तू गेल्यावर फिके चांदणे, घरपरसूंही सुने-सुके
मुले मांजरापरी मुकी अन् दर दोघांच्या मधे धुके
तू गेल्यावर घरांतदेखिल पाउल माझे अडखळते
आणि आटुनी हवा भवतिची श्वासास्तव मन तडफडते
तू गेल्यावर या वाटेने चिमणीदेखिल नच फिरके
कसे अचानक झाले न कळे सगळे जग परके परके
तू गेल्यावर जडून पनगत लागे पिंपळ हाय गळू
गळ्यांतले मम गाणे झुरते : वाटे मरते हळूहळू
तू गेल्यावर दो दिवसांस्तव जर ही माझी अशी स्थिती
खरीच माझ्या आधी गेलीस तर मग माझी कशी गती?
- बा.भ. बोरकर
No comments:
Post a Comment