ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, October 15, 2018

वाचनध्यास २०१८




दि. १३ व १४ ऑक्टोबर, २०१८ रोजी पुस्तकांच्या गावात वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने वाचनध्यास या उपक्रमाचे व पाऊसवेळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाचनध्यास या सलग वाचनाच्या उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून ५० वाचकांनी सहभाग घेतला. भिलार गावातील ग्रामस्थांच्या आदरतिथ्याने व प्रकल्पातील विपुल ग्रंथसंपदेने मंत्रमुग्ध झाल्याची भावना वाचक सहभागींनी आपल्या अभिप्रायातून व्यक्त केली.
दि १४, ऑक्टोबर २०१८ च्या संध्येला वाचनध्यास उपक्रमाच्या समारोपाच्यावेळी ‘पाऊसवेळा’ हा कार्यक्रम पार पडला.
पाऊसाविषयीच्या अनेक कविता, गाणी, ललित रचना यांचे सादरीकरण या मैफीलीत डॉ. वंदना बोकील, अनुराधा जोशी, अपर्णा केळकर, अक्षय वाटवे, आशुतोष मुंगळे, मयुरेश जोशी व पिनाक आगटे या सहभागी कलाकारांनी केले. मराठीतल्या अनेक नामवंत साहित्यिकांच्या लेखणीतून झरलेल्या शब्दसरींमध्ये जमलेले प्रेक्षक न्हाऊन निघाले. या कार्यक्रमाला भिलार व आजूबाजूच्या गावातील अनेक रसिक प्रेक्षकांनी आवर्जून हजेरी लावली होती.


Share/Bookmark

No comments:

Post a Comment