ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, December 7, 2020

Short Story - Raja

नवीन कथा: "राजा"

👑📱🐶💡🤔💭
(लेखकः मंदार शिंदे ९८२२४०१२४६)

    राजा सकाळी उठला. डोळे चोळत त्यानं इकडं-तिकडं बघितलं. महालात दुसरं कुणीच नव्हतं. मातोश्री आज लवकर मोहिमेवर गेल्या वाटतं! त्यानं विचार केला.

    आळोखे-पिळोखे देत राजा उभा राहिला. रोजच्या सवयीनं राजवस्त्राची घडी घालू लागला. वयानुसार वाढत्या उंचीमुळं हे राजवस्त्र अंगावर पांघरायला पुरेनासं झालं होतं. शिवाय नेहमी डोक्याकडं घ्यायची बाजू काल चुकून पायाकडं घेतली होती. तोंडावर पांघरलं की बरोबर डोळ्यांसमोर राजवस्त्राची खिडकी यायची, ज्यातून महालाच्या छतापलिकडचे तारे बघत राजाला छान झोप लागायची. काल उलट-सुलट पांघरल्यामुळं या खिडकीत पाय जाऊन तिचा दरवाजा झाला होता.

    आपल्या राजवस्त्राची मातोश्रींच्या राजवस्त्राशी गुपचुप अदलाबदल करायचा विचार राजाच्या मनात चमकून गेला. पण मातोश्री झोपतात त्या कोपऱ्यात नजर टाकली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गेले कित्येक महिने त्या अंगावर पांघरायला घेतच नाहीत. त्यांचं जुनं राजवस्त्र पलिकडच्या बाजूला दोन बांबूंना बांधून झोळी केली होती. बादशाहची झोळी!

    राजा त्या झोळीपाशी जाऊन थांबला. रिकाम्या झोळीत बसून झोका घ्यायचा त्याला मोह झाला. पण स्वतःच्या वाढत्या उंचीबरोबर वाढणाऱ्या वजनाची सुद्धा त्याला जाणीव होती. आपण ह्या झोळीत बसलो आणि झोळी फाटली तर? कसं का असेना, अंगावर पांघरायला एक राजवस्त्र आहे, ते बादशाहच्या नवीन झोळीसाठी कुर्बान करायची राजाची तयारी नव्हती.

    बादशाहचं नाव कधी ठेवणारेत पण? चहाचं पातेलं चुलीवर ठेवत तो विचार करू लागला. बादशाह काय भारी नाव आहे… राजाचा भाऊ बादशाह! पण बादशाहच ठेवतील का नाव? मातोश्रींना नव्हती आवडली आपली सूचना… काहीतरी देवाबिवाचं नाव ठेवायचं म्हणे. असं देवाचं नाव ठेवलं म्हणून कुणी खरंच देव होतं का? आता माझ्याच नावाचं बघा…

    चहा उकळेपर्यंत राजा महालाबाहेर जाऊन चूळ भरून आला. अलीकडंच तो चुलीवरची बरीच कामं करायला शिकला होता. चहा बनवायचा, भात शिजवायचा, रस्सा उकळायचा, पापड भाजायचा… कुणी शिकवलं नव्हतं, पण मातोश्रींना ही सगळी कामं करताना बघितलं होतं त्यानं लहान असल्यापासून.

    मातोश्री आता बादशाहला घेऊन जातात कामावर, आधी राजाला घेऊन जायच्या तशा. पण आता राजा मोठा झाला होता ना. त्यामुळं त्याला एकट्याला घरी सोडून जाणं शक्य होतं. पण मातोश्री परत येईपर्यंत पोटातली भूक थोपवणं राजाला शक्य नव्हतं. म्हणून मग घेतली त्यानं स्वतःच चुलीवरची कामं शिकून…

    चहात बुडवायला काही मिळतंय का हे शोधताना राजाला अचानक 'तो' दिसला - मोबाईल! मातोश्री मोहिमेवर जाताना विसरून गेल्या की काय? घाईघाईनं त्यानं मोबाईल हातात घेतला आणि चालू करायचा प्रयत्न करू लागला. थोडा वेळ झटापट केल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याचं - म्हणजे मोबाईलचं - चार्जिंग संपलेलं आहे. काल कामावर मोबाईल चार्ज करायचं मातोश्री विसरल्या असणार… म्हणून आमच्यावर ही जबाबदारी सोपवून गेलेल्या दिसतात. चहा पिता-पिता त्यानं विचार केला.

    चहाचा ग्लास विसळून झाल्यावर, बंद मोबाईल आणि चार्जर काळजीपूर्वक खिशात कोंबून राजा महालाबाहेर पडला. महालाचा बुलंद दरवाजा ओढून घेत त्यानं लोखंडी कडी अडकवली आणि सराईतपणे कुलुपात किल्ली फिरवली. आपल्या वयाच्या मानानं जरा जास्तच जबाबदाऱ्या आपल्यावर येऊन पडल्यात असं त्याला वाटून गेलं. कुलुप नीट लागलं की नाही हे बघायला त्यानं दोन-तीन हिसडे दिले. तिसऱ्या हिसड्याला लोखंडी कडीच बाहेर आल्यासारखी वाटली. पण कुलुप पक्कं बंद झालं होतं. स्वतःवर खूष होत राजा देवळाच्या दिशेनं निघाला.

    वस्तीतलं देऊळ म्हणजे त्याच्या दृष्टीनं 'चार्जिंग स्टेशन' होतं. वस्तीतल्या दादा, काका, मामा लोकांना देवळात आपापले मोबाईल चार्जिंगला लावताना त्यानं खूप वेळा बघितलं होतं. आज तो स्वत: तिथं मोबाईल चार्जिंगला लावणार होता. त्याला अजूनच मोठं झाल्यासारखं वाटू लागलं. 'दादा' झाल्यासारखं वाटू लागलं. तसा तो खरोखरचा दादा झाला होताच की - छोट्या बादशाहचा राजादादा!

    देवळाच्या पायऱ्यांवर त्याला एक नवीन कुत्रं बसलेलं दिसलं. आपल्या प्रजेची खडान्‌खडा माहिती राजाला असायची, त्यामुळं 'लोकल' कोण आणि 'फॉरेनर' कोण हे त्याला पटकन लक्षात यायचं.

    "हॅल्लो डॉगी! मायसेल्फ जॉर्ज अब्राहम कॅन्डी. लेकीन प्यार से लोग मुझे 'राजा' कहते हैं…"

    आपल्या स्वतःच्या आईला ऊर्फ मातोश्रींना 'लोग' म्हणताना त्याला कसंतरीच वाटलं. ती एकटीच बिचारी त्याला प्रेमानं 'राजा' म्हणायची. बाकी सगळ्यांसाठी तो फक्त 'राजू' होता. पण हे सगळं त्या 'फॉरेनर' कुत्र्याला कुठून माहिती असणार? त्याला आपण आपलं नाव जे सांगू तेच तो लक्षात ठेवणार, नाही का? आपली ओळख आपणच बनवायची, हे राजानं लहानपणीच ठरवून टाकलं होतं. लहानपणी म्हणजे फार वर्षांपूर्वी नव्हे, पण दादा व्हायच्या जरा आधी, बादशाहच्या जन्माआधी.

    त्या 'फॉरेनर' कुत्र्यानं बसल्या जागेवरच आपले पुढचे पाय अजून पसरवत राजा ऊर्फ जॉर्ज अब्राहम कॅन्डी साहेबांना कोपरापासून नमस्कार केला. स्वत:वरच खूष होत राजानं त्या पायरीपलीकडं उडी मारली आणि देवळाच्या सभामंडपात प्रवेश केला.

    त्या लांबलचक हॉलमधले चार्जिंग पॉइंट शोधणं अजिबात अवघड नव्हतं. प्रत्येक बोर्डपाशी भिंतीला टेकून उभी राहिलेली दादा, काका, मामा मंडळी आपापल्या किंवा एकमेकांच्या मोबाईलमधे काहीतरी बघण्यात गुंग होती. दुसऱ्या टोकाला कोपऱ्यात एकच बोर्ड होता जिथं कुणीच उभं किंवा बसलेलं नव्हतं.

    झपझप पावलं टाकत राजा त्या बोर्डपाशी गेला. खिशातून बंद मोबाईल आणि चार्जर बाहेर काढून तो रिकामं सॉकेट शोधू लागला. प्रत्येक सॉकेटमधे काही ना काही घुसवलेलं त्याला दिसलं. म्हणूनच इथं कुणी उभं राहिलं नव्हतं तर! राजानं प्रत्येक पिनमागच्या वायरचा डोळ्यांनी माग काढला. सगळ्या वायर बघून झाल्यावर नक्की कुठली पिन काढायची ते त्यानं ठरवलं. ‘ती’ पिन काढून तिथं चार्जर लावणार तेवढ्यात…

    "लाईट कुणी बंद केली रे कळसाची?"

    बुलेट काकांच्या किंचाळण्यानं राजा दचकला. बुलेट काका देवळाचा सगळा कारभार बघायचे. त्यांचं खरं नाव राजाला माहिती नव्हतं, पण त्यांच्याकडं एक धडाम्-धुडुम् आवाज काढणारी बुलेट गाडी होती, त्यामुळं त्यांना 'बुलेट काका' असंच नाव पडलं होतं.

    "बहिरे झाला काय रे सगळे? काय विचारतोय मी? कळसाची लाईट कुणी बंद केली?" बुलेट गाडीपेक्षा मोठ्या आवाजात बुलेट काका किंचाळत होते.

    आपला मोबाईल आणि चार्जर घेऊन हळूच बोर्डपासून सटकायचा राजानं प्रयत्न केला.

    "तू? मोबाईल लावतोस काय चार्जिंगला?" बुलेट काका अजून फुटतच होते. “कुणाचा मोबाईल आणलास चोरून?"

    "चोरुन नाही काका, आईचा आहे. चार्जिंग संपलं होतं म्हणून…"

    "म्हणून इथं आलास फुकट चार्जिंग करायला? आणि त्यासाठी कळसाची लाईट बंद केलीस तू?"

    "नाही काका… म्हणजे होय. मला वाटलं, आता दिवसा लाईटची गरज नसेल कळसाला…"

    "गरज नसेल? अरे देवळाच्या कळसावर पाच लाख रूपये खर्च केलेत मी. किती? पाच लाख! चोवीस तास लाईट चालू ठेवायचे म्हणून सांगून ठेवलंय सगळ्यांना. आता तू गरज ठरवणार होय त्याची? चल निघ इथून…"

    पाच लाख म्हणजे पाचावर पाच शून्य की सहा, यावर विचार करत राजा निमूटपणे देवळाबाहेर जायला निघाला. आत येताना भेटलेलं 'फॉरेनर' कुत्रं त्याला दिसलं नाही. बहुतेक बुलेट काकांनी आत येताना त्याच्या पेकाटात लाथ घातली असणार. देवळाच्या पायरीवरसुद्धा त्यांनी काही हजार तरी खर्च केले असतीलच ना? मग त्यावर कुणी परप्रांतीय फुकट येऊन बसलेला त्यांना कसा चालेल?

    पण बुलेट काकांकडं एवढे पैसे येतात कुठून? आपल्या मातोश्री दिवसरात्र काम-काम-काम करतात; आपले पिताश्री वेगवेगळ्या राज्यांमधे जाऊन काम शोधत असतात, जिकडं काम मिळेल तिकडंच राहतात. तरी आपल्याकडं एवढे पैसे येत नाहीत. बुलेट काका तर कधी काम करताना दिसत नाहीत. तरी त्यांच्याकडं खर्च करायला केवढे पैसे असतात. बहुतेक 'पैसे खर्च करणं' हेच त्यांचं काम असेल! पण मग हे पैसे ते स्वतःच्या घरावर खर्च करायचे सोडून देवळावर का खर्च करतात? जाऊ दे, आपल्याला तर काहीच कळत नाही. पिताश्री भेटले पुढच्या वेळी की विचारू त्यांनाच…

    विचार करता-करता राजा परत घरापाशी येऊन पोहोचला. कुलूप उघडून अंधाऱ्या महालात जायची त्याची इच्छा झाली नाही. आपण अजून थोडे मोठे झालो की एवढी भीती वाटणार नाही अंधाराची, त्यानं स्वतःला समजावलं. तो बाहेरच महालाच्या भिंतीला टेकून बसला.

    अजून थोडे मोठे म्हणजे किती मोठे? अठरा वर्षांचा झालास की तू स्वतंत्र मोठा माणूस होशील, असं पिताश्री आणि मातोश्री दोघंपण म्हणायचे. आता खूप वर्षं नव्हती राहिली अठरासाठी. चार-पाच-सहा वर्षांतच येईल अठरावं. पण बादशाहला खूपच वर्षं लागतील अजून, नाही का? केवढुसा आहे तो आत्ता… मातोश्री दमून जातात त्याचं सगळं करता-करता. पण आपण असतो ना मदतीला!

    आपण बादशाहएवढे असताना कुठं कोण होतं मातोश्रींच्या मदतीला? एकटीनंच केलं असेल ना आपलं सगळं? अजून किती वर्षं करत राहणार? आपण काहीतरी करायला पाहिजे… काय करूया? आपल्याला कामावरसुध्दा नेत नाहीत. शाळेत जा, भरपूर शीक, मोठा हो, असं म्हणत असतात. बुलेट काका गेले असतील का शाळेत? कुठल्या शाळेत शिकले असतील की एवढे मोठेच झाले? एकदा विचारलं पाहिजे…

    विचार करता-करता राजाचा डोळा लागला. चार्जिंग नसलेला मोबाईल हातात घट्ट पकडून, तिथंच महालाच्या भिंतीला टेकून तो झोपून गेला, आता थेट अठरा वर्षांचे झाल्यावरच उठू, असं काहीतरी स्वप्न बघत…

👑📱🐶💡🤔💭

- मंदार शिंदे
9822401246


Share/Bookmark

Monday, November 23, 2020

Dreams and Their Meanings

बेहद उमस! मन की गहरी से गहरी पर्त में एक अजब-सी बेचैनी। नींद आ भी रही है और नहीं भी आ रही। नीम की डालियाँ खामोश हैं। बिजली के प्रकाश में उनकी छायाएँ मकानों, खपरैलों, बारजों और गलियों में सहमी खड़ी हैं।

मेरे अर्धसुप्त मन में असंबद्ध स्वप्न-विचारों का सिलसिला।

स्वर्ग का फाटक। रूप, रेखा, रंग, आकार कुछ नहीं जैसा अनुमान कर लें। अतियथार्थवादी कविताएँ जिनका अर्थ कुछ नहीं जैसा अनुमान कर लें। फाटक पर रामधन बाहर बैठा है। अंदर जमुना श्वेतवसना, शांत, गंभीर। उसकी विश्रृंखल वासना, उसका वैधव्य, पुरइन के पत्तों पर पड़ी ओस की तरह बिखर चुका है, वह वैसी ही है जैसी तन्ना को प्रथम बार मिली थी।

फाटक पर घोड़े की नालें जड़ी हैं। एक, दो, असंख्य! दूर धुंधले क्षितिज से एक पतला धुएँ की रेखा-सा रास्ता चला आ रहा है। उस पर कोई दो चीजें रेंग रही हैं। रास्ता रह-रह कर काँप उठता है, जैसे तार का पुल।

बादलों में एक टार्च जल उठती है। राह पर तन्ना चले आ रहे हैं। आगे-आगे तन्ना, कटे पाँवों से घिसलते हुए, पीछे-पीछे उनकी दो कटी टाँगें लड़खड़ाती चली आ रही है। टाँगों पर आर.एम.एस. के रजिस्टर लदे हैं।

फाटक पर पाँव रुक जाते हैं। फाटक खुल जाते हैं। तन्ना फाइल उठा कर अंदर चले जाते हैं। दोनों पाँव बाहर छूट जाते हैं। बिस्तुइया की कटी हुई पूँछ की तरह छटपटाते हैं।

कोई बच्चा रो रहा है। वह तन्ना का बच्चा है। दबे हुए स्वर : यूनियन, एस.एम.आर., एम.आर.एस., आर.एम.एस., यूनियन। दोनों कटे पाँव वापस चल पड़ते हैं, धुएँ का रास्ता तार के पुल की तरह काँपता है।

दूर किसी स्टेशन से कोई डाकगाड़ी छूटती है।...

...मेरा मन और भी उदास हो गया और मैंने सोचा चलो माणिक मुल्ला के यहाँ ही चला जाए। मैं पहुँचा तो देखा कि माणिक मुल्ला चुपचाप बैठे खिड़की की राह बादलों की ओर देख रहे हैं और कुरसी से लटकाए हुए दोनों पाँव धीरे-धीरे हिला रहे हैं। मैं समझ गया कि माणिक मुल्ला के मन में कोई बहुत पुरानी व्यथा जाग गई है क्योंकि ये लक्षण उसी बीमारी के होते हैं। ऐसी हालत में साधारणतया माणिक-जैसे लोगों की दो प्रतिक्रियाएँ होती हैं। अगर कोई उनसे भावुकता की बात करे तो वे फौरन उसकी खिल्ली उड़ाएँगे, पर जब वह चुप हो जाएगा तो धीरे-धीरे खुद वैसी ही बातें छेड़ देंगे। यही माणिक ने भी किया। जब मैंने उनसे कहा कि मेरा मन बहुत उदास है तो वे हँसे और मैंने जब कहा कि कल रात के सपने ने मेरे मन पर बहुत असर डाला है तो वे और भी हँसे और बोले, 'उस सपने से तो दो ही बातें मालूम होती हैं।'

'क्या?' मैंने पूछा।

'पहली तो यह कि तुम्हारा हाजमा ठीक नहीं है, दूसरे यह कि तुमने डांटे की 'डिवाइना कामेडिया' पढ़ी है जिसमें नायक को स्वर्ग में नायिका मिलती है और उसे ईश्वर के सिंहासन तक ले जाती है।' जब मैंने झेंप कर यह स्वीकार किया कि दोनों बातें बिलकुल सच हैं तो फिर वे चुप हो गए और उसी तरह खिड़की की राह बादलों की ओर देख कर पाँव हिलाने लगे।


'सूरज का सातवाँ घोडा'
लेखक : धर्मवीर भारती


Share/Bookmark

Tuesday, November 17, 2020

Migration of Visuals

 


The all-day running news channels have to compete not only with other news channels, but also with the channels showing serials, movies, sports, songs, and even cartoon programmes. Because the audience with a remote control in their hands can switch within a moment from the news to a serial or a movie or a sport. As a result, the news also become dramatic and musical like the movies; sometimes as entertaining as the cartoons. This ongoing migration of the visuals occurs every moment, thanks to the remote control in our hands.


    This also applies to the migration of visuals in another frame present all the time in our hands. We assume that we are running our own channels - for some of us, it is a channel creating social awareness all the time; for some, it is a channel for expression against the establishment. But when we lose the most important sense of responsibility, we too start being dramatic like our competitors, with only difference in the details of the dramatization.


- Avdhoot Dongre



Share/Bookmark

Sunday, November 15, 2020

Tu Gelyavar - Borkar Poem

 



तू गेल्यावर फिके चांदणे, घरपरसूंही सुने-सुके

मुले मांजरापरी मुकी अन् दर दोघांच्या मधे धुके


तू गेल्यावर घरांतदेखिल पाउल माझे अडखळते

आणि आटुनी हवा भवतिची श्वासास्तव मन तडफडते


तू गेल्यावर या वाटेने चिमणीदेखिल नच फिरके

कसे अचानक झाले न कळे सगळे जग परके परके


तू गेल्यावर जडून पनगत लागे पिंपळ हाय गळू

गळ्यांतले मम गाणे झुरते : वाटे मरते हळूहळू


तू गेल्यावर दो दिवसांस्तव जर ही माझी अशी स्थिती

खरीच माझ्या आधी गेलीस तर मग माझी कशी गती?


- बा.भ. बोरकर



Share/Bookmark

Monday, November 9, 2020

Marathi Shayari by Bhausaheb Patankar


 

ओळखी नव्हती तरीही, भेटावया आले मला

खांद्यावरी अपुल्या स्वत:च्या, वाहुनी नेले मला

ना कळे की पूर्वजन्मी, काय मी त्यांना दिले

इतके खरे की आज त्यांना, थँक्सही नाही दिले

- भाऊसाहेब पाटणकर


मृत्यो, अरे येतास जर का, थोडा असा आधी तरी

ऐकुनी जातास तूही, शेर एखादा तरी

एकही नाही कला तू, मानवांची पाहिली

जेथे जिथे गेलास त्यांची, मातीच नुसती पाहिली

- भाऊसाहेब पाटणकर



ऐसे नव्हे मृत्यूस आम्ही, केव्हाच नाही पाहिले

खूप आहे पाहिले त्या, प्रत्येक जन्मी पाहिले

मारिले आहे आम्हीही, मृत्यूस या प्रत्येकदा

नुसतेच ना मेलो आम्ही, जन्मलो प्रत्येकदा

- भाऊसाहेब पाटणकर




Share/Bookmark

Tuesday, October 27, 2020

Gazalkar - Marathi Gazals Collection


उत्सवाची कोणत्याही शान वाढवते गझल

उर्दू घ्या वा घ्या मराठी, छान बागडते गझल”


गझलकार’ हा श्रीकृष्ण राऊत यांचा मराठी गझलांचा ब्लॉग. या ब्लॉगचा ‘सीमोल्लंघन २०२०’ हा वार्षिकांक प्रत्येक गझल रसिकानं नक्की वाचण्यासारखा आहे. सुरेशकुमार वैराळकर, श्रीकृष्ण राऊत, अमोल शिरसाट यांनी संपादित केलेल्या या अंकामधे महाराष्ट्रभरातल्या १५७ मराठी गझलकारांच्या गझला आणि गझलविषयक काही लेखांचा समावेश आहे. या अंकातल्या मला आवडलेल्या काही गोष्टींचा उल्लेख इथं करतोय.


सुरेशकुमार वैराळकर यांनी लिहिलेला ‘आँख में पानी रखो, होटों पे चिंगारी रख्खो…’ हा संपादकीय लेख. राहत इंदौरी साहेबांचे काही महत्त्वाचे शेर यामधे वाचायला मिळतात. गझल-वाचनाचा ‘मूड’ सेट करणारा हा लेख आहे.


‘फिर संसद में हंगामा’ या प्रकाश पुरोहित यांच्या दीर्घ गझलेवर श्याम पारसकर यांची टिप्पणी आणि यातले काही शेर जरूर वाचण्यासारखे. उदाहरणादाखल -

अपने रिश्तेदार बहुत… रिश्तों का विस्तार बहुत

वैसे तो है यार बहुत… मतलब के दो चार बहुत


अमित वाघ यांची आवडलेली गझल -

मीच यावे का तुझ्या दारी विठोबा

तूच ये आता तुझी बारी विठोबा


स्वाती शुक्ल यांची आवडलेली गझल -

प्रेमामध्ये डुबलो आपण

नंतर मग गुदमरलो आपण

याच गझलेचा शेवटचा शेर -

बरेच झाले भांडण झाले

आता दोघे सुटलो आपण

क्या बात है… बहोत खूब!


स्वाती शुक्ल यांचीच दुसरी गझल -

पुन्हा बघ फोडला आहे जुन्या वादास फाटा तू

विषय साधाच होता पण किती गंभीर केला तू

या गझलेतला एक ‘कन्टेम्पररी’ शेर फारच आवडला -

कधीचा ड्राफ्ट मधला हा जुना मेसेज आहे की

“घरी मी एकटी आहे जरा येऊन जा ना तू”


कालीदास चावडेकर यांची आवडलेली ‘हझल’ -

हवेवर स्वार झालो मी, हिला सोडून आल्यावर

सुखाने ठार झालो मी, हिला सोडून आल्यावर

या हझलेतले सगळेच शेर भन्नाट आहेत. नक्की वाचावी अशी ही रचना.


शेख गनी यांची आवडलेली गझल -

पैशाविना बिचारी बेजार फार होती

लाचार जिंदगानी नुसती भिकार होती

याच गझलेतले दोन उत्तम शेर -

मी शिकविले ज्यांना पक्ष्यास हेरण्याचे

त्यांनीच आज माझी केली शिकार होती

आणि

पोटामुळे जरासा बदनाम काय झालो

म्हणतात लोक माझी आदत टुकार होती


या आणि बाकीच्या गझलकारांच्या गझला आवर्जून वाचाव्या अशाच आहेत. इथं फक्त उदाहरणादाखल काही उत्तम शेरांचा उल्लेख केलाय. हा संपूर्ण अंक http://gazalakar20.blogspot.com या लिंकवर जाऊन वाचता येईल.

नक्की वाचा आणि बाकीच्या गझलप्रेमींनासुद्धा कळवा.


- मंदार शिंदे

२७/१०/२०२०

9822401246

shindemandar@yahoo.com




Share/Bookmark

Monday, October 12, 2020

Technology, Automation, and Creativity

 


टेक्नॉलॉजी, ऑटोमेशन, आणि आपली क्रिएटीव्हिटी

मंदार शिंदे 9822401246



सतराव्या शतकात इंग्लंडमधे थॉमस सेव्हरी नावाचा इंजिनिर वाफेच्या इंजिनाचं पेटंट मिळवण्यासाठी धडपड करत होता. त्यानंतर दीडशे वर्षांनी भारतात पहिली रेल्वे (मुंबई - ठाणे पॅसेंजर १८५३ साली) सुरु झाली. अमेरिकेत टी-ऐन्ड-टी कंपनीनं १९४६ साली मोबाई सेवा सुरु केली. त्यानंतर पन्नास वर्षांनी, ऑगस्ट १९९५ मधे पश्चिम बंगालचे तेव्हाचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी भारतातला पहिला ‘मोबाईल' कॉल केला. ‘आयफोन सेव्हन’ अमेरिकेत सप्टेंबर २०१६ मधे लाँच झाल्यानंतर एका महिन्यात, म्हणजे ऑक्टोबर २०१मधे भारतात विक्रीसाठी उपलब्ध होता.

या तीन उदाहरणांतून आपल्या असं लक्षात येईल की भारताबाहेर, युरोप किंवा अमेरिकेत लागलेल्या शोधांचा भारतात प्रत्यक्ष उपयोग केला जाण्याचा वेळ झपाट्यानं कमी होतोय. वाफेच्या इंजिनाला दीडशे वर्षं, मोबाईल फोनला पन्नास वर्षं, आणि आता ‘आयफोन’सारख्या लेटेस्ट फोनला फक्त क महिना! का बाजूनं ही तंत्रज्ञानातली प्रगती आपल्याला सुखावत असली तरी, त्याची दुसरी बाजू समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

ज्या देशांमधे तंत्रज्ञान विकसित झालं, नवनवे शोध लागत गेले, त्या देशांची ती त्या-त्या वेळची गरज बनली होती. नवीन तंत्रज्ञान, नवीन उपकरणं प्रत्यक्ष वापरण्याआधी त्यापूर्वीचा टप्पा तिथल्या लोकांनी पार पाडला होता. त्यामुळं, नवनवीन उपकरणं हाताळण्यात एक प्रकारचा सराईतपणा आणि त्या टेक्नॉलॉजीचे फायदे-तोटे समजण्याची नैसर्गिक प्रगल्भता (मॅच्युरिटी) आपसूक विकसिझाली होती. भारतासारख्या देशात मात्र, फक्त जागतिकीकरण, प्रचंड मोठी बाजारपेठ, आणि माहितीच्या साधनांची उपलब्धता यांमुळं नवनवीन तंत्रज्ञान चक्क येऊन आदळत गेलं. त्यासाठी ‘मॅच्युर’ होण्याची सोडा, साक्षर होण्याचीसुद्धा संधी लोकांना मिळाली नाही. त्यामुळं जमेल तसा वापर करत आपण हा तंत्रज्ञानाचा विकास अंगावर घेत गेलो, घेत आहोत.

उदाहरणार्थ, पूर्वी घरामधे लॅन्डलाईन टेलिफोनसुद्धा सर्रास दित नसत. ज्यांच्या घरी किंवा ऑफीसमधे असे फोन होते, त्यांनी फोन वापराच्या काही सवयी किंवा मॅनर्स अंगी बाणवले होते. अशांच्या हातात मोबाईल फोन आले तेव्हा त्यांचा वापर बऱ्यापैकी मॅच्युअर्ड पध्दतीनं होत होता. पण ज्यांनी टेलिफोनच सोडा, कधी पोस्टानं पत्रसुद्धा पाठवलं नव्हतं, अशा लोकांच्या हातात थेट मोबाईल फोन आणि ई-मेल आल्यामुळं खरोगोंधळ माजलाय. या गोष्टींचे सगळे फायदे मान्य केले तरी त्याबरोबर होणारा गैरवापर आणि नुकसानसुद्धा दुर्लक्ष करण्याइतकं क्षुल्लक नाहीये, वढं नक्की.

हे उदाहरण अगदीच साधं होतं. प्रत्यक्षात मुद्दा असा आहे की, टेक्नॉलॉजी, विशेषतः ऑटोमेशन, हे उपलब्ध आहे म्हणून वापरायचं की गरज असेल तरच वापरायचं? ज्या देशात लोकसंख्या कमी आहे, त्यामुळं कुठल्याही इंडस्ट्रीत काम करण्यासाठी माणसं कमी मिळतात, किंवा कच्च्या मालापेक्षा मजुरीवर जास्त खर्च करावा लागतो, अशा ठिकाणी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठी गुंतवणूक करून ऑटोमेशनचे पर्याय शोधून काढणं योग्य ठरेल. पण एकदा ऑटोमेशनचं तंत्र किंवा पर्याय उपलब्ध झाला की, जिथं त्याची फारशी गरज नसेल त्या देशात आणि उद्योगातसुद्धा ते वापरलं जातं. याला ‘पॅसिव्ह प्लिकेशन ऑफ टेक्नॉलॉजी’ म्हणता येईल.

उदाहरणार्थ, भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात तरूण बेरोजगार कुशल/अकुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. मग पन्नास-शंभर लोकांचं काम एकजण करू शकेल किंवा आपोआप होईल, अशा टेक्नॉलॉजीची आपल्याला गरज आहे का? सामाजिकदृष्ट्या अशी गरज नसली तरी, गुंतवणूकदारांच्या किंवा उद्योजकांच्या दृष्टीनं अशी गरज आहे. एक तर, ऑटोमेशनमुळं कुठल्याही उत्पादनाची गुणवत्ता वाढते आणि वेळही कमी लागतो. मॅन्युअल कामामधे व्यक्तींवर (त्यांचं कौशल्य, ताकद, स्वभाव, भावना, इच्छा, प्रकृती, इत्यादी अनेक गोष्टींवर) अवलंबून रहावं लागतं. ऑटोमेशनमुळंत्पादन प्रक्रियेवर मालकांचं नियंत्रण वाढतं. या वेगवान आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांसाठी खर्चही तुलनेनं कमी येतो. साहजिकच, धिक नियंत्रित आणि फायदेशीर व्यवसायाच्या दृष्टीनं ‘ऑटोमेशन’ ही उद्योजकांची गरज आहे. आणि आ जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञानामुळं हे सगळे पर्याय त्यांना सहज उपलब्धही आहेत.

आता ही परिस्थिती समजून घेतली तर, ऑटोमेशन अटळ आहे हे आपल्या लक्षात येईल. मग कामगारांच्या हितासाठी, सामाजिक समतेसाठी गैरे ऑटोमेशनला विरोध करून, आंदोलनंरून काहीही उपयोग नाही, हेसुद्धा आता आपण मान्य केलं पाहिजे. ज्या गोष्टीमुळं निश्चित फायदा होणार आहे (उदाहरणार्थ, ऑटोमेशन), ती गोष्टना उद्या इंडस्ट्रीत वापरायला सुरु होणार, हे जितक्या लवकर आपण मान्य करू तेवढं आपल्याच फायद्याचं राहील. सामाजिक/राजकीय दबाव आणून आपण या गोष्टी फार काळ टाळू शकणार नाही. मग त्यापेक्षा आपण जपासूनच तयारी ठेवणं उत्तम.

ही तयारी ठेवायची म्हणजे नक्की काय करायचं? आजपर्यंज्या उद्योगांमधे, कामांमधे ऑटोमेशन आल्यामुळं नोकरी-व्यवसायाच्या संधी कमी झाल्यात किंवा नाहीशा झाल्यात, त्या क्षेत्रांची माहिती तर आपल्याला आहेच. उदाहरणार्थ, बँकेमधे पूर्वी का दिवसात पाचशे कस्टमर फक्त कॅश काण्यासाठी येत होते. त्यांच्यासाठी सहा ते सात कॅशिर पूर्ण दिवसभर काउंटरमागे बसून राहत होते. आज एटीएम आणि कार्ड पेमेंटमुळं अशा कस्टमरची संख्या पाचशेवरून पन्नासवर आली आणि त्यासाठी एक कॅशियरसुद्धा पुरेसा आहे. आता कॅश काउंटर हाताळणारे इतर पाच-सहा लोक एका क्षणात बेरोजगार आणि (इतर कामांसाठी) अकुशल ठरले. इतरही जवळपास सर्व बँकांमधे ऑटोमेशन झाल्यामुळं त्यांना कॅशियरची नोकरी मिळणार नाही आणि इतर कामासाठी आवश्यक कौशल्यही त्यांच्याकडं असणार नाही.

या उदाहरणानुसार, इथून पुढं बँके कॅशिरच्या कामासाठी नोकरीच्या संधी कमी असणार, हे समजून त्यानुसार शिक्षण व कौशल्य विकासात बदल करणं आवश्यक आहे. पण ‘आज’ शाळा-कॉलेजात शिकणाऱ्या मुलांसाठी वढाच विचार पुरेसा नाही. त्यांना तर अशा कामांचा अंदाज आजच बांधायचा आहे, जी पुढच्या १०/५/२० वर्षांत ऑटोमेशनच्या आवाक्यात येऊन पूर्णपणे बदलतील.

असा अंदाज लावणं तशी सोपी गोष्ट नाही. गेल्या पन्नास-शंभर वर्षांमधे कित्येक अनपेक्षित कामं आणि क्षेत्रं ऑटोमेशनखाली आली आहेत. पण एक गोष्ट या सगळ्यांत समान दिसून येते. ती म्हणजे, वारंवार तेच-ते त्यापद्धतीनं केलेलं काम पकन ऑटोमे होऊ शकतं. उदाहरणार्थ, निरनिराळ्या कस्टमरनी जमा केलेले चेक किंवा स्लिप तपासून त्यांना त्यावर लिहिलेली रक्कम मोजून देणं, हॉटेल किंवा दुकानांमधे ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणं यादी बनवून हिशोब करणं, ठराविक डिझाईनच्या साचेबद्ध वस्तूंचं उत्पादन करणं, इत्यादी. ही उदाहरणं आज ऑटोमेशन झालेल्या क्षेत्रातली असली तरी त्यावरुन भविष्यात ऑटोमेशन होऊ शकणाऱ्या कामांचा अंदाज लावता येईल.

आज मोठ्या प्रमाणावर बीपीओ (बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग) क्षेत्रात व्हॉईस (कॉल सेंटर) आणि नॉन-व्हॉईस (डेटा एन्ट्री) स्वरुपाची कामं उपलब्ध आहेत. पण थोडा विचार केला त, ही दोन्ही प्रकारची कामं ऑटोमेशनखाली येऊ शकतात हे लक्षात येईल. कॉल करणाऱ्या व्यक्तीचा आवाज, शब्द, आणि अर्थ ओळखून प्रतिसाद देणारी ‘व्हॉईस रेकग्निशन सिस्टीम’ मार्केटमधे उपलब्ध आहेच. जास्तीत जास्त भाषा, बोलीभाषा, शब्दसंग्रह, वाक्यांची उदाहरणं, यांचा समावेश या टेक्नॉलॉजीमधे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन आणि प्रयोग सुरू आहेत. अशीच डेव्हलपमें ‘ओसीआर’ (ऑप्टीकल कॅरेक्टर रेकग्निशन) तंत्रातसुद्धा होत आहे. टाईप केलेले जवळपास सगळे फॉन्ट आतापर्यंत ओसीआर टूलमधून वाचता येतात. शिवाय हातानं लिहिलेला मजकूरदेखील बऱ्यापैकी वाचून आपोआप टाईप करून मिळतो. (टीप - हा हस्तलिखित सात पानांचा लेख ‘ओसीआर’ टेक्नॉलॉजी वापरून थेट वर्ड फाईलमधे कन्व्हर्ट केलेला आहे. नंतर त्यामधे थोड्याफार दुरुस्ती/सुधारणा केलेल्या आहेत.) व्हॉईस रेकग्निशन आणि ओसीआर तंत्रामुळं व्हॉईस आणि नॉन-व्हॉईस प्रोसेसमधल्या नोकऱ्या कित्येक पटीनं कमी होणार, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे.

रस्त्यावर चौकाचौकात सिग्नलवर लावलेले कॅमेरे आणि त्यात काढलेल्या फोटोवरून थेट घरी येणारी नियमभंगाच्या दंडाची पावती, हे ट्रॅफीक पोलिसांच्या कामाचं ऑटोमेशन आहे. रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून फक्त एक आकडा दाबून घरगुती गॅस सिलिंडर बुक करता येण्याच्या सोयीमुळं गॅस एजन्सीतल्या नोकऱ्या कमी झाल्या आहेत. इंटरऐक्टीव्ह ई-लर्निंग सॉफ्टवेअर आणि टॅबलेट, तसंच गुगल आणि विकीपिडीया यांच्या सहज उपलब्धतेमुळं, दरवर्षी तेच-तेच धडे, त्याच-त्याच कविता, तीच-तीच प्रमेयं शिकवणाऱ्या शिक्षकांची गरजही भविष्यात कमी होत जाणार आहे. ‘ऑनलाईन’ आणि 'कॅशलेस’ या दोन संकल्पनांच्या वावटळीत कसुरी आणि पुन्हा-पुन्हा करायची कामं माणसांच्या हातून सुटून मशिन किंवा कॉम्प्युटरच्या पदरात जाऊन पडत आहेत, पडणार आहेत. त्यासाठीच्या संशोधन, प्रयोग, विकास, आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी खाजगी उद्योगांइतकेच सरकारी क्षेत्रातही प्रयत्न आणि गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येईल.

आजच्या घडीला भारतात कुशल-अकुशल कामगारांचं प्रमाण ५ टक्के विरुद्ध ९५ टक्के इतकं व्यस्त आहे. त्यात नवनवीन तंत्रज्ञान आणि ऑटोमेशनची भर पडून, आजचे कुशल कामगार पटकन ‘अकुशल’ ठरत चाललेत. उद्या नोकरी शोधायला बाहेर पडलो तर काय ‘स्किल्स’ लागतील याचा आज अंदाज येत नाहीये. उद्या भारतात खादा ऑनलाईन बिझनेस सुरू केला, तर स्पर्धा अमेरिकेतल्या गुगल आणि फेसबुकशी असू शकेल. अगदी अगरबत्ती बनवायचा व्यवसाय सुरु केला तरी चीनशी स्पर्धा करण्याची तयारी ठेवावी लागेल, अशी परिस्थिती आहे.

मग आज शिक्षण घेत असलेल्या पुढच्या पिढीनं शिकायचं तरी काय? कशाकशाची तयारी त्यांनी करून ठेवायची? अशी कोणती कामं असतील, जी काही झालं तरी टोमेशनखाली येणार नाहीत? खरं तर आजच्या विद्यार्थ्यांपेक्षा आजच्या शिक्षकांपुढचं हे मोठं आव्हान आहे. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी आपण जे शिकलो ते आजच कालबाह्य झालंय. मग अजून दहा-पंधरा वर्षांनी मार्केटमधे उतरणाऱ्या या मुलांना काय शिकवायचं, जे त्यांना त्यापुढची तीस-पस्तीस वर्षं टिकून राहायला आणि प्रगती करायला उपयोगी पडेल?

कॅलक्युलेटर आणि कॉम्प्युटरपासून गुगल मॅप्स आणि युट्यूबपर्यंत सगळी अद्ययावत साधनं आजच लीलया हाताळणाऱ्या या पिढीला काही शिकवायचंच असेल तर ते इतिहास, भूगोल, गणित, इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, नक्कीच नाही! त्यांना शिकवायची आहे - दूध आणि पाणी वेगळं करू शकणारी विचारपद्धती. त्यांना शिकवायची आहे - योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची युक्ती. त्यांना शिकवाची आहे - कुठल्या कामासाठी कुठलं तंत्रज्ञान वापरायचं आणि कुठलं वापरायचं नाही हे ओळखण्याची शक्ती. त्यांना शिकवायचं आहे - माणसांचं काम हलकं, सोपं, अचूक, आणि उपयुक्त होईल असं डिझाईन बनवण्याचं कौशल्य

‘क्रिटीव्हिटी’ या गोष्टीचं कधीच ‘ऑटोमेशन’ नाही होऊ शकणार. दिवसाला पाचशे गाड्या बनवणारी कंपनी ऑटोमेशन करुन दिवसाला दोन हजार गाड्या बनवू शकेल, पण कमीत कमी किंमतीची, जास्तीत जास्त ऐव्हरेज देणारी, शून्य प्रदूषण करणारी गाडी कशी बनवायची, हे कुठल्या तरी माणसालाच (किंवा माणसांच्या समूहाला) बसून, विचार करून ठरवावं लागेल. का मिनिटाका कागदाच्या दोनशे कॉपी काणारं मशिन मिळू शकेल, पण त्या कागदावर काय लिहायचं हे कुठल्या तरी सुपिक डोक्यातनंच यावं लागेल. या क्रिएटीव्हिटीला कधीही मरण नाही, कितीही ऑटोमेशन झालं तरी.

आता प्रश्न असा आहे की, अशी क्रिएटीव्हिटी सगळ्यांकडं कशी असणार? आणि असे क्रिएटीव्ह कामाची गरज असणारे जॉब कितीसे आणि कुठं असणार?

झालंय काय, गेल्या कित्येक वर्षांत झापडबंद शिक्षण आणि साचेबद्ध कामाच्या पद्धतींमुळं आपला सगळ्यांचाच स्वत:च्या क्रिएटीव्हिटीवरचा विश्वास उडाला. आपण हुशार असू शकतो, कष्टाळू असू शकतो, सिन्सियर आणि लॉय असू शकतो, पण आपण ‘क्रिएटीव्ह’ मात्र कदापि असू शकत नाही, असं आपल्याला ठामपणे वाटतं. क्रिएटीव्ह माणूस वेगळाच दिसतो; तो क्लीन-शेव्ह न करता दाढी वाढवतो, भांग पाडण्याऐवजी लांब केसांचा ‘पोनी’ बांधतो, फॉर्मल शर्टऐवजी लांब कुर्ते घालतो, आणि ऑफीस बॅगऐवजी ‘शबनम’ घेऊन फिरतो, असं काहीतरी आपल्याला वातं. (ही काल्पनिक लक्षणंसुद्धा क्रिएटीव्ह ‘पुरुषां’बद्दलचीच आहेत, कारण ‘क्रिएटीव्ह’ आणि 'बाई' या दोन गोष्टींची एकत्रित कल्पनासुद्धा करणं आपल्याला शिकवलेलं नाही.) त्यामुळंक्रिएटीव्हिटी’ या शब्दाची आपल्याला एकंदरीतच ऐलर्जी आहे.

प्रत्यक्षात, प्रत्येक मूल जन्मजात क्रिएटीव्हच असतं हे आपण विसरतोय. घरातून, शाळेतून, समाजातून ‘हे करू नकोस', 'तसं बोलू नकोस’, ‘असा विचारसुद्धा करू नकोस’, सं 'शिक्षण' आपण मुलांना देत असतो. हे शिक्षण देणं थांबवलं तर त्यांची क्रिटीव्हिटी आपोआप विकसित होत जाई आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि प्रगतीसाठी ते स्वतःच मार्ग शोधतील. त्यांना क्रिएटीव्हिटी ‘शिकवण्याच्या’ भानगडीत न पडणंच चांगलं! गेल्या काही पिढ्यांपासून आपण उत्पादन आकड्यांमधे आणि यश रुपयांमधे मोजायला इतके सरालो आहोत की, ता ही क्रिएटीव्हिटी कशात मोजायची हा यक्षप्रश्न आपल्यासमोर उभा ठाकेल. त्यापेक्षा आपण या मुलांची विचार करण्याची शक्ती, ऊर्मी, आणि चुकांमधून शिकण्याची धडपड, या गोष्टींना फक्त प्रोत्साहन देत राहिलं पाहिजे. उद्या आपली नोकरी टिकेकी नाही, याची खात्री नसलेल्यांनी मुलांच्या वीस वर्षांनंतरच्या करीयरमधे लुडबूड करणं थांबवलं पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टी करून बघण्यासाठी, प्रयोगातून शिकण्यासाठी त्यांना पूरक वातावरण दिलं पाहिजे.

इतकी वर्षं औद्योगिकीकरणाच्या लाटेत वाहत आपण फक्त ठरवून दिलेल्या प्रोसेसप्रमाणं ‘प्रॉडक्शन’ करत राहिलो. आता या सगळ्या सिस्टीमचीच पुनर्रचना करण्याची वेळ आलीय, त्यामुळं सांगितलेलं काम करणाऱ्यांपेक्षा स्वत: विचार करून बदल घडवू शकणाऱ्यांना भविष्यात मोठी मागणी आणि खूप काम असणार आहे. माणसांच्या मुलभूत गरजा, जगण्याची क्वालिटी, या गोष्टींकडं दुर्लक्ष करत आपण लाखो-करोडो वस्तूंचं उत्पादन करत राहिलो आणि त्यालाच आयुष्याचं ध्येय मानत गेलो. आता ऑटोमेशनमुळं, हे उत्पादनाचं पुन्हा-पुन्हा करायचं तेच-तेच काम आपोआप परस्पर होत राहील आणि खरंखुरं क्रिएटीव्ह, उपयोगी, ‘मानवी’ काम करायला माणूस पुन्हा मोकळा होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.



© मंदार शिंदे

०८/०७/२०१७

Mobile: 9822401246

E-mail: shindemandar@yahoo.com

Blog: http://aisiakshare.blogspot.com

Books: http://amazon.com/author/aksharmann



Share/Bookmark