहे की

“घरी मी एकटी आहे जरा येऊन जा ना तू”


कालीदास चावडेकर यांची आवडलेली ‘हझल’ -

हवेवर स्वार झालो मी, हिला सोडून आल्यावर

सुखाने ठार झालो मी, हिला सोडून आल्यावर

या हझलेतले सगळेच शेर भन्नाट आहेत. नक्की वाचावी अशी ही रचना.


शेख गनी यांची आवडलेली गझल -

पैशाविना बिचारी बेजार फार होती

लाचार जिंदगानी नुसती भिकार होती

याच गझलेतले दोन उत्तम शेर -

मी शिकविले ज्यांना पक्ष्यास हेरण्याचे

त्यांनीच आज माझी केली शिकार होती

आणि

पोटामुळे जरासा बदनाम काय झालो

म्हणतात लोक माझी आदत टुकार होती


या आणि बाकीच्या गझलकारांच्या गझला आवर्जून वाचाव्या अशाच आहेत. इथं फक्त उदाहरणादाखल काही उत्तम शेरांचा उल्लेख केलाय. हा संपूर्ण अंक http://gazalakar20.blogspot.com या लिंकवर जाऊन वाचता येईल.

नक्की वाचा आणि बाकीच्या गझलप्रेमींनासुद्धा कळवा.


- मंदार शिंदे

२७/१०/२०२०

9822401246

shindemandar@yahoo.com




Share/Bookmark

No comments:

Post a Comment